World Radiography Day 2022: रेडिओग्राफीची गरज कधी पडते? कुणी राहावे दूर? वाचा सविस्तर

रेडिओग्राफी तंत्रज्ञानाचा शोध, हा वैद्यकशास्त्रातील एक मैलाचा टप्पा मानला जातो. शरीराच्या अंतर्गत भागातील फोटो घेण्यासाठी आणि आजारांचा शोध लावण्यासाठी काढण्यात येणाऱ्या एक्स-रे या तंत्रज्ञानाचे मूळ रेडिओग्रफीत आहे. याचे महत्व जगभरातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी दरवर्षी 8 नोव्हेंबर हा दिवस 'जागतिक रेडिओग्राफी दिन' म्हणून साजरा केला जातो.

World Radiography Day 2022
रेडिओग्राफीची गरज कधी पडते? 
थोडं पण कामाचं
  • रेडिओग्राफीचा शोध हा वैद्यकशास्त्रासाठी मैलाचा दगड
  • अनेक आजारांचा शोध घेणे झाले सोपे
  • 8 नोव्हेंबरला साजरा होतो जागतिक रेडिओग्राफी दिवस

World Radiography Day 2022: वैज्ञानिक क्षेत्रात लागलेल्या वेगवेगळ्या शोधांमुळे वैद्यकशास्त्राने प्रचंड प्रगती गेल्या काही दशकांमध्ये केली आहे. सर्वसामान्य माणसांचे वाढलेले जीवनमान आणि त्यांच्या आयुष्यात कमी झालेल्या वेदना, यामागे वैद्यकशास्त्रातील नवनव्या शोधांचा सिंहाचा वाटा आहे. गेल्या काही दशकांमध्ये असे काही वैज्ञानिक शोध लागले, ज्यांनी वैद्यकीय उपचारपद्धतीत अमुलाग्र बदल झाले. विशेषतः रोगांचे निदान करणे आणि शरीरातील अंतर्गत परिस्थितीचे आकलन करणे, या दृष्टीने लागलेला रेडिओग्राफी तंत्रज्ञानाचा शोध, हा वैद्यकशास्त्रातील एक मैलाचा टप्पा मानला जातो. शरीराच्या अंतर्गत भागातील फोटो घेण्यासाठी आणि आजारांचा शोध लावण्यासाठी काढण्यात येणाऱ्या एक्स-रे या तंत्रज्ञानाचे मूळ रेडिओग्रफीत आहे. याचे महत्व जगभरातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी दरवर्षी 8 नोव्हेंबर हा दिवस 'जागतिक रेडिओग्राफी दिन' म्हणून साजरा केला जातो. अनेकांना या तंत्रज्ञानाविषयी विशेष माहिती नसते. अनेकांचे या तंत्रज्ञानाबाबत काही समज आणि गैरसमज ही असतात. या दिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया, रेडिओग्राफी तंत्रज्ञानाचे महत्त्व, त्याचा वैद्यकशास्त्रात केला जाणारा उपयोग आणि त्यापासून घ्यावयाची काळजी याबाबतच्या काही महत्त्वपूर्ण बाबी.

१. रेडिओग्राफीमुळे डॉक्टरांना शरीरातील अंतर्गत आजार आणि विकार जाणून घेण्यास मदत होते. शरीरातील ज्या भागातील निरीक्षण उघड्या डोळ्यांनी करता येणे शक्य नसते, या भागातील निरीक्षण करण्यासाठी रेडिओग्रफीचा उपयोग केला जातो.

२. या तंत्रज्ञानात शरीराच्या अंतर्गत भागाचे high resolution फोटो काढले जातात. त्यामुळे रुग्णाच्या आरोग्याच्या सद्यस्थितीचा रिपोर्ट समोर येतो.

३. रेडिओग्राफीमुळे शरीरातील आजारांचे मूळ शोधण्यासाठी मदत होते. आजारांचे मूळ शोधल्याशिवाय त्यावर उपचार करणे शक्य नाही, हे तर आपण जाणतोच. वेळेवर आजारांचे मूळ शोधण्यात यश आले, तर रुग्णाचा जीव वाचवणे तुलनेने सोपे जाते. रेडिओग्राफी तंत्रज्ञानाने ही बाब शक्य होते.

अधिक वाचा - Maharashtra Breaking news 08 November 2022 Latest Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

४. दातांची तपासणी करण्यासाठी आणि दातांची संबंधित आजार जाणून घेण्यासाठी रेडिओग्रफी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. दातात कीड किती खोलवर गेली आहे, हे जाणून घेण्यासाठी दंतवैद्य रेडिओग्राफी एक्स-रेचा वापर करतात.

५. एखाद्या मोठ्या सर्जरीनंतर ती यशस्वीरित्या झाली आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी रेडिओग्रफीचा वापर केला जातो.

६. साधारणतः हाड मोडणे, हाडांना दुखापत होणे किंवा हाडांमध्ये विकलांगता येणे यासारख्या आजारांचा शोध घेण्यासाठी रेडिओग्रफी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. शरीरातील कुठल्याही हाडाचा फोटो काढण्यासाठी कमी रेडिएशनचा वापर केला जातो.

७. ब्रेस्ट कॅन्सर आणि त्याच्याशी संबंधित इतर बाबींचा शोध घेण्यासाठी देखील रेडिओग्रफी तंत्रज्ञान वापरले जाते.

९. रेडिओग्राफी ही एक प्रकारची एक्स-रेची प्रक्रिया आहे. इतर प्रकारांप्रमाणे यातही काही जोखीम असते.

अधिक वाचा - Bharat Jodo Yatra : काँग्रेसचे ट्विटर हँडल ब्लॉग, भारत जोडो यात्रेच्या गाण्यात KGF च्या संगीताचा वापर

१०. रेडिओग्राफी एक्स-रे केल्यामुळे कॅन्सर आणि मोतीबिंदूचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.

११. गर्भवती महिलांना रेडियोग्राफी एक्स-रे टाळण्याचा सल्ला दिला जातो. यात वापरल्या जाणाऱ्या किरणांचा गर्भावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी