भारतात उभारणार कृष्णाची जगातील सर्वात उंच मूर्ती

world tallest krishna statue will built in dwarka as part of devbhumi corridor : भारतात गुजरातमधील द्वारका शहरात कृष्णाची जगातील सर्वात उंच मूर्ती उभारण्यात येणार आहे.

world tallest krishna statue will built in dwarka as part of devbhumi corridor
भारतात उभारणार कृष्णाची जगातील सर्वात उंच मूर्ती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतात उभारणार कृष्णाची जगातील सर्वात उंच मूर्ती
  • देवभूमी द्वारका कॉरिडॉर
  • धार्मिक पर्यटनाला चालना

world tallest krishna statue will built in dwarka as part of devbhumi corridor : भारतात गुजरातमधील द्वारका शहरात कृष्णाची जगातील सर्वात उंच मूर्ती उभारण्यात येणार आहे. 'देवभूमी द्वारका कॉरिडॉर'चा एक भाग म्हणून द्वारका शहरात भगवान कृष्णाची जगातील सर्वात उंच मूर्ती उभारली जाणार आहे. ही माहिती गुजरात सरकारने दिली.

भारत-बांगलादेश दुसरी टेस्ट LIVE स्कोअर

देवभूमी द्वारका जिल्ह्यातील द्वारका येथे भगवान कृष्णाची जगातील सर्वात उंच मूर्ती उभारण्यात येईल. तसेच द्वारकाधीश मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात 3D इमर्सिव्ह एक्सपीरियन्स झोन आणि श्रीमद भगवद्गीता अनुभव क्षेत्र देखील विकसित केले जाणार आहे.

द्वारका शहरातील 'देवभूमी द्वारका कॉरिडॉर' हा भाग पश्चिम भारतातील सर्वात मोठे धार्मिक केंद्र बनवण्यासाठी 'देवभूमी द्वारका कॉरिडॉर' विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राचीन द्वारका शहराचे अवशेष लोक कुठून पाहू शकतील याचेही नियोजन सुरू आहे. पुढील वर्षी म्हणजेच  सप्टेंबर 2023 मध्ये भूमिपूजन केल्यानंतर 'देवभूमी द्वारका कॉरिडॉर' योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू होईल.

कॉरिडॉरचे काम सुरू असतानाच जगातील सर्वात उंच कृष्णाच्या मूर्तीच्या उभारणीचे काम सुरू होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर गुजरातमधील पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास गुजरात सरकारने व्यक्त केला.

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने उभारण्यात आलेल्या या स्मारकात सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोठा पुतळा आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये पर्यटकांसाठी आकर्षण म्हणून मोठे उद्यान पण उभारण्यात आले आहे. या स्मारकाला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. आता स्टॅच्यू ऑफ युनिटी पाठोपाठ सोमनाथ मंदिर आणि 'देवभूमी द्वारका कॉरिडॉर' यांच्या माध्यमातून जास्तीत पर्यटकांना गुजरातकडे आकर्षित करण्याची गुजरात सरकारची योजना आहे.

धार्मिक पर्यटन वाढावे यासाठी गुजरात सरकारने सोमनाथ मंदिर प्रकल्पापाठोपाठ 'देवभूमी द्वारका कॉरिडॉर'वर लक्ष केंद्रीत केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी येथे 'काशी विश्वनाथ कॉरिडॉर', मध्य प्रदेशमध्ये 'महाकाल कॉरिडॉर' विकसित करून यूपी आणि एमपी या दोन राज्यांनी धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याच धर्तीवर गुजरात सरकार राज्यात धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

कोरोनाचा BF.7 व्हेरिएंट आणि त्याची लक्षणे

थंडीत लहान मुलांसाठी 'या' टिप्स वापरा

पेरू खा, निरोगी आणि उत्साही राहा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी