दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा स्फोटाने ब्रिटन हादरलं, बघा घटनास्थळावरील LIVE VIDEO

world war ii bomb detonates : दुसऱ्या महायुद्धाच्या 77 वर्षांनंतर ब्रिटनमध्ये बॉम्ब सापडला. हा बॉम्ब निकामी करत असताना त्याचा स्फोट झाला आणि ही घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली. बॉम्बस्फोटानंतर अनेक किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले.

World War II bomb blast shakes Britain, watch LIVE VIDEO from the scene
दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा स्फोटाने ब्रिटन हादरलं, बघा घटनास्थळावरील LIVE VIDEO  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ब्रिटनमध्ये दुसऱ्या युद्धाचा बॉम्ब सापडला
  • बाॅम्ब निकामी करताना स्फोट झाला
  • ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेली घटना

Huge Blast In UK : जगातील अनेक देशांमध्ये वेळोवेळी दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित बॉम्ब सापडत असतात. आजही अनेक देशांमध्ये हजारो स्फोट न झालेले बॉम्ब पडून असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आता एक घटनासमोर आली आहे ती अतिशय धक्कादायक आहे. ब्रिटनमधील ग्रेट यार्माउथ शहरात दुसऱ्या युद्धाचा बॉम्ब सापडला, जो निकामी करताना स्फोट झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा बॉम्बस्फोट इतका खतरनाक होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. (World War II bomb blast shakes Britain, watch LIVE VIDEO from the scene)

अधिक वाचा : Governor : देशात 13 राज्यपालांच्या नियुक्त्या, कोश्यारींचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बॉम्बचा स्फोट झाला तेव्हा त्याचे कंप काही किलोमीटर दूर इमारतीपर्यंत जाणवले. नॉरफोक पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. येरे नदी ओलांडून तिसऱ्या क्रॉसिंगवर काम करणाऱ्या एका कंत्राटदाराने हा बॉम्ब शोधून काढल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा : काय सांगता ? मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त 12 तासांत, जाणून घ्या 'दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे' मुळे काय बदलणार

बॉम्ब मिळाल्यानंतर त्याची माहिती आपत्कालीन सेवा आणि यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर एजन्सी हा बॉम्ब निकामी करत असताना त्याचा स्फोट झाला. बॉम्ब निकामी करण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी इमारत आणि जवळपास राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी पाठवले आणि रस्ता पूर्णपणे बंद केला.

नॉरफोक पोलिसांनी सांगितले की, बॉम्ब निकामी केला जात असताना त्याचा स्फोट झाला आणि या घटनेचा व्हिडिओ ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नॉरफोक पोलिसांनी ट्विट केले की, "आम्ही खात्रीपुर्वक सांगू शकतो की कोणीही जखमी झाले नाही. सार्वजनिक सुरक्षा आमच्या सोबत होती. हे ऑपरेशन किती काळ चालले आहे हे आम्हाला माहित आहे."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी