World’s Longest Underwater Tunnel: समुद्राखाली तयार होतोय जगातील सर्वात मोठा बोगदा, या दोन देशांना जोडणार

जगातील सर्वात मोठा समुद्री बोगदा तयार होतो आहे डेन्मार्क आणि जर्मनी या दोन देशांदरम्यान. सध्या या बोगद्याचं काम जोरदार सुरु असून 2029 सालापर्यंत हा बोगदा तयार झालेला असेल.

World’s Longest Underwater Tunnel
समुद्राखाली तयार होतोय जगातील सर्वात मोठा बोगदा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जगातील सर्वाधिक लांबीचा समुद्री बोगदा
  • डेन्मार्क आणि जर्मनीला जोडणार
  • आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाकांक्षी इंजिनियरिंगचा प्रयोग

World’s Longest Underwater Tunnel: गेल्या काही दशकांमध्ये समुद्रातून पाईपलाईन टाकणे, केबल टाकणे यासारखे यशस्वी प्रयोग करून दूरसंचार आणि ऊर्जा क्षेत्रातील अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असत. मात्र आता समुद्राचा वापर प्रवासासाठीदेखील करण्याचं तंत्रज्ञान (Technology) विकसित होत असून जगातील सर्वात मोठा अंडरवॉटर बोगदा (Underwater Tunnel) तयार करण्याचं काम सुरू आहे. चीन आणि युरोप यांच्यात हे तंत्रज्ञान वापरण्याची एक प्रकारे चढाओढ सुरू असून त्यामुळे विज्ञानातील नवे प्रयोग प्रत्यक्ष अवतरू लागल्याचं दिसून येत आहे. सध्या जगातील सर्वात मोठा समुद्री बोगदा तयार होतो आहे डेन्मार्क (Denmark) आणि जर्मनी (Germany) या दोन देशांदरम्यान. सध्या या बोगद्याचं काम जोरदार सुरु असून 2029 सालापर्यंत हा बोगदा तयार झालेला असेल. 

असा आहे बोगदा

जगातील सर्वाधिक लांबीच्या या बोगद्याचं नाव फेहमर्न बेल्ट फिक्स्ड लिंक टनेल असं असणार आहे. ‘युरो न्यूज’नं दिलेल्या वृत्तानुसार समुद्रात तयार होणाऱ्या या बोगद्यातून रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक अशा दोन्ही बाबींचा समावेश असणार आहे. सध्या या प्रकल्पाचं काम वेगाने करण्यात येत असून दोन्ही देशांकडून या प्रकल्पावर लक्ष ठेवलं जात आहे. 

अधिक वाचा - बेधुंद गोळीबारात महापौरांसह 18 ठार

युरोपात होणार क्रांती

या प्रकल्पामुळे युरोपात नव्या क्रांतीला सुरुवात होईल, असं मानलं जात आहे. हा डेन्मार्कने हाती घेतलेला आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं सांगितलं जात आहे. युरोपियन युनियनच्या Ten-T या कार्यक्रमाचा हा भाग आहे. या योजनेमुळे युरोप खंडात वेगवेगळ्या देशांची कनेक्टिव्हिटी वाढणार असून व्यापार वाढीसाठीदेखील त्याची मदत होणार आहे. या प्रकल्पाचं महत्त्व आणि त्याचा भविष्यातील वापर यांचा विचार करूनच युरोपीय महासंघानं या प्रकल्पात 1.1 बिलियन युरोची गुंतवणूक केली आहे. तब्बल 10 वर्षे रिसर्च आणि संशोधन केल्यानंतर 2020 साली या बोगद्याच्या बांधणीला सुरुवात झाली होती. एका रिपोर्टनुसार या बोगद्याची लांबी 18 किलोमीटर असणार आहे. 

दोन बेटांना जोडणारा बोगदा

बाल्टिक समुद्रात तयार होत असलेला हा बोगदा जर्मनीतील फेहर्मन आणि डेन्मार्कमधील लोलँड या बेटांना जोडणार आहे. सध्या या दोन्ही देशांतील लोक एकीकडून दुसरीकडे जाण्यासाठी बोटींचा उपयोग करतात. ही बोट सेवा डेन्मार्कच्या रोडबीपासून ते जर्मनीतील पुटगार्डनदरम्यान उपलब्ध आहे. या प्रवासाला सध्या 45 ते 60 मिनिटांचा वेळ लागतो. नवा बोगदा तयार झाल्यानंतर हा वेळ कमी होणार असून केवळ 7 ते 10 मिनिटांत हे अंतर पार करता येणार आहे. 

अधिक वाचा - इराणमधील हिजाब विरोधी आंदोलनाला अमेरिकेतून पाठिंबा

अनोखा चमत्कार

जर्मनी आणि डेन्मार्क यादरम्यान समुद्रात तयार होत असलेला बोगदा हा विज्ञानाचा चमत्कार म्हणून गौरवला जात आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या कोपरहेगनपासून हॅम्बर्गपर्यंतच्या रेल्वे प्रवासासाठी पाच तासांचा वेळ लागतो. नवा बोगदा तयार झाल्यानंतर हा वेळ दोन तासांपर्यंत कमी होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी