जिनपिंग यांच्या तिसऱ्या टर्मला विरोध

Xi Jinping Opponents Challenge Bid For 3rd Term In Office, Report : चीनचे अध्यक्षपद सलग तिसऱ्यांदा आपल्याच हाती ठेवण्याची इच्छा शी जिनपिंग यांना आहे. जिनपिंग यांनी या दृष्टीने हालचाल सुरू केली आहे. पण चीनच्या कम्युनिस्ट पार्टीतील काही नेत्यांचा जिनपिंग यांना विरोध आहे. 

Xi Jinping Opponents Challenge Bid For 3rd Term In Office, Report
जिनपिंग यांच्या तिसऱ्या टर्मला विरोध  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जिनपिंग यांच्या तिसऱ्या टर्मला विरोध
  • चीनच्या कम्युनिस्ट पार्टीतील काही नेत्यांचा जिनपिंग यांना विरोध
  • नागरिकांमध्ये जिनपिंग यांच्याविषयीची नाराजी वाढू लागली आहे

Xi Jinping Opponents Challenge Bid For 3rd Term In Office, Report : बीजिंग : चीनचे अध्यक्षपद सलग तिसऱ्यांदा आपल्याच हाती ठेवण्याची इच्छा शी जिनपिंग यांना आहे. जिनपिंग यांनी या दृष्टीने हालचाल सुरू केली आहे. पण चीनच्या कम्युनिस्ट पार्टीतील काही नेत्यांचा जिनपिंग यांना विरोध आहे. 

कोरोना संकटात जिनपिंग यांनी देशातील परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली नाही. चीनमधील आर्थिक आव्हाने हाताळण्यात जिनपिंग अपयशी ठरत आहेत. यामुळे जिनपिंग यांना तिसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवडून देण्याऐवजी नव्या चेहऱ्याला संधी द्यावी असे जिनपिंग यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे. जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसी अर्थात शून्य कोरोना रुग्ण धोरणामुळे चीनसमोरील आर्थिक आव्हाने बिकट झाली आहेत, असा आरोप जिनपिंग यांच्या विरोधकांनी सुरू केला आहे. 

जिनपिंग यांचा चीनच्या अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ सुरू आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या धोरणानुसार एखादी व्यक्ती एका पदावर जास्तीत जास्त दोन टर्म किंवा १५ वर्षे राहू शकते. हे धोरण जिनपिंग यांच्या तिसऱ्या टर्मच्या प्रयत्नात अडथळा ठरू शकते; अशा स्वरुपाचा एक लेख चीनच्या कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित निवृत्त प्राध्यापकाने लिहिला आहे. आपले म्हणणे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जाहीर केले आहे. 

जिनपिंग यांना पक्षामधून तसेच पक्षाबाहेरून विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. झिरो कोविड पॉलिसी या धोरणानुसार जिनपिंग एखाद्या शहरात एक कोरोना रुग्ण आढळला तरी संपूर्ण शहरात कठोर लॉकडाऊन सुरू करतात. सक्तीने सर्व नागरिकांना वारंवार कोरोना चाचणी करून घेण्यास भाग पाडले जाते. कोरोनाबाधितांना क्वारंटाइन केले जाते. या प्रकारात विरोध करणाऱ्यांवर कठोर कारवाई होते. पोलीस बळाचा वापर केला जातो. चीन सरकारच्या या धोरणामुळे देशाच्या अर्थचक्राचा वेग मंदावला आहे. नागरिकांमध्ये जिनपिंग यांच्याविषयीची नाराजी वाढू लागली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी