यानम : भारताच्या मंगळ मोहिमेवरील पहिली संस्कृत डॉक्युमेंट्री

Yaanam : story of India's Mars mission is the first-ever science documentary in Sanskrit : भारताची मंगळयान मोहीम (Mars Orbiter Mission - MOM or Mangalyaan) ही कमीत कमी खर्चात केलेली एक मोठी आणि महत्त्वाकांक्षी मोहीम म्हणता येईल. या मोहिमेची यशोगाथा यानम नावाच्या पहिल्यावहिल्या संस्कृत डॉक्युमेंट्रीच्या (माहितीपट) स्वरुपात तयार झाली आहे.

Yaanam : story of India's Mars mission is the first-ever science documentary in Sanskrit
यानम : भारताच्या मंगळ मोहिमेवरील पहिली संस्कृत डॉक्युमेंट्री  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • यानम : भारताच्या मंगळ मोहिमेवरील पहिली संस्कृत डॉक्युमेंट्री
  • भारताच्या मंगळयान मोहिमेची यशोगाथा
  • यानम नावाच्या पहिल्यावहिल्या संस्कृत डॉक्युमेंट्रीच्या (माहितीपट) स्वरुपात तयार

Yaanam : story of India's Mars mission is the first-ever science documentary in Sanskrit : भारताची मंगळयान मोहीम (Mars Orbiter Mission - MOM or Mangalyaan) ही कमीत कमी खर्चात केलेली एक मोठी आणि महत्त्वाकांक्षी मोहीम म्हणता येईल. मर्यादीत निधी आणि मर्यादीत तांत्रिक क्षमता यांचा सुयोग्य वापर करून मोठी कामगिरी बजावण्यात भारत यशस्वी झाला होता. या मोहिमेची यशोगाथा यानम नावाच्या पहिल्यावहिल्या संस्कृत डॉक्युमेंट्रीच्या (माहितीपट) स्वरुपात तयार झाली आहे. ही ४४ मिनिटांची डॉक्युमेंट्री (माहितीपट) आहे. यात इस्रोमधील मंगळयान मोहिमेच्या टीमने केलेले कार्य, त्यांनी केलेले जुगाड, वेगवेगळ्या परिस्थितीत केलेला इतरांपेक्षा निराळा विचार याचा थोडक्यात आढावा घेण्यात आला आहे. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या विनोद मनकारा यांनी संस्कृत भाषेत यानम ही ४४ मिनिटांची डॉक्युमेंट्री (माहितीपट) दिग्दर्शित केली आहे. संस्कृत भाषेत तयार झालेली आणि विज्ञान क्षेत्राशी संबंधित असलेली ही पहिलीवहिली डॉक्युमेंट्री (माहितीपट) आहे. 

डॉ. के. राधाकृष्णन यांच्या माय ओडिसी पुस्तकाचा संदर्भ या डॉक्युमेंट्रीला आहे. यात मंगळयान मोहिमेव्यतिरिक्त इस्रोच्या एकूण कामगिरीविषयी पण थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.

संस्कृत ही धार्मिक कार्याची माहिती देणारी, श्लोक, स्रोत्र, प्रार्थना यांच्याशी संबंधित भाषा आहे असा एक गैरसमज आहे. खरं तर संस्कृती ही शास्त्रशुद्ध आणि मोठा आवाका असलेली भाषा आहे. आजही संस्कृत भाषा अतिशय महत्त्वाची आहे. हे पटवून देण्यासाठीच आधी प्रियमानसम नावाने एक सिनेमा डॉ. के. राधाकृष्णन यांनी तयार केला. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत डॉ. के. राधाकृष्णन यांनी संस्कृत भाषेत यानम ही ४४ मिनिटांची डॉक्युमेंट्री (माहितीपट) तयार केली आहे.

विशेष म्हणजे यानम डॉक्युमेंट्रीत डॉ. राधाकृष्णन, डॉ. एस. सोमनाथ या इस्रोशी संबंधित दोन शास्त्रज्ञांनी संस्कृत भाषेत महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉ. राधाकृष्णन यांनी मंगळयान मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि ते इस्रोचे माजी अध्यक्ष आहेत तर डॉ. एस. सोमनाथ हे इस्रोचे जानेवारी २०२२ पासून कार्यरत असलेले अध्यक्ष आहेत. 

डॉक्युमेंट्री संस्कृत भाषेत असली तरी सबटायटल्सच्या रुपात इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आला आहे. यामुळे संस्कृत भाषेतील एखादा शब्द समजला नाही तरी सबटायटल्सच्या माध्यमातून डॉक्युमेंट्री समजून घेण्यास मदत होईल. डॉ. ए. व्ही. अनूप यांनी या डॉक्युमेंट्रीसाठी निर्माता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीचे पहिले स्क्रीनिंग आज (रविवार २१ ऑगस्ट २०२२) झाले. डॉक्युमेंट्री तयार करण्यासाठी इस्रोकडून जुने फूटेज आणि इतर तांत्रिक माहिती अशा स्वरुपात मोठी मदत मिळाली. यामुळेच डॉक्युमेंट्री तयार करणे सोपे झाले, अशी माहिती डॉ. ए. व्ही. अनूप यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी