येसबॅंक, डीएचएफएल घोटाळा; ईडीकडून छाब्रियांची 251, भोसलेंची 164 कोटींची संपत्ती जप्त पण तात्पुरती

ईडीने पीएमएलए (PMLA, 2002) अंतर्गत येस बँक (Yes bank) आणि डीएचएफएल (DHFL) फसवणूक प्रकरणात व्यावसायीक संजय छाब्रिया (Sanjay Chhabria) यांची 251 कोटी रुपयांची मालमत्ता (property) आणि पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक (Famous entrepreneur ) अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची 164 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या प्रकरणात एकूण जप्ती 1,827 कोटी रुपयांवर पोहचली आहे, अशी माहिती ईडी (ED) कार्यालयाकडून देण्यात आली.

251 Crores of Chhabria, 164 Crores of Bhosle seized by ED
ईडीकडून छाब्रियांची 251, भोसलेंची 164 कोटींची संपत्ती जप्त  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • डीएचएफएल आणि येस बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयने 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती.
  • ईडीने व्यावसायिक संजय छाब्रिया आणि ईडीच्या कस्टडीतील अविनाश भोसले यांच्यावर ईडीने मोठी कारवाई
  • भोसलेंचे मुंबईतील डुप्लेक्स फ्लॅट, छाब्रियांची सांताक्रुझमधील आणि बंगळुरुमधील जमीन तसेच सांताक्रुझमधील तीन कोटींचा फ्लॅट जप्त

मुंबई :  ईडीने पीएमएलए (PMLA, 2002) अंतर्गत येस बँक (Yes bank) आणि डीएचएफएल (DHFL) फसवणूक प्रकरणात व्यावसायीक संजय छाब्रिया (Sanjay Chhabria) यांची 251 कोटी रुपयांची मालमत्ता (property) आणि पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक (Famous entrepreneur ) अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची 164 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या प्रकरणात एकूण जप्ती 1,827 कोटी रुपयांवर पोहचली आहे, अशी माहिती ईडी (ED) कार्यालयाकडून देण्यात आली. दरम्यान, पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना डीएचएफएल आणि येस बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयने 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर त्यांना दहा दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

दोघांच्याही फ्लॅट, जमीन जप्त

ईडीने व्यावसायिक संजय छाब्रिया आणि ईडीच्या कस्टडीतील अविनाश भोसले यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली. दोघांची मिळून 415 कोटींची मालमत्ता जप्त केली. भोसलेंचे मुंबईतील डुप्लेक्स फ्लॅट, छाब्रियांची सांताक्रुझमधील आणि बंगळुरुमधील जमीन तसेच सांताक्रुझमधील तीन कोटींचा फ्लॅट जप्त केला. आतापर्यंत ईडीने 1827 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. छाब्रियांवर यापूर्वी सीबीआयकडून कारवाई झाली होती.

पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा सीबाआयचा आरोपपत्रातून दावा करण्यात आला आहे. त्यांची लंडनमधील मालमत्ताही आता वादात सापडली आहे. तीन दिवसांपूर्वी सीबीआयने अविनाश भोसलेंविरोधात आरोपपत्र दाखल केले त्यातून ही माहीती समोर आली आहे.

लंडनमधील ईमारतीची खरेदी 

लंडनमधील फाईस ट्रॅक ही अलिशान आणि ऐतिहासिक वारसा असलेली ईमारत 2018 मध्ये भोसलेंनी खरेदी केली होती. या ईमारतीत दोनशे खोल्यांच्या हाॅटेलमध्ये रुपांतर करण्याचा त्यांचा मनोदय होता. बर्मिंगहम पॅलेसजवळ ही मालमत्ता होती त्यामुळे भारतीय उद्योजकाने ही ईमारत खरेदी केल्यानंतर मोठी चर्चाही झाली होती.

ईमारत खरेदी एक हजार कोटींची

या हाॅटेलसाठी एक हजार कोटी रुपयांपैकी सातशे कोटी रुपये कर्ज स्वरुपात भोसलेंनी एस बॅंकेकडून घेतले. त्याचाच तपास सीबीआय करीत आहेत. या कर्जात अनियमितता आहे. हा व्यवहार सीबीआयच्या रडारवर आहे.  केवळ कन्सलटन्सी फ्री म्हणून सत्तर कोटी दिले गेले, रेडीयस ग्रूप आणि डीएचएफएलकडून यांच्याकडून एकूण सहाशे कोटी रुपये जमवले होते त्यात स्वतः तीनशे कोटींची रक्कम भरत व्यवहार ईमारत खरेदीसाठी केला होता. यामुळे व्यवहारांचा तपशील काय होता याचाच तपास सीबीआय करीत आहेत, सध्या अविनाश भोसले सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची परत सीबीआय कोठडी घेतली जाऊ शकते आणि परत चौकशी केली जाऊ शकते.

आधी झाली जप्तीची कारवाई

सीबीआयने डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसलेंवर ही कारवाई केली. भोसले यांचे नाव येस बँक घोटाळाप्रकरणीही चर्चेत होते. या दोन्ही प्रकरणांची सीबीआयने चौकशी सुरू केली होती. शिवाय याप्रकरणी पुणे - मुंबई परिसरातील तब्बल 8 ठिकाणी छापेमारी केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी