Coronil Tablet by Patanjali: पतंजलीचं कोरोनावर नवं औषध, कोरोनिल टॅबलेट लॉन्च

Patanjali Corona medicine: रामदेव बाबा यांच्या पतंजलीकडन कोरोनावर आयुर्वेदिक औषध लॉन्च करण्यात आलं आहे. हे औषध जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यताप्राप्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Yog Guru Baba Ramdev releases scientific research paper on the first evidence-based medicine for COVID19 by Patanjali
पतंजलीचं कोरोनावर नवं औषध  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • योग गुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीने पुन्हा लॉन्च केलं कोरोनावर औषध
  • केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत औषध लॉन्च
  • हे औषध जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यताप्राप्त असल्याचा रामदेव बाबा यांचा दावा

नवी दिल्ली : पतंजली (Patanjali) योगपीठाचे रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी कोविड-१९ (Covid-19) वर पुन्हा एक नवं औषध लॉन्च केलं आहे. शुक्रवारी (१९ फेब्रुवारी २०२१) एका पत्रकार परिषदेत रामदेव बाबा यांनी हे औषध लॉन्च केलं. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते.

रामदेव बाबा यांनी दावा केला आहे की, पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटमधील हे औषध जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रमाणित केले आहे. असाही दावा करण्यात आला आहे की, या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने GMP म्हणजेच 'गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस'चे प्रमाणपत्र दिले आहे.

कोरोनावरील हे औषध एव्हिडन्स बेस्ड असल्याचाही दावा करण्यात आला आहे. हे औषध लॉन्च करताना त्यांनी एक रिसर्च बूक सुद्धा लॉन्च केलं आहे. अशाच प्रकारचे १६ रिसर्च पेपर अद्याप रांगेत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी लॉन्च केलेल्या औषधावरुन वाद

२३ जून २०२० रोजी रामदेव बाबा यांच्या पतंजलीने 'कोरोना किट' लॉन्च केलं होतं. आयुष मंत्रालयाने म्हटलं होतं की, पतंजलीचं 'कोरोनिल' हे शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि ते सांगून 'कोरोनिल' विक्री करु शकतात. रामदेव बाबा यांनी कोरोनावरील औषध म्हणून हे लॉन्च करण्यात आले होते मात्र यावरुन वाद निर्माण होताच याला रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे औषध म्हणून संबोधण्यात आले.

कोविड-१९ रुग्णांसाठी 'कोरोनिल' लॉन्च करत बरे करण्याचा दावा केला होता. हे औषध लॉन्च होताच एक नवा वाद निर्माण झाला होता. उत्तराखंडमधील आयुष विभागाने कोरोनावरील औषध तयार करण्यास आवश्यक परवानगी किंवा परवाना न घेतल्याने पतंजली आयुर्वेदला नोटीस बजावली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी