Yoga Day 2022 : योग आहे भारतीय नेत्यांचा फिटनेस मंत्र, असे ठेवतात स्वतःला फिट अँड फाईन

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया भारतातील असे नेते जे नियमित योगासनं करतात आणि इतरांनाही व्यायाम करण्याची प्रेरणा देतात.

Yoga Day 2022
योग आहे भारतीय नेत्यांचा फिटनेस मंत्र  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान योगासने करून ठेवतात स्वतःला फिट
  • भारतातील अनेक नेते आहेत फिटनेस आयकॉन
  • नेत्यांचे व्यायामाचे व्हिडिओ होतात व्हायरल

Yoga Day 2022 | योग हे भारतानं जगाला दिलेलं वरदान आहे. भारतात योगाची परंपरा प्राचीन आहे. एकेकाळी भारताबाहेर कुणी योगाचं नावही ऐकलं नव्हतं. मात्र गेल्या काही दशकांमध्ये योगाचा प्रसार जगभर झाला आणि भारतात उदयाला आलेली ही जीवनकला जगानं स्विकारली आणि अंगिकारली. निरोगी, उत्साहपूर्ण आणि लवचिक आयुष्य जगण्यासाठी तशाच प्रकारचं शरीर असणं गरजेचं आहे, असं योग सांगतो. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही स्वास्थ्यांचा एकत्रित विचार करणारी ही व्यायाम आणि जीवनपद्धती काळाच्या ओघात किती फायदेशीर आहे, हे सर्वांनाच समजत गेलं. 

योग दिनाला सुरुवात

योगाचं हेच महत्त्व अधोरेखित होत राहावं आणि जगभरातील नागरिकांना योग करण्याची प्रेरणा मिळत राहावी, यासाठी 2014 साली मोदी सरकारनं संयुक्त राष्ट्रांना योग दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं. त्याला मान्यता देत 2015 सालापासून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होऊ लागला. 

अनेकजण करतात योग

भारतात योगासनांनी दिवस सुरू करणे हा अनेकांच्या दिनचर्येचा भाग असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आपल्या दिवसाची सुुरुवात योगानेच करतात. पंतप्रधानांशिवाय इतरही अनेक राजकीय नेते, मंत्री आहेत ज्यांचा दिवस प्रचंड व्यस्त असतो. मात्र तरीही ते व्यायामासाठी वेळ काढतात आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा योगासनांच्या मदतीने स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. जाणून घेऊया असे नेते आणि त्यांच्या व्यायामाची पद्धत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतात सध्याचे योगाचे सर्वात मोठे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारतीय योगाला त्यांनी देशात आणि जगभरात एक ओळख मिळवून दिली आहे. पंतप्रधानांच्या पुढाकारामुळेच दरवर्षी देशभरात योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

जगभरात भारतीय दूतावासातही योगदिन साजरा होतो. लेह आणि लडाखमध्ये सैनिक योगा करून जगाला संदेश देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा व्हिडिओ योगाचं महत्त्व विषद करतो. 

राजनाथ सिंह

देशापासून परदेशापर्यंत अनेक ठिकाणी प्रवास करण्यात देशाचे परराष्ट्रमंत्री राजनाथ सिंह व्यस्त असतात. या वयातही त्यांची ऊर्जा आणि उत्साह वाखाणण्यासारखा असतो. स्वतःला फिट ठेवण्यासाठी ते नियमित योगा करतात. 

किरेन रिजिजू

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू स्वतःला फिट ठेवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. योगासने आणि व्यायाम यांच्या माध्यमातून ते स्वतःला फिट ठेवत असतात. व्यायाम करतानाचे त्यांचे अनेक व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. 

अधिक वाचा - Sidhu Moosewala Murder : सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणात दोन मुख्य शूटर्सना अटक, शस्त्रास्त्रं आणि स्फोटकंही जप्त

जगात अनेक रोग, आजार आणि विकार धुमाकूळ घालत आहेत. त्यांच्याविरुद्ध स्वतःला मजबूत ठेवण्यासाठी व्यायामाची आणि फिटनेसची गरज असते. त्यासाठी योग हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं दिसून आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी