Food Crisis : अरे देवा! पैसा राहूनही नाही मिळणार अन्न; अवघ्या 27 वर्षात जगावर येणार अन्न संकट, एका भाकरीसाठी होईल पळापळ

आपण सर्व पहाटे पाच पासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पैशाच्या पाठीमागे धावतो. दोन शिफ्टमध्ये काम करुन मिळणाऱ्या पैशातून आपण आपलं पोट भरत असतो. सर्व मेहनत (Hard work) जी चालू आहे, ते फक्त पोटासाठी. परंतु वाढती महागाई आणि वाढती लोकसंख्यामुळे (Population) जमिनीसह (land) अन्य संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे.

 In just 27 years, the world will face a food crisis
2050 मध्ये लोकांच्या हातात पैसा असेल पण पोटात नसेल अन्न  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • येत्या 27 वर्षांत जगातील सर्व अन्न संपुष्टात येईल, हा मोठा दावा सर्वेक्षणात करण्यात आला आहे
  • सामाजिक आणि आर्थिक डेटा वॉचडॉग असलेली The World Count च्या अहवालानुसार, संपूर्ण जगावर असे अन्न संकट येणार
  • जगात गेल्या 40 वर्षांत एकूण जमिनीपैकी एक तृतीयांश जमीन कमी झाली आहे.

Food Crisis in Next 27 Years: नवी दिल्ली : आपण सर्व पहाटे पाच पासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पैशाच्या पाठीमागे धावतो. दोन शिफ्टमध्ये काम करुन मिळणाऱ्या पैशातून आपण आपलं पोट भरत असतो. सर्व मेहनत (Hard work) जी चालू आहे, ते फक्त पोटासाठी. परंतु वाढती महागाई आणि वाढती लोकसंख्यामुळे (Population) जमिनीसह (land) अन्य संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. वाचक मित्रांनो अवघ्या 27 वर्षांमध्ये संपूर्ण जगावर अन्नाचं (food) संकट (Crisis) येणार असून प्रत्येक माणूस एक-एक भाकरीसाठी त्रासणार आहे. तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुम्हाला एकावेळंचं जेवण शक्य नाहीये. हो, एका संशोधनात या संकटाची बाब समोर आली आहे.  

2050 पर्यंत संपेल धान्य 

सामाजिक आणि आर्थिक डेटा वॉचडॉग असलेली The World Count च्या अहवालानुसार, संपूर्ण जगावर असे अन्न संकट येणार आहे की 2050 पर्यंत संपूर्ण जगातून अन्नधान्य संपुष्टात येईल. त्याच्या अहवालाच्या प्रकाशनासह The World Count ने धान्याच्या शेवटचे काउंटडाउनही त्यांच्या वेबसाइटवर टाकण्यात आले आहे. या काउंटडाउननुसार, पृथ्वीवरील धान्य संपायला आता २७ वर्षे उरली आहेत.

अन्नाची मागणी 70 टक्क्यांपर्यंत वाढेल

अहवालात The World Count ने सांगितलं की, 2050 पर्यंत जगाची लोकसंख्या एक हजार कोटींच्या पुढे जाईल. अशा परिस्थितीत सन 2017 च्या तुलनेत 2050 मध्ये अन्नधान्याची मागणी 70 टक्क्यांनी वाढेल. अहवालात असे म्हटले आहे की पृथ्वी दरवर्षी 7500 दशलक्ष टन सुपीक माती गमावत आहे. जगात गेल्या 40 वर्षांत एकूण जमिनीपैकी एक तृतीयांश जमीन कमी झाली आहे. त्याचबरोबर अन्नाची मागणी एवढी वाढली आहे की, येत्या ४० वर्षांत पृथ्वीवरील लोकांच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी जेवढे धान्य उत्पादन करावे लागेल, तेवढे उत्पादन गेल्या ८ हजार वर्षांत झाले नाही. म्हणजेच एकीकडे जगातील सुपीक जमीन दरवर्षी कमी होत आहे. तर दुसरीकडे लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. 

धान्य संपल्यावर मांसाला पर्याय नाही

The World Count च्या अहवालानुसार, जेव्हा धान्य संपले तेव्हा मांस खाणे हा पर्याय नाही कारण मांस स्वतः तयार करण्यासाठी कॉर्नपेक्षा 75 पट जास्त ऊर्जा लागते, जे उत्पादन करणे अशक्य आहे.  The World Count च्या अहवालानुसार, 2030 पर्यंत तांदळाच्या किमतीत आजच्या तुलनेत 130 टक्के आणि मक्याच्या किमतीत 180 टक्क्यांनी वाढ होईल. आज जग ज्या उंबरठ्यावर उभे आहे, त्यावरून भविष्यात अन्न आणि पाण्यावरूनही युद्ध होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. The World Count च्या अहवालात  असं म्हटलंय की, आजच्या काळात माणूस ज्याप्रकारे पृथ्वीचा वापर आपल्या स्वार्थासाठी करत आहे, अशा स्थितीत 2030 सालानंतर प्रत्येक माणसाच्या खाण्यापिण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन पृथ्वीची गरज भासेल, कारण आजच्या काळात मानवाने पृथ्वीचं 75 टक्के शोषण केलं आहे. 

Read Also : पंजाबमध्ये पतियाळात हिंसा, शिवसेनेच्या हरिश सिंगलाला अटक

एकीकडे पृथ्वीवर अन्नधान्याचे संकट गडद होत असताना दुसरीकडे अन्नाची नासाडी करण्यास आम्ही आणि तुम्ही मागे हटत नाही.  मागील वर्षी संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या UN Food Waste Index Report 2021 च्या नुसार,  जगभरात, 2019 मध्ये 93 दशलक्ष टनांहून अधिक अन्न वाया गेले, जे एकूण उपलब्ध अन्नाच्या 17 टक्के होते.  UN Food Waste Index Report 2021 त्यानुसार जगातील प्रत्येक व्यक्ती दरवर्षी १२१ किलो अन्न वाया घालवते.

दिल्ली विद्यापीठातील पर्यावरण विभागाचे प्राध्यापक डॉ. आर.एस. शर्मा म्हणाले की, जेव्हा आपण अन्न संकटाबद्दल बोलतो तेव्हा जगात आणि भारतातही अन्न संकटाची कारणे पाहावी लागतील.  आज भारतात भूजल पातळी कमी होत आहे आणि भारतातील वाढत्या लोकसंख्येमुळे सुपीक जमिनीचा अभावही घडत आहे. भारतात अन्न संकट निर्माण करण्यासाठी या दोन्ही गोष्टी पुरेशा आहेत. अशा परिस्थितीत भावी पिढ्या उपासमारीने मरणार नाहीत यासाठी जमेल तितके जमीन आणि पाण्याचे संवर्धन करण्याची गरज आहे.

Read Also : ट्विटर आपल्या ताब्यात आल्यानंतर इलाॅन मस्कचा हा मास्टर प्लॅन

आहारतज्ञ डॉ. शिखा शर्मा यांनी सांगितले की, जेवणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तेवढेच अन्न खा, जेणेकरून तुमचे वजन वाढू किंवा कमी होत नाही आणि ते वाया जाऊ नये. सकाळी फळांसह हलका नाश्ता, मसूर, दुपारी चीज असे प्रथिनेयुक्त अन्न आणि रात्री हिरव्या भाज्या खाणे हा निरोगी जीवनाचा मंत्र आहे. भारतात म्हटलं जातं की, ताटात तितकचं जेवण घ्या परत नाल्यात जाणार नाही. अशा वेळी आमचे तुम्हालाही आवाहन आहे की, तुमच्या ताटात जेवढे अन्न तुमच्या पोटात जाईल तेवढेच खावे, डस्टबिनमध्ये नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी