Indian Railways: रेल्वेने दिली खुशखबर! उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रेनमध्ये मिळणार कन्फर्म सीट 

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 30, 2022 | 11:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indian Railway Update । भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता रेल्वेमध्ये प्रवाशांना रिजर्वेशनदरम्यान कन्फर्म सीट मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने ७२ रेल्वे गाड्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 

 You will get a fixed seat in the train for summer vacation
उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रेनमध्ये मिळणार कन्फर्म सीट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.
  • आता रेल्वेमध्ये प्रवाशांना रिजर्वेशनदरम्यान कन्फर्म सीट मिळणार आहे.
  • उत्तर पश्चिम रेल्वेने ३६ जोड्यांमध्ये म्हणजेच एकूण ७२ गाड्यांमध्ये ८१ डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Indian Railway Update । नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता रेल्वेमध्ये प्रवाशांना रिजर्वेशनदरम्यान कन्फर्म सीट मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने ७२ रेल्वे गाड्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. (You will get a fixed seat in the train for summer vacation). 

उन्हाळी सुट्टी लक्षात घेऊन घेतला निर्णय

बहुतांश वेळा उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि सणांवेळी ट्रेनचे तिकीट बुक करताना सीटच्या जागा आधीच भरलेल्या असतात. अशा परिस्थितीत तिकीट बुकींग करताना लोकांना जागा मिळत नाही. या काळात तत्काळा तिकीट बुक करणे अवघड होऊन बसते, काउंटर उघडताच काही मिनिटांत जागा बुक होतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने अनेक गाड्यांमधील डब्यांची संख्या देखील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

रेल्वेच्या या मोठ्या निर्णयाने ट्रेनचे तिकिट बुक करताना सीट कन्फर्म मिळण्याची संभावना वाढली आहे. हे पाहता उत्तर पश्चिम रेल्वेने ३६ जोड्यांमध्ये म्हणजेच एकूण ७२ गाड्यांमध्ये ८१ डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

अधिक वाचा : Diabetes : ‘ही’ 5 प्रकारची पाने शुगर ठेवतील नियंत्रणात

या गाड्यांचे वाढवले जाणार डबे 

दरम्यान, १ मे ते १ जून २०२२ या कालावधीत रोहिल्ला-जोधपूर-दिल्ली-सराय रोहिल्ला ट्रेनमध्ये २ थर्ड एसी आणि २ सेकंड स्लीपर क्लासच्या डब्ब्यांच्या संख्येमध्ये तात्पुरती वाढ करण्यात आली आहे. जोधपूर-वांद्रे टर्मिनस-जोधपूर ट्रेनमध्ये ४ मे ते ३ जून २०२२ या कालावधीत डब्ब्यांची संख्या तात्पुरती वाढवली जात आहे. यामध्ये २ थर्ड एसी आणि २ सेकंड स्लीपर क्लास डबे वाढवण्यात येणार आहेत. बिकानेर-दिल्ली सराय रोहिला-बिकानेर या ट्रेनच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये १ मे ते २ जून दरम्यान तात्पुरती वाढ करण्यात आली आहे. यामध्ये २ सेकंड स्लीपर क्लास डब्ब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. 

तर दुसरीकडे भिवानी-कानपूर-भिवानी या दोन्ही फेऱ्यांमध्ये १ मे ते १ जून दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यामध्ये एक थर्ड एसी आणि एक सेकंड स्लीपर क्लासचा डबा वाढवण्यात येणार आहे. सराय रोहिल्ला-उदयपूर शहर-दिल्ली सराय रोहिल्ला या गाड्यांमध्ये १ मे ते १ जून या कालावधीत २ सेकंड स्लीपर क्लासच्या डब्ब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. उदयपूर शहर-खजुराहो-उदयपूर शहरांमध्ये १ मे ते ३ जूनपर्यंत थर्ड एसी आणि १ सेकंड स्लीपर क्लास डब्ब्याची संख्या वाढवण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी