Young Businessman dies of heart attack :परभणी : मागील काही दिवसात ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू पावणाऱ्यांच्या बातम्या समोर येत आहेत. यात तुलनेने तरुण अधिक आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या मृत्यूमुळे अचानक उद्भवणाऱ्या ह्रदयविकाराच्या झटक्यांचा प्रश्न अतिशय ऐरणीवर आला. आता अशीच एक धक्कादायक घटना परभणी (Parbhani)येथे घडली आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने एका तरुण व्यावसायिकाचा (Young Businessman) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत व्यावसायिकाचे नाव सचिन तापडिया (Sachin Tapadiya)असे आहे. ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर सचिन तापडिया यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. (Young businessman dies of heart attack while playing badminton at Parbhani)
अधिक वाचा : 7th Pay Commission : या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! डीएमध्ये 5% ची वाढ
सचिन तापडिया यांच्या झालेल्या अचानक मृत्यूमुळे परिसरातील सर्वानाच धक्का बसला आहे. ही घटना गुरुवारी (25 ऑगस्ट) घडली. सचिन तापडिया यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठेच संकट कोसळले आहे. त्यांना दोन मुले असून पित्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे या मुलांवरील पित्याचे छत्र हरवले आहे. परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन तापडिया हे परभणी शहरातील व्यापारी होते. ते बॅडमिंटन खेळत असतानाच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. उपचारासाठी त्यांना परभणीतीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्देवाने सचिन तापडिया यांचा मृत्यू झाला.
सचिन तापडिया हे परभणीतील व्यावसायिक होते. त्यांची तापडिया ड्रायव्हिंग स्कूल नावाची नामांकित ड्रायव्हिंग स्कूल परभणीमध्ये आहे. याचबरोबर ते फायनान्स आणि इतर व्यवसायातदेखील कार्यरत होते. त्यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार येणार आहेत. सचिन तापडिया यांच्या कुटुंबाला या घटनेने मोठाच धक्का बसला आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. त्यांच्या पत्नीवर आणि मुलांवर या घटनेने मोठेच संकट ओढवले आहे. तापडियांच्या आकस्मिक मृत्यूमुळे दोन्ही मुलांवरील पित्याचे छत्र हरवले आहे.
अधिक वाचा : Liquor side effects : मद्यशौकिनांसाठी धोक्याची घंटा! ही लक्षणं दिसली तर लगेच थांबवा मद्यपान
मागील काही महिन्यांपासून अचानक उद्भवणाऱ्या ह्रदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढले आहे. राजू श्रीवास्तव यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल केल्यानंतर या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडे अनेक सेलिब्रिटींना ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची प्रकरणे घडली आहेत. विशेष म्हणजे यातील अनेकांना व्यायाम करतानाच ह्रदयविकाराचा झटका आला होता. यातील अनेक वयाने तरुणच होते. वरकरणी तंदुरुस्त दिसणाऱ्या व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक का यावा याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात चिंता आणि भीती निर्माण होते आहे. सचिन तापडिया यांनादेखील बॅडमिंटन खेळतानाच हार्ट अटॅक आल्याने त्यांचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला आहे.