Crime News: तरूणाने यूट्यूबवरून शिकले बॉम्ब बनवण्याचे कौशल्य; पैसे परत मिळवण्यासाठी शेजाऱ्याला उडवण्याचा केला प्रयत्न 

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 03, 2022 | 13:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Crime News । उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने त्याचे पैसे परत मिळवण्यासाठी त्याच्या शेजाऱ्याला चक्क बॉम्बस्फोट करून उडविण्याचा प्रयत्न केला आहे.

 young man learned the skill of making bombs from YouTube
पैसे परत मिळवण्यासाठी शेजाऱ्याच्या गेटवर केला बॉम्बस्फोट   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • तरूणाने यूट्यूबवरून शिकले बॉम्ब बनवण्याचे कौशल्य.
  • पैसे परत मिळवण्यासाठी शेजाऱ्याला उडवण्याचा केला प्रयत्न.

Crime News । बागपत : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने त्याचे पैसे परत मिळवण्यासाठी त्याच्या शेजाऱ्याला चक्क बॉम्बस्फोट करून उडविण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणातील अनेक दिवसांच्या तपासानंतर रणवीर नावाच्या आरोपीला उत्तर प्रदेशातील पोलिसांनी अटक केली आहे. (young man learned the skill of making bombs from YouTube). 

अधिक वाचा : महाराष्ट्रात पुन्हा कोरोना निर्बंध लागणार...

 यूट्यूबवरून शिकले बॉम्ब बनवण्याचे कौशल्य

चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बॉम्ब बनवण्याचे त्याने कौशल्य शिकले. ही घटना चार दिवसांपूर्वी बागपत जिल्ह्यातील बरौत पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या बिजरोल गावात घडली. पोलिसांनी आरोपीच्या घरातून बॉम्ब बनवण्याच्या अनेक वस्तूही जप्त केल्या आहेत. २७ मे रोजी रणवीरने कामेश नावाच्या शेजाऱ्याच्या गेटवर इलेक्ट्रॉनिक बॉम्ब लावला होता. गेट उघडल्यानंतर बॉम्बचा स्फोट झाला, तेव्हा कामेशचा मुलगा गौतम गंभीर जखमी झाला अशी माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, यूपी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स (STF) आणि दहशतवादविरोधी पथकाने (ATS) या घटनेची चौकशी केली. कामेशने आरोप केला की रणवीरला त्याच्याकडून चार लाख रुपये देणे बाकी आहेत त्यामुळेच त्याने आपल्या कुटुंबाला मारण्यासाठी बॉम्बस्फोटाचा कट रचला. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यानंतर बुधवारी पोलिसांनी रणवीरला अटक केली.

 बरौत मार्केटमधून केली खरेदी 

आरोपीने बॉम्बच्या सर्व साहित्याची खरेदी बरौत मार्केटमधून केली होती. रणवीरने पोलिसांना सांगितले की त्याने बाजारातून सल्फर, पोटॅश आणि बॅटरी इत्यादी साहित्य विकत घेतले. नंतर त्यांच्या शेतात जाऊन बॉम्ब बनवून त्याची चाचणीही केली. २६ मे रोजी रात्री रणवीरने कामेशच्या गेटवर बॉम्ब बांधून ठेवला, नंतर गेट उघडल्यावर त्याचा स्फोट झाला. तसेच आरोपी दहावीच्या परीक्षेत नापास झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी