Five Family Member Murder: कुटुंबातील पाच जणांचा खून केल्यानंतर युवकाची आत्महत्या; कर्ज की घातपात, सुसाईट नोटमध्ये देणं- घेण्याचा उल्लेख

एकाच कुटुंबातील (family) सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना अंबाला शहरालगत असलेल्या बलाना गावात घडली आहे. शुक्रवारी पहाटे ही बाब उघडकीस येताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. घरातील प्रमुख मुलाने परिवारातील इतर पाच लोकांना विषारी पदार्थ (toxic substances) देऊन त्यांचा खून (murder) केला त्यानंतर स्वत:ला गळफास (hanging) लावत आत्महत्या केलीय.

Youth commits suicide after killing five family members
कुटुंबातील पाच जणांचा खून केल्यानंतर युवकाची आत्महत्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कुटुंबातील कोणतीच व्यक्ती बाहेर आली नसल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांना वेगळा संशय आला.
  • एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

अंबाला : एकाच कुटुंबातील (family) सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना अंबाला शहरालगत असलेल्या बलाना गावात घडली आहे. शुक्रवारी पहाटे ही बाब उघडकीस येताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. घरातील प्रमुख मुलाने परिवारातील इतर पाच लोकांना विषारी पदार्थ (toxic substances) देऊन त्यांचा खून (murder) केला त्यानंतर स्वत:ला गळफास (hanging) लावत आत्महत्या केलीय. दरम्यान मृतांची ओळख पटली असून संगत सिंह 65, त्यांची पत्नी महिंद्र कौर (62), मुलगा सुखविंदर सिंह (32), सुखविंदर यांची पत्नी प्रमिला (28) आणि  दोन नाती असल्याचं सांगण्यात येत आहेत. सुखविंदर सिंग हा यमुनानगर येथील एका दुचाकी कंपनीत कामाला होता.  (Youth commits suicide after killing five family members)

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळपासून घराबाहेर या कुटुंबातील कोणतीच व्यक्ती बाहेर आली नसल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांना वेगळा संशय आला. या परिवारात काय झालं हे पाहण्यासाठी शेजारी त्यांच्या घराजवळ पोहचले तर त्यांना कुटुंबातील सर्वजण बेशुद्ध पडलेले दिसले. हे पाहून घाबरलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह अंबाला शहरातील ट्रॉमा सेंटरच्या शवागारात ठेवले आहेत. फॉरेन्सिक तज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेची पाहणी करत आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात लाखोंच्या व्यवहाराचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. 

Read Also : तुमचा IQ असेल ग्रेट तर डोकं न खाजवता शोधा तिसरा प्राणी

डीएसपी अंबाला जोगिंदर शर्मा यांनी सांगितले की, दोन मुलांसह एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. यासोबतच क्राईम टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरून आम्हाला सुसाईड नोट सापडली असून पुढील तपास सुरूच आहे. 

Read Also : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म

दरम्यान ही आत्महत्या आहे का काही घातपात यापैकी कोणत्या एका निर्णय पोहचलेली नाही. सुसाईडप्रमाणे पाहिले तर खून आणि आत्महत्येची केस दिसत आहे. परंतु यात घातपात असण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सांगली येथे दोन भावाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा खून झाला होता. या प्रकरणातही सुरुवातीला सामूहिक आत्महत्या वाटणाऱ्या घटनेते मोठा खुलासा झाला होता.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी