तरुणींच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Crime News: दोन तरुणींकडून सातत्याने सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंमगला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे.

Representative Image
तरुणींच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल (प्रातिनिधिक फोटो) 
थोडं पण कामाचं
  • तरुणींच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या
  • तरुणींकडून सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगबाबत मृतक तरुणाने काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांना दिली होती कल्पना

भोपाळ : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधील एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. धक्कादायक म्हणजे दोन तरुणींकडून सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगमुळे या तरुणाने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणींच्या विरोधात तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, साधारणत: असे दिसून येते की तरुणांच्या त्रासाला कंटाळून एखादी मुलगी टोकाचं पाऊल उचलते. मात्र, इथे वेगळीच घटना समोर आली आहे. तपासात असे आढळून आले आहे की, दोन मुलींच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून या तरुणाने आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणींनी मृतक मनीष याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मनीष याने आपल्या घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप तरुणींनी यापूर्वी केला होता. त्यानंतर या प्रकरणात दोन्ही तरुणींनी कोर्टात मनीष सोबत प्रकरण मिटवलं. कोर्टात प्रकरण मिटवल्यानंतर दोन्ही तरुणींनी मनीष याच्याकडून दोन लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर पैसे दिले नाहीत तर पुन्हा दुसरा गुन्हा दाखल करू अशी धमकीही या तरुणींनी मनीषला दिली होती.

 हे पण वाचा : मध्यरात्री टॉयलेटला गेला पती अन् परतल्यावर बेडवर पत्नी....

या तरुणींच्या धमकीमुळे मनीष त्रस्त झाला होता. त्याला कंटाळूनच मनीषने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. तरुणींकडून मिळणाऱ्या धमकीच्या संदर्भात सर्व माहिती मनीषने आपली आई आणि आत्याला दिली होती. त्याने आपल्या एका भावाला व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवला होता आणि त्या व्हिडिओत त्याने तरुणींकडून सुरू असलेलं ब्लॅकमेलिंगचा उल्लेख करत आत्महत्या करण्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यावेळी मनीषच्या भावाने त्याला समजावलं होतं.

मनीष आपल्या कुटुंबीयांना वारंवार सांगत होता की, घर विक्री करुया आणि त्यातून येणारे पैसे त्या मुलींना देऊया. संबंधित तरुणींकडून सुरू असलेलं ब्लॅकमेलिंग दिवसेंदिवस वाढत होतं आणि त्यालाच कंटाळून मनीषने आत्महत्या केली. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस उपायुक्त झोन २ भोपाळचे राजेश भदौरिया यांनी सांगितलं की, या प्रकरणी संबंधित तरुणींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी