Crime News: दारूसाठी मित्राकडून उधार घेतले ५०० रुपये अन् परत मागताच पोटात खुपसला चाकू

youth stabbed by his friend: मित्रानेच आपल्या मित्राची चाकू खुपसून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अवघ्या पाचशे रूपयांसाठी ही हत्या झाल्याची माहिती उघड झाली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दारू पिण्यासाठी मित्राने मित्राला उधार दिले पाचशे रूपये 
  • उधार दिलेले पैसे परत मागणं तरुणाला पडलं भारी
  • उधारीचे पैसे देण्याऐवजी मित्राच्या पोटात खुपसला चाकू

Crime News in Marathi: देशाची राजधानी दिल्ली (Delhi)तून एक खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील ज्योती नगर परिसरात एका तरुणाने आपल्याच मित्राची चाकू खुपसून निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे अवघ्या ५०० रुपयांसाठी ही हत्या झाली आहे. उधार दिलेले पैसे मागितल्याने संतप्त झालेल्या तरुणाने मित्राच्या पोटात चाकू खुपसला. (youth stabbed by his friend after he asked to return Rs 500 which borrowed for alcohol in delhi)

काय आहे प्रकरण? 

मृतक तरुणाचे नाव जावेद असे आहे. तो आपल्या कुटुंबासोबत कर्दमपुरी परिसरात राहत होता. त्याच्या कुटुंबात वडील अब्दुल गफ्फार यांच्यासोबत पत्नी आणि दोन मुले, भाऊ-बहीण आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद हा टेम्पो चालक होता. जावेदच्या शेजारी राहणाऱ्या उबैद यानेच त्याची हत्या केली आहे. उबैद हा सुद्धा आपल्या परिवारासोबत राहतो. तर त्याचा भाऊ शेरखान हा एक गुंड आहे. जावेद आणि उबैद यांच्यात घट्ट मैत्री होती अशी सुद्धा माहिती पोलिसांनी दिली आहे.

अधिक वाचा : Viral Video : मास्तरांनी असे उच्चारले रंग की भल्याभल्यांची तंद्री झाली भंग! व्हिडिओ पाहून व्हाल दंग..

दारूसाठी धमकी 

पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत जावेदच्या कुटुंबीयांनी म्हटलं, उबैद आणि जावेद हे नेहमी एकत्र राहत होते. आरोपी उबैद याने जावेदकडून काही दिवसांपूर्वी दारूसाठी ५०० रुपये घेतले होते. इतकेच नाही तर उबैद हा पैशांसाठी वारंवार जावेदला धमकावत होता. त्यामुळेच जावेद हा उबैदपासून दूर राहू लागला होता.

अधिक वाचा : Family Horse : कुटुंबाला वाचवण्यासाठी घोड्याची आगीत झेप, ‘फॅमिली हॉर्स’चा व्हिडिओ पाहून येईल डोळ्यात पाणी

काही दिवसांपूर्वी दिलेले ५०० रुपये जावेद याने मागितले. त्यानंतर उबैद हा चांगलाच संतापला. रागाच्या भरात उबैद याने आपल्या खिशातून चाकू काढून जावेदच्या पोटात खुपसला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तेथे मृतक जावेद याचे कुटुंबीय आणि उबैद याचा भाऊ शेरखान हा सुद्धा उपस्थित होता. जावेदवर हल्ला झाल्यानंतर त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जावेद याचा मृत्यू झाला.

रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आरोपी उबैद याला अटक केली आहे. तर आरोपी उबैद याचा भाऊ शेरखान हा फरार आहे. शेरखान याचा शोध पोलीस घेत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी