नवी दिल्ली : गँगस्टर (Gangster) अतीक अहमद (Atiq Ahmed)आणि अशरफ (Ashraf) यांच्या हत्येचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या पोलीस (Police) तपासात नवं-नवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांपासून जे पिस्तूल जप्त केलं आहे ते तुर्कीमध्ये बनत असल्याची माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे भारतात या पिस्तूलवर बंदी आहे. अशाच प्रकारच्या बंदुकीद्वारे सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली होती. आपण या पिस्तूलचे वैशिष्ट्ये जाणून घेऊ. आणि हल्लेखोरांकडे ही पिस्तूल कसे पोहचले याची माहिती या लेखातून घेऊ. (Atiq-Ashraf's extermination gun fires 20 rounds in 18 seconds; A pistol made in Turkey)
अधिक वाचा : लग्न करं असं का म्हणतात घरचे लोक; वाचा पालकांची कारणं
पोलिसांनी या मारेकऱ्यांना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे. या मारेकऱ्यांची ओळख सनी, अरुण मौर्य आणि लवलेश तिवारी अशी झाली आहे. हे तिघे मीडिया कर्मचारी म्हणून तेथे आले होते. हे तिघे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आले होते. तिघांनी 48 तासापासून प्रयागराजमध्ये एका हॉटेलमध्ये थांबले होते.
अधिक वाचा : 12 आर्टमध्ये केली, आता पुढे काय करायचं प्रश्न पडलाय
अतिक आणि अशरफ यांची हत्या करणारे मारेकरी ज्या दुजाकीने आले होते, त्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. या बाईकचा नंबर UP70M7337 असा असून ही बाईक सरदार अब्दुल मन्नान खान यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे. ही बाईक हिरो होंडाची CD-100ss जुनी गाडी आहे. ही बाईक 3 जुलै 1998 रोजी रोकड देऊन विकत घेतली होती. ही बाईक कुठून आणली होती, मारेकऱ्यांना कोणी दिली होती. याचा तपास पोलीस करत आहेत.
अतीक आणि अशरफ यांची हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल जिगाना मेड पिस्तूल आहे. तुर्कीमध्ये ही पिस्तूल बनवली जात असून ही बंदुक पाच ते सहा लाख रुपयात मिळते. भारतात या पिस्तूलला बंदी आहे, त्यामुळे दुसऱ्या देशातून अवैधपणे ही पिस्तूल आणली जाते. मिळालेल्या माहितीनुसार या पिस्तूलमध्ये 17 गोळ्या लोड केल्या जातात. अतीक अहमदची हत्या करण्यात आली तेव्हा अनेक गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या पिस्तूलच्या एका प्रकारच्या मॉडलने सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली होती.
अधिक वाचा : या टीप्स करा फॅलो अन् कमी पैशात करा भटकंती
तुर्कीमध्ये बनवलेले जिगाना मेड पिस्तूल मलेशियाचे लष्कर, अझरबैजान आर्मी, फिलिपाइन्स आर्मी देखील वापरतात.
हे पिस्तूल पूर्णपणे स्वयंचलित असून एकाच वेळी अनेक राऊंड फायर करता येतात.पाकिस्तानमार्गे भारतात बेकायदेशीरपणे त्याचा पुरवठा केला जातो. ड्रोनद्वारे पाकिस्तानमधून भारतात त्याचा पुरवठा केला जातो.