Zimbabwe reports increase in pregnancies : कोरोनामुळे शाळा बंद, विद्यार्थिनी गरोदर; झिम्बाब्वेतील धक्कादायक घटना

Zimbabwe reports increase in pregnancies among girls and teenagers amid pandemic : कोरोनामुळे शाळा बंद असताना विद्यार्थिनी मोठ्या संख्येने गरोदर राहिल्या. काही विद्यार्थिनींची बाळंतपणं झाली आणि शिक्षण घ्यायच्या वयात विद्यार्थिनींवर आईपणाची जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली आहे. या धक्कादायक घटना झिम्बाब्वेत घडल्या. 

Zimbabwe reports increase in pregnancies among girls and teenagers amid pandemic
कोरोनामुळे शाळा बंद, विद्यार्थिनी गरोदर; झिम्बाब्वेतील धक्कादायक घटना 
थोडं पण कामाचं
  • कोरोनामुळे शाळा बंद, विद्यार्थिनी गरोदर; झिम्बाब्वेतील धक्कादायक घटना
  • झिम्बाब्वेत मुलींच्या शोषणाचे प्रमाण भयानक वेगाने वाढत आहे
  • कोरोना संकटात झिम्बाब्वेमधील मुलींच्या शोषणाचा प्रश्न आणखी गंभीर झाला

Zimbabwe reports increase in pregnancies among girls and teenagers amid pandemic : नवी दिल्ली : कोरोनामुळे शाळा बंद असताना विद्यार्थिनी मोठ्या संख्येने गरोदर राहिल्या. काही विद्यार्थिनींची बाळंतपणं झाली आणि शिक्षण घ्यायच्या वयात विद्यार्थिनींवर आईपणाची जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली आहे. या धक्कादायक घटना झिम्बाब्वेत घडल्या. 

कोरोना संकटाची सुरुवात होण्याआधी गरीबीमुळे अनेक पालक मुलींचे १८ वर्ष होण्याआधीच लग्न लावून देत होते. यामुळे झिम्बाब्वेत दर तीन मुलींपैकी एकीचे लग्न १८ वर्ष होण्याआधीच होत होते. यातून अनेक मुली लवकर गरोदर राहू लागल्या होत्या. कोरोना संकट सुरू झाल्यानंतर तर लग्न झालेल्या तसेच अविवाहीत असलेल्या अशा अनेक अल्पवयीन मुली गरोदर राहू लागल्या आहेत. झिम्बाब्वेत मुलींच्या शोषणाचे प्रमाण भयानक वेगाने वाढत आहे. 

लॉकडाऊन काळात झिम्बाब्वेत आरोग्य व्यवस्थेचा भर कोरोना संकट हाताळण्यावर होता. विद्यार्थिनींचे लैंगिक शिक्षण, मुलींची आरोग्य तपासणी, मुलींना गर्भनिरोधक गोळ्या आणि साधनांचा पुरवठा करणे हे सर्व थांबले होते. यामुळे कोरोना संकट सुरू झाल्यानंतर मुलींच्या शोषणाचे प्रश्न झिम्बाब्वेमध्ये आणखी वाढले. 

झिम्बाब्वे सरकारने ऑगस्ट २०२० मध्ये कायदा करुन गरोदर मुलींना शाळेत येऊन शिक्षण घेण्याची परवानगी दिली होती. पण या कायद्याचा शिक्षण प्रसार हा हेतू अपयशी ठरला. मुली शाळेत येण्याचे प्रमाण कमी झाले. गरीबीमुळे मुली शाळेत जाण्याचे प्रमाण घटले आणि त्या गरोदर राहण्याचे प्रमाण वाढले. 

झिम्बाब्वे सरकारच्या कायद्यानुसार १६ पेक्षा कमी वयाच्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे बेकायदा आहे. पण असंख्य मुलींच्या बाबतीत या कायद्याचे उल्लंघन झाले तरी लेखी तक्रार नोंदविली जात नाही. यामुळे झिम्बाब्वेमधील मुलींच्या शोषणाचा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे.

चिंतेची बाब म्हणजे आफ्रिकेत एकटा झिम्बाब्वे हाच देश नाही तर आणखीही काही देशांमध्ये कमी-जास्त प्रमाणात मुलींचे शोषण सुरू आहे. दुर्दैवाने झिम्बाब्वेसह आफ्रिकेतील अनेक गरीब देशांकडे मुलींबाबतची वेगवेगळ्या प्रकारची माहिती अचूक आणि सविस्तर स्वरुपात नोंदविलेली नाही. यामुळे समस्येचे स्वरुप जाणून घेण्यासाठी अॅम्नेस्टी इंटरनॅशनल सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अहवालांचाच आधार घ्यावा लागतो. 'अॅम्नेस्टी इंटरनॅशनल'च्या अहवालानुसार झिम्बाब्वे, बोत्सवाना, नामीबिया, लेसोथो, मलावी, मेदागास्कर, दक्षिण आफ्रिका आणि झाम्बिया या देशांमध्ये मुलींच्या शोषणाशी संबंधित परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आफ्रिका या खंडात लहान वयात मुली गरोदर राहण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. 

गरीबीमुळे मुले सांभाळणे कठीण आहे. या परिस्थितीत घरात मुलगी जन्माला आली तरी खाणारी तोंड वाढतात. हा वाढणारा खर्च करण्यापेक्षा मुलीचे लहान वयात लग्न लावून दिले तर तिच्या जबाबदारीतून लवकर मोकळे होता येते. या बुरसटलेल्या विचारातून आफ्रिकेतील अनेक गरीब घरांमध्ये लहान वयातच मुलींचे लग्न लावून पालक हात झटकत आहेत. यामुळे मुलींच्या शोषणाचा प्रश्न सोडवणे हा आफ्रिकेत काम करणाऱ्या स्वयंसेवींसाठी आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचा प्रश्न झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी