Zomato Deliver boy Beaten : मुंबई : एका महिलेने फूड डिलिव्हर करणार्या डिलिव्हरी बॉयला जबर मारहाण केली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक महिला बुटेने एका डिलिव्हरी बॉयला मारताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर तो डिलिव्हरी बॉय या व्हिडीओमध्ये हतबल आणि रडताना दिसत आहे. ट्विटरवरील @bogas04 या युजरने हा व्हिडीओ शेअर केला होता.
युजरने हा व्हिडीओ पोस्ट करून यासंबंधित माहिती दिली होती होती की. झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय त्याची फूड ऑर्डर घेऊन आला तेव्हा तो रडत होता. एका महिलेन आपल्याला मारहाण केल्याचे त्याने सांगितले. या महिलेने या डिलिव्हरी बॉयला अडवले आणि हे पार्सल आपले असल्याचे सांगितले. परंतु डिलिव्हरी बॉयने हे पार्सल तुमचे नसल्याचे त्या महिलेला सांगितले. परंतु ती महिला ऐकण्याच्या तयारीत नव्हती. तिने या डिलिव्हरी बॉयला मारहाण करण्यास सुरूवात केली. इतकेच नाही तर या महिलेने बुटाने या तरुणाला मारहाण केली. हा डिलिव्हरी बॉय तिथे गप्प उभा होता आणि महिलेचा मार खात होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. परंतु ती महिला त्याला मारतच होती. आपली नोकरी जाईल या भितीने तो काही बोलत नव्हता. त्या युजरने झोमॅटोकडे याबद्दल तक्रार केली आहे. डिलिव्हरी बॉयला एका महिलेने मारल्याचे या युजरने झोमॅटेला सांगितले, त्यावर झॉमॅटोने याची दखल घेतल्याचे सांगितले.
Hello @zomatocare @zomato — Deepika Narayan Bhardwaj (@DeepikaBhardwaj) August 22, 2022
Can anyone hit ur delivery executives like this anywhere? This delivery boy was delivering @bogas04 order (#4267443050) when she hit him with her shoes. He's crying. It happened 6 days ago. No update from you yet. Why? How can she hit like that? pic.twitter.com/8s64jcoXYb
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्संनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी महिलेवर कारवाई व्हावी अशी मागणी नेटकर्यांनी केली आहे.
Hi Deepika, thanks for highlighting this, we're looking into this and will contact the delivery partner. https://t.co/jcTFuGSv2G — zomato care (@zomatocare) August 22, 2022
फूड डिलिव्हरी बॉयला मारहाण होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरात असाच एक प्रकार समोर आला होता. डिलिव्हरी बॉय दलित असल्याने आपण त्याच्याकडून ऑर्डर स्विकारणार नाही असे त्या ग्राहकाने सांगितले इतकेच नाही तर त्या डिलिव्हरी बॉयलाही मारहाण करण्यात आली होती. तमिळनाडूमध्ये एका वाहतूक पोलीस कर्मचार्याने झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण केली होती त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता.