48500 year old zombie virus revived: कोरोना सारख्या महामारीवर मात केल्यावर आता कुठे सर्व व्यवहार सुरळीत झाले आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली. मात्र, त्याच दरम्यान आता आणखी एका नव्या विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. याचं कारण म्हणजे शास्त्रज्ञांना तब्बल 48500 वर्षे जुना असा झोम्बी व्हायरस (Zombie Virus) आढळून आला आहे. हा व्हायरस रशियातील एका तलावात आढळला आहे. हा व्हायरस आढळून आल्याने ही जगभरासाठी एक धोक्याची घंटा असल्याचं बोललं जात आहे. (Zombie virus revived by scientists 48500 year old Pandoravirus Yedoma buried in frozen lake russia read details in marathi)
जागतिक तापमानवाढीचा इशारा भारत कायमच इतर देशांना देत आला आहे. जगात वाढत्या उष्णतेमुळे रशिया आणि सायबेरिया येथील गोठलेला बर्फ वितळला तर जगात खळबळ उडेल. झॉम्बी व्हायरसचा धोका इतका आहे की, तो लहान-लहान पेशी असलेल्या जीवांना सुद्धा संक्रमित करू शकतो.
आता प्रश्न असा आहे की, भारतासारख्या देशांना या व्हायरसपासून किती धोका आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी नेमकी काय तयारी करावी? कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगभरात बसला. या महामारीनंतर आता साथीचे आजार पसरवणाऱ्या विषाणूंचा शोध घेण्यात येत आहे. भारतासारखे देश अशा प्रकारच्या व्हायरसचा सामना करण्यास सक्षम आहेत. मात्र, कोरोनामुळे जगभरातील नागरिकांना ज्या समस्यांचा सामना करावा लागला होता तो खूपच भयावह असा होता. झोम्बी व्हायरसचा धोका नेमका किती आहे हे अद्याप समोर आलेले नाहीये. मात्र, आपल्याला अशा व्हायरस किंवा साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी प्रत्येक स्टेजवर तयार राहणे आवश्यक आहे.
हे पण वाचा : या आयुर्वैदिक उपचाराने अॅसिडिटीला करा बाय-बाय
भारतासारख्या देशांना जागतिक तापमानवाढीचा धोका आहे. सुंदरबनचा काही भाग पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे. याच्यासोबतच मुंबईच्या संदर्भातही आतापर्यंत अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. विकसित देश हे या सर्वांसाठी विकसनशील देशांना दोष देतात. मात्र, हा धोका इतका मोठा आहे की, आगामी काळात भारतासह जगातील सर्व देशांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
हे पण वाचा : तुम्ही सुद्धा ब्रेड खाता? मग हे वाचाच, अन्यथा....
रशियातील एका तलावात 48500 वर्षे जुना हा झोम्बी व्हायरस पुरलेला होता. शास्त्रज्ञांनी या व्हायरसचं नाव पंडोराव्हायरस एडिमा (Pandoravirus Yedoma) ठेवलं आहे. या शोधाच्या संदर्भात अद्याप कोणतीही अधिक माहिती प्रसिद्ध झालेली नाहीये.
हे पण वाचा : लहान मुलांसाठी मनुक्याचे असंख्य फायदे
फ्रान्समधील नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चच्या टीमने बर्फात गाडलेल्या या व्हायरसचा उल्लेख केला होता. ज्याच्या बाबत जगभरात कोणतीही माहिती नाहीये. यामध्येच झॉम्बी व्हायरसचाही समावेश आहे. हा व्हायरस 48500 वर्षे जुना आहे. याच टीमने 2013 मध्ये 30 हजार वर्षे जुना व्हायरसचा शोध लावला आहे.
ग्लोबल वॉर्मिंगमळे जगभरातील अनेक भागांत बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे एक नवा धोका निर्माण झाला आहे. झॉम्बी व्हायरस हा देखील त्याचाच एक भाग आहे. या व्हायरसमध्ये धोकादायक असे जंतू असू शकतात.