Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी. दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी. दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
मुंबईः एसटी संपामध्ये सहभागी जवळपास निम्मे कर्मचारी कामावर हजर झाले असून, कुठल्याही कागदपत्रांच्या पूर्ततेमध्ये न अडकवता त्यांना तातडीने रुजू करून घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात सर्व आगारांत मिळून १६ हजारांहून अधिक फेऱ्या मार्गस्थ करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाने गुरुवारी दिली. सहा महिन्यांनंतर एसटी पूर्वपदावर येण्यास सज्ज झाली आहे.
मुंबई: विक्रांत युद्धनौकेच्या डागडुजीसाठी लोकवर्गणीतून जमवलेल्या पैशांचा अपहार केल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देऊ केले होते. न्यायालयाच्या या निर्णयावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : इस्रायलने जगातील पहिल्या क्षेपणास्त्रविरोधी लेझर प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. खुद्द इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी ही माहिती दिली आहे. या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला 'आयर्न बीम' लेझर इन्स्पेक्शन असे नाव देण्यात आले आहे. ही जगातील पहिली ऊर्जा-आधारित शस्त्र प्रणाली आहे. याच्या मदतीने यूएव्ही, रॉकेट आणि मोर्टार खाली पाडण्यासाठी लेझरचा वापर केला जातो. इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांच्या मते, एका शॉटसाठी फक्त $3.5 खर्च येतो.
नवी दिल्ली : बँक ऑफ इंडियाने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्यासाठी कर्ज बुडलेल्या बिग बाजार ऑपरेटर फ्यूचर रिटेल लिमिटेडच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, फ्यूचर रिटेल लिमिटेडने सांगितले होते की ते त्यांच्या कर्जदारांना 5,322.32 कोटी रुपयांच्या कर्जाची वेळेवर परतफेड करू शकले नाहीत. ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनसोबत सुरू असलेल्या वादामुळे आणि इतर संबंधित समस्यांमुळे हे घडल्याचे कंपनीने म्हटले आहे.