Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी.
Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ते होम क्वारंटाईन आहेत त्यांची प्रकृती बरी आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली.
डॉक्टरांच्या सल्ल्याने पवारसाहेब उपचार घेत आहेत. गेल्या २ - ३ दिवसात पवारसाहेबांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोविड टेस्ट करावी, असे आवाहन स्वतः पवारसाहेबांनी केले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
पुढील ७ दिवसाचे पवारसाहेबांचे जे कार्यक्रम होते ते रद्द करण्यात आले आहेत. पवारसाहेबांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा नियोजित कार्यक्रम होतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
देशात अग्रगण्य असणाऱ्या बँक ऑफ इंडिया या बँकेच्या सॉफ्टवेअर वर्जनचा फटका खातेदाराला व विद्यार्थ्यांना बसताना दिसत आहे.. सॉफ्टवेअर अपडेशनमुळे अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने गेल्या दहा दिवसांपासून बँकेतील कामकाज रखडलेले आहे. यामुळे सॉफ्टवेअर अपडेशनाने विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी आधार लिंक नसल्यामुळे अर्जामध्ये अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा पालक वर्गाने स्कॉलरशिपच्या फॉर्म भरण्याची तारीख वाढवीण्याची मागणी करण्यात आली आहे..
शेअर मार्केटसाठी आजचा दिवस आहे ब्लॅक मंडे ठरला आहे. आजच्या दिवशी शेअर बाजारात शेअर्सची झपाट्याने विक्री झाली असून आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 1600 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 468 अंकानी घसरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: ट्विट करून पवार यांनी ही माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू असून, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.
शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे.
सर्वोच्च न्यायालयात ओबीसी राजकीय आरक्षणावरून मंथन सुरू आहे. अशातच सोमवारी (२४ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक घेत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावरील याचिकेवर पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे यावरही या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातील एका रासायनिक कारखान्याला आग लागली आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत.
कोल्हापूर येथील टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट झाला. यंत्रमाग कारखान्याला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घटनास्थळी चार अग्निशामक गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. यात कोणतीही जीवित हानी नाही.
भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट कायम असून सलग तिसऱ्या दिवशी देशात दैनंदिन रुग्णवाढीत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 6 हजार 64 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आदल्या दिवशी हा आकडा 3 लाख 33 हजार इतका होता. चांगली बाब म्हणजे गेल्या 24 तासांत दोन लाख 43 हजार 495 बरे झाले आहेत.
ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) भारतात कोरोना (corona) संसर्गाची तिसरी लाट धडकली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (corona patient) संख्या झापट्याने वाढू लागली आहे. गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 6 हजार 64 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर देशातील दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai), कोलकाता (Kolkata) आणि चेन्नई (Chennai) या शहरांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येच्या पीकचा टप्पा पार केला आहे. या मोठ्या शहरांनंतर आता इतर शहरे व ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वेगाने फैलावत आहे. अशातच आणखी चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा समूह संसर्ग सुरू झाला आहे आणि त्याचवेळी ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 भारतातील अनेक भागांत फैलावला असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यभरात (Maharashtra State) आजपासून बालवाडी (Kindergarten) ते इयत्ता बारावी (Class XII) पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या (Corona) दररोज वाढताना दिसत आहे. त्यामुळे पालकांमध्ये काहीशी धाकधूक आहे. याच चिंतेमुळे काही जिल्ह्यात शाळा आजपासून सुरू केली जाणार नाही.