LIVE BLOG
More UpdatesMore Updates

राम मंदिर भूमीपूजन: ऐतिहासिक क्षण... पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिलान्यास संपन्न!

Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan LIVE Updates: अयोध्येतील राम मंदिर उभारणीला आजपासून सुरुवात होणार आहे. गेली अनेक वर्ष याच क्षणाची कोट्यवधी भारतीय वाट पाहत होते तो क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या राम मंदिराचा सोहळा पार पडणार आहे.

अयोध्या: Ram mandir bhumi pujan time table 2020: अयोध्येत आज (५ ऑगस्ट २०२०) ऐतिहासिक राम मंदिराचं भूमीपूजन सोहळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह १७५ जणांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला अनेक व्हीव्हीआयपी उपस्थित असणार असल्याने सुरक्षा देखील कडेकोट ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त संपूर्ण अयोध्या नगरी ही नव्या नवरीप्रमाणे सजली आहे. 

Aug 05, 2020  |  01:18 PM (IST)
३० वर्षानंतर संकल्पपूर्ती, आज आनंदोत्सव: सरसंघचालक मोहन भागवत

आजचा दिवस आनंदाचा आहे, गेल्या ३० वर्षाच्या मेहनतीचं फळ मिळालं... राम मंदिराचा संघर्ष कधीही विसरता येणार नाही: मोहन भागवत

Aug 05, 2020  |  01:16 PM (IST)
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं भाषण सुरु

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याने भारताची जगासमोर नवी ओळख निर्माण झाली आहे: योगी आदित्यनाथ 

Aug 05, 2020  |  12:49 PM (IST)
ऐतिहासिक क्षण...

ऐतिहासिक क्षण... पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचा शिलान्यास संपन्न

Aug 05, 2020  |  12:40 PM (IST)
पूजा-विधीस पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवतही हजर
अयोध्येतील राम मंदिरच्या भूमी पूजन सोहळासाठी पंतप्रधान मोदीशिवाय आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर साधू-संत उपस्थित.
Aug 05, 2020  |  12:10 PM (IST)
राम मंदिर भूमीपूजनाचा सोहळा सुरु

राम मंदिर भूमीपूजनाचा सोहळा सुरु, पूजेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसन केलं ग्रहण.. मंत्रोच्चारात पुजेला सुरुवात 

Aug 05, 2020  |  12:08 PM (IST)
पंतप्रधान मोदी भूमीपूजनाच्या स्थळी पोहचले

पंतप्रधान मोदी भूमीपूजनाच्या स्थळी पोहचले, सोशल डिस्टन्सिंग राखून पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना केलं अभिवादन.

Aug 05, 2020  |  12:03 PM (IST)
रामलल्लासमोर पंतप्रधान मोदींनी घातला साष्टांग नमस्कार

हनुमानगढी येथे पूजा केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर मंदिराच्या बाहेरच पारिजातकाचं झाड लावून वृक्षारोपण केलं.  

Aug 05, 2020  |  12:01 PM (IST)
पंतप्रधान मोदींनी हनुमानाची केली पूजा

सर्वप्रथम हनुमानगढी येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमानाची पूजा केली. येथे पंतप्रधान मोदींना चांदीचा फेटा घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. 

Aug 05, 2020  |  11:35 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही क्षणांपूर्वीच अयोध्येत दाखल झाले आहेत. इथून पंतप्रधान मोदी हे हनुमानगढी येथे जातील. येथून पूजा करुन मोदी राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या ठिकाणी जातील.   
Aug 05, 2020  |  10:44 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येच्या राम मंदिर भूमीपूजनासाठी रवाना झाले आहेत.
Aug 05, 2020  |  10:27 AM (IST)
अमेरिकेत देखील राम मंदिर भूमीपूजनचा जल्लोष 

अमेरिकेत देखील राम मंदिराच्या भूमी पूजन सोहळ्याचा जल्लोष केला जात आहे. भारतीय नागरिकांनी वॉश्गिंटन डीसी येथे एकत्र येऊन भगवा झेंडा हाती घेऊन आनंद व्यक्त केला. 

Aug 05, 2020  |  09:21 AM (IST)
भूमीपूजनाचा कार्यक्रम जवळपास 40 मिनिटांचा

या कार्यक्रमांसाठी अयोध्येपासून प्रयागराज, दिल्ली, काशी आणि हरिद्वारवरून वेगवेगळ्या विद्वानांना पाचारण करण्यात आले आहे, जे निरनिराळ्या पूजांमध्ये निपुण आहेत. आज होणारा भूमीपूजनाचा कार्यक्रम जवळपास 40 मिनिटांचा असेल. यासाठी देशभरातील जवळपास 8 हजार पवित्र स्थानांकडून माती, पाणी आणण्यात आले आहेत.  

Aug 05, 2020  |  09:20 AM (IST)
केवळ काही क्षणांपुरताच असणार आहे हा शुभमुहूर्त

श्रीराम क्षेत्र ट्रस्टकडून आधीच भूमीपूजनासाठी एक मुहूर्त आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे, ज्यानुसार हा मुहूर्त 32 सेकंदांचा आहे, जो दुपारी 12 वाजून 44 मिनिटे, आठ सेकंदांपासून ते 12 वाजून 44 मिनिटे, 40 सेकंदांपर्यंत असणार आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी मंदिराचा शिलान्यास करतील. 

Aug 05, 2020  |  09:19 AM (IST)
'भूमीपूजनचा आनंद हा १५ ऑगस्ट १९४७ च्या ऐतिहासिक दिवसाप्रमाणे'

भूमीपूजनापूर्वी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, मंदिर भूमीपूजनचा आनंद हा १५ ऑगस्ट १९४७ च्या ऐतिहासिक दिवसाप्रमाणे आहे. हा दिवस अतिशय आनंदी असा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त आज होणार असलेल्या शिलान्यास कार्यक्रमात अनेक राजकीय नेते आणि संत यांच्यासह १७५ जणांना आमंत्रित करण्यात आलं आहेत.

Aug 05, 2020  |  09:19 AM (IST)
अयोध्येत कडेकोट सुरक्षा

अयोध्येत होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी होणार असल्याने येथील सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. तसेच सुरक्षा एजन्सी देखील सतर्क आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलाचे कर्मचारी देखील तैनात आहेत. 

Aug 05, 2020  |  09:18 AM (IST)
आज होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याआधी अयोध्येतील शरयू नदीवरील घाट शानदार पद्धतीने सजविण्यात आले आहेत. पाहा शरयू घाटा