LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 01 August 2022 Latest Update : संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Breaking News 01 August 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 01 August 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Aug 01, 2022  |  08:43 PM (IST)
NAVI MUMBAI | आईच मुलीला करत होती जबर मारहाण, घटनेचा Video समोर
Aug 01, 2022  |  08:27 PM (IST)
नारे बाजी ऐवजी गाली बाजी करत किरीट सोमय्यांच्या पोस्टरला मारले जोडे अहमदनगरमध्ये शिवसेनेचे निदर्शने  

अहमदनगर - शिवसेना खासदार संजय राऊत यांना Ed ने अटक करताच अहमदनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी राऊत समर्थकांनी आंदोलन सुरू केली आहे. 

आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांचं समर्थन करत ED आणी BJP च्या विरोधात घोषणा देत किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारून  निदर्शने करण्यात आली आले. 

रविवार ED ने संजय राऊत यांची ९ तास चौकशी करून रात्री उशिरा अटक केली. दरम्यान राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आली असता त्यांना ४ ऑगस्ट पर्यंत पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान अहमदनगर मध्ये करण्यात आलेल्या निदर्शनामध्ये भाजपा नेता किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारून 'नारे बाजी के अलावा गाली बाजी'  देण्यात आली या निदर्शनावेळी संगमनेर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Aug 01, 2022  |  06:19 PM (IST)
MUMBAI | संजय राऊतांना कोर्टाने ईडी कोठडी सुनावल्यानंतर आ. सुनील राऊत यांची प्रतिक्रिया
Aug 01, 2022  |  03:51 PM (IST)
संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1554049285028978688
Aug 01, 2022  |  02:37 PM (IST)
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट
शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
Aug 01, 2022  |  11:37 AM (IST)
शिवसेना इतिहासजमा होणार- भाजप नेते किरीट सोमय्या

उद्धव ठाकरे यांचा उजवा हात संजय राऊत तुरुंगात जाणार, आता डावा हात अनिल परबसुद्धा तुरुंगात जाणार असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. तसेच शिवसेना इतिहास जमा होणार असेही राऊत म्हणाले. 
 

Aug 01, 2022  |  09:40 AM (IST)
Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra : आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून

शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून (1 ऑगस्ट) सुरु होत आहे. सिंधुदुर्गातल्या कुडाळ, वेंगुर्ला सावंतवाडी आणि कोल्हापूर शहर, शिरोळ ते कात्रज चौक दरम्यान 1 आणि 2 ऑगस्ट रोजी ही 'शिव संवाद' यात्रा निघणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी अशी यात्रा केल्यानंतर आदित्य ठाकरे 1 ऑगस्टपासून सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुण्यात शिव संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जाणार आहेत. 
 

Aug 01, 2022  |  09:40 AM (IST)
LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर आजपासून स्वस्त

महिन्याच्या पहिल्या दिवशी आज व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. आजपासून व्यावसायिक सिलेडरच्या दरात 36 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आजपासून दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2012.50 रुपयांऐवजी 1976.50 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर घेण्यासाठी आता 1936.50 रुपये मोजावे लागणार आहेत. 
 

Aug 01, 2022  |  09:39 AM (IST)
Sanjay Raut: भावाच्या अटकेनंतर आमदार सुनील राऊतांची पहिली प्रतिक्रिया  

संजय राऊतांना अटक होताच संजय राऊत यांचे भाऊ आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. सुनील राऊत यांनी आरोप केली की, खोटी केस तयार करून राऊतांना अटक करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणाशी काहीही संबंध नाही, एक टक्काही नाही, संजय राऊत यांना कागदपत्र वाचून दाखवण्यात आली. यात पत्राचाळीचा उल्लेख कुठेही नाही असंही ते म्हणालेत. 
 

Aug 01, 2022  |  09:38 AM (IST)
West Bengal: जनरेटरच्या वायरिंगमुळे पिकअप व्हॅनला लागला करंट, 10 जणांचा मृत्यू

एका भीषण अपघाताची बातमी समोर येतेय. रविवारी रात्री पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये उशिरा मोठी दुर्घटना घडली आहे. पिकअप व्हॅनला करंट लागल्यानं 10 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण भाजले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पिकअपमध्ये 27 लोक होते. पिकअपच्या मागील बाजूस लावलेल्या जनरेटरच्या (डीजे सिस्टीम) वायरिंगमुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. ही पिकअप व्हॅन जल्पेश (Jalpesh temple)  मंदिरात जात होती. या घटनेत भाजलेल्या लोकांना जलपाईगुडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 

Aug 01, 2022  |  09:38 AM (IST)
Pandharpur: शिवसेनेकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा निषेध

पंढरपूर शिवसेनेच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या फोटोला चप्पल मारून निषेध करण्यात आला.

Aug 01, 2022  |  09:38 AM (IST)
Ambernath Anand Nagar MIDC : पद्मावती पेपर मिलमध्ये भीषण आग

अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसीतील पद्मावती पेपर मिलमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली आहे. पुठ्ठा आणि पेपर मोठ्या प्रमाणात जळल्याने संपूर्ण एमआयडीसीत राख पसरली आहे.