LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 01 October 2022 Latest Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 01 October 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  BCCL
Breaking News 01 October 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Oct 01, 2022  |  08:28 PM (IST)
NAGPUR | काँग्रेस नेते शशी थरुर यांनी नागपुरातील दिक्षाभूमीला दिली भेट

नागपुरात पहिल्यांदा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले शशी थरूर आल्यावर त्यांनी नागपुरातील दिक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी सांगितले की भेट देण्यामागे दोन करण आहे पहिला काँग्रेस नेहमी अनुसूचित जाती जमाती सबोत राहलेली आहे. तर दुसरे त्यांनी एक पुस्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहलं आहे. शशी थरूर यांना अध्यक्ष निवडणूक संदर्भात विचारले तर त्यांनी सांगितले की, सोनिया गांधी बोलल्या आहेत की ही निवडणूक निष्पक्ष होईल. त्यामुळे मला विश्वास आहे की या निवडणुकीनंतर काँग्रेसला बळ मिळेल.

Oct 01, 2022  |  04:42 PM (IST)
KALYAN | कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर वाढला

मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिम येथील बैल बाजार परिसरात झाड पडल्याची घटना, तर कल्याण पूर्वत रस्त्यावरील कमान पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, झाड पडल्याने एका कारचे नुकसान झाले आहे. तर कल्याण श्रीमलंग रोडवर बॅनर कमान पडल्याने एक बाजूचा रस्ता बंद झाला असून या कमानीतून मार्ग काढत वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.

Oct 01, 2022  |  01:31 PM (IST)
औरंगाबाद - नशेच्या गोळ्या बाळगणाऱ्यावर औरंगाबाद पोलिसांची कारवाई

परराज्यातून विक्रीसाठी आणलेला गुंगीकारक औषधी द्रव्य साठा आणि गोळ्या सिटी चौक पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, एक इसम हा नशेच्या गोळ्या आणि गुंगीकारक द्रव्य विक्री करणार आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून त्याच्या ताब्यातून 75 नग 100 ml च्या गुंगीकारक औषधीद्रव्य बाटल्या आणि 110 नशेच्या गोळ्या हस्तगत करून, अल्ताफ बासिर अहेमद पठाण याला ताब्यात घेतले आहे.

Oct 01, 2022  |  11:05 AM (IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज शनिवारी सकाळी साडेआठ वाजता शिर्डी विमानतळावर खासगी विमानाने राज यांचे आगमन झाले. शिर्डी येथी  मनसे पदाधिकारी त्यांचे स्वागत केले. शिर्डीत साईबाबा समाधी दर्शन  घेऊन ते परत विमानाने ओझर विमानतळावर दुपारी साडेअकरा वाजता येणार आहेत. या ठिकाणी शहराध्यक्ष पदाधिकारी विद्यार्थी सेना महिला पदाधिकारी यांच्या वतीने राज ठाकरे यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ते ओझर विमानतळावरून नाशिक येथे एस एस के हॉटेल येथे येणार आहे येथे रात्री मुक्काम करून ते 2 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता श्री सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेऊन परत ओझर विमानतळ येथून रवाना होणार आहे. हा संपूर्ण दौरा खाजगी असल्याने असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. एकीकडे राज ठाकरे हे आधी शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेणार असून त्यानंतर नाशिकला ते मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणारा आहेत. मात्र हा राजकीय दौरा नसल्याने ते माध्यमांशी संवाद साधणार नसल्याचे समजते. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक मनसेला पुन्हा एकदा किक देण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी नाशिक मनसेला बूस्ट देण्यासाठी शहरात १२२ राजदूतांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे मनसे ऍक्टिव्ह मोडवर आल्याचे दिसते आहे. आज उद्याच्या दौऱ्यामध्ये राज ठाकरे दर्शनासह मनसे पदाधिकांऱ्याना काय कानमंत्र देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Oct 01, 2022  |  09:21 AM (IST)
राज्यात शुक्रवारी 459 कोरोना रूग्णांची नोंद, पाच रूग्णांचा मृत्यू

राज्यात शुक्रवारी  459 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर पाच कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात 538 रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या  79,69,878 वर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होण्याचा दर 98.13 टक्के झाला आहे. तर पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. राज्यास सध्या मृत्यू दर हा 1.82 टक्के आहे. 

Oct 01, 2022  |  08:57 AM (IST)
आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G  होणार लॉन्च

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवा लॉन्च होणार आहे. 

https://twitter.com/ani_digital/status/1576021656937844737

Oct 01, 2022  |  08:53 AM (IST)
पुण्यात मुसळधार पावसामुळे कोसळले झाड,एका रिक्षा चालकाचा मृत्यू

शुक्रवारी सांयकाळी चार वाजण्याच्या सुमारास पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. विजेच्या कडकड्यात पुण्यामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे पुण्यातील विविध भागांमध्ये झाडे पडली  अशीच एक घटना पुण्यातील रामनगर भागातील एका रिक्षावरत एक मोठे झाड कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

Oct 01, 2022  |  07:16 AM (IST)
आजपासून रिक्षाचा प्रवास 2, तर टॅक्सीचा प्रवास 3 रुपयांनी महाग

आजपासून मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. राज्य सरकार आणि रिक्षा टॅक्सी युनियनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारनं दिलेल्या मंजुरीनुसार, रिक्षासाठी आता 23 रुपये तर टॅक्सीसाठी 28 रुपये मोजावे लागणार आहेत. 

Oct 01, 2022  |  07:15 AM (IST)
पुढील चार दिवस राज्यात पावसाचा अंदाज

पुढचे चार दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस झाला.

Oct 01, 2022  |  07:13 AM (IST)
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात, घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे, मात्र घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवे इंधन जारी झाले आहेत.