LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 02 August 2022 Latest Update : WI vs IND: टीम इंडियासमोर विजयासाठी १६५ रन्सचं वेस्ट इंडिजचं आव्हान

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Breaking News 02 August 2022 Latest Update :  दिवसभरातील घडामोडी
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 02 August 2022 Latest Update : दिवसभरातील घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Aug 02, 2022  |  11:25 PM (IST)
WI vs IND: टीम इंडियासमोर विजयासाठी १६५ रन्सचं वेस्ट इंडिजचं आव्हान
WI vs IND: टीम इंडियासमोर विजयासाठी १६५ रन्सचं वेस्ट इंडिजचं आव्हान
Aug 02, 2022  |  09:27 PM (IST)
घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला भांडुप पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

भांडुप पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. राहुल बांगर असं या चोरट्याचं नाव असून त्याच्यावर आतापर्यंत 26 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. राहुल आणि त्याची साथीदार अंजली शेख या दोघांनी भांडुपमध्ये राहणाऱ्या अनिल तिवारी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरातील चार लाख 57 हजार पाचशे रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले होते. त्यानंतर तिवारी यांनी भांडुप पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर अंजली हिला तिच्या भांडुपमधील राहत्या घरातून तसेच राहुल याला अटक केली. हे चोरीचे दागिने त्यांनी एका ज्वेलर्सला विकले होते. ज्यामध्ये पोलिसांनी शंभर टक्के मुद्देमाल हा ज्वेलर्सच्या दुकानातून हस्तगत केला आहे. म्हणजे अंजली शेख ही पहिल्यांदाच राहुल याच्या संपर्कात आले होते आणि रात्रीच्या वेळी चोऱ्या करताना पोलिसांना संशय येऊ नये म्हणून राहुल अंजलीला पोलिसांना चकवा देण्यासाठी सोबत घेऊन फिरायचा परंतु या दोघांची ओळख झाल्यानंतर पहिल्याच चोरीच्या प्रयत्नात या दोघांना पोलिसांनी गजाआड केलं. 

Aug 02, 2022  |  08:18 PM (IST)
RAIGAD | 'केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून एकमेकांचा हिशोब चुकता करण्याचे काम सुरू'

राजकारण हा आमचा धंदा नाही. सर्वसामान्य माणसाला आजच्या राजकारणाची किळस आली आहे. शाळेतल्या मुलीने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामुळे केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले असल्याचे दिसून येते. केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून एकमेकांचा हिशोब चुकता करण्याचे काम सुरू आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने वलग्ना करण्यात आल्या. चळवळ जिवंत ठेवण्यासाठी चारही राजकीय पक्षांच्या विरोधात दंड ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा राजकारणाचा धंदा नाही. आम्ही चळवळीत विचाराने एकत्रित आलेले पक्ष आहोत. महाविकास आघाडी ही चोरांची टोळी होती. असा हल्लाबोल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. ईडी आणि सीबीआयची भीती घालून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकाच पक्षात नेण्यात येईल, आम्ही चळवळी तीव्र करू आणि सर्वसामान्य जनतेला तगडा पर्याय देऊ महाविकास आघाडी सरकार ज्या मुद्द्यावर तयार झाले त्याच्यावर कधी चर्चाच झाली नाही, यामुळे आम्ही दुर्लक्ष केलं आणि सरकार पडलं.

Aug 02, 2022  |  08:10 PM (IST)
विसा नियम उल्लंघनप्रकरणी ११७ चायनीज नागरिकांना मायदेशी पाठवले
२०१९ ते २०२१ या काळात ११७ चीनच्या नागरिकांनी विसा नियमांचे उल्लंघन केले, म्हणून त्यांना मायदेशात पाठवण्यात आले, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली.
Aug 02, 2022  |  08:06 PM (IST)
राज्यात आढळले कोरोनाचे १ हजार ८८६ रुग्ण, ५ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आढळले कोरोनाचे १ हजार ८८६ रुग्ण, ५ रुग्णांचा मृत्यू
Aug 02, 2022  |  07:47 PM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेजुरी गडावर खंडोबाचे दर्शन घेतले
पुणे दौऱ्यावर असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेजुरी गडावर जाऊन श्री क्षेत्र खंडोबाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीने देव खंडोबाची निशाणी असलेले पारंपरिक घोंगडे अंगावर चढवून मुख्यमंत्र्यांचा आदरपूर्वक सन्मान केला. तसेच यानिमित्ताने खंडोबाचा खंडा हातात घेऊन त्यांनी परंपरेनुसार तो उंचावून दाखवला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, आमदार तानाजी सावंत, आमदार दिलीप मामा लांडे, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, माजी आमदार विजयबापू शिवतारे आणि मंदिर समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.
Aug 02, 2022  |  07:37 PM (IST)
AHMEDNAGAR  | शिवसेना एकटी स्वबळावर निवडणुका लढणार - बबनराव घोलप 

अहमदनगर - शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा लोकसभा मतदारसघांचे संपर्क प्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिर्डीत पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली होती.शिर्डी लोकसभा मतदारसंघांचे खा.सदाशिव लोखंडे शिंदे गटात गेल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमख पदाची नियुक्ती करण्यात आलीये. शिवसेना एकटी स्व बळावर निवडणुका लढणार असल्याचा इशारा शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसघांचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी दिलाय.मतदार संघातील एकही शिवसैनिक लोखंडे यांच्या सोबत गेला नाही ते एकटे गेलेत , जे काही मतदारसंघात गट तट होते ते आता मी आल्यामुळे राहणार नाही      असं देखील ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.साखर सम्राट म्हणजे कोण त्यांना आमचेच मत असतात आता फक्त त्यांना मत द्यायचे नाही शिवसैनिकाला द्यायचे एवढाच बदल करावा लागणार आहे. 

काळे कोल्हे विखेंच्या दावणीला बांधलेल्या कार्यकर्त्यांना काढून घेईल आता मी आलो असल्याचं माजी मंत्री घोलप म्हणाले.न्यायालयाचा निकाल हा शिवसेनेकडून लागणार आहे शिवसेनेचाच विजय होणार असून जे शिवसैनिक फुटले त्यांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होणार असल्याचं घोलप यांनी शिर्डीत म्हणालय.राऊत यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय.आमचा शिवसेनेचा एकटा वाघ त्यांच्याशी लढत होता शिवसेनेचे ते प्रवक्ते असल्याने पक्षाची बाजू मांडणे ही त्यांची जवाबदारी होती त्यांनी ती पूर्ण केली असून संजय राऊताना  जेलमध्ये भाजपने टाकल असल्याचं वक्तव्य माजी मंत्री घोलप यांनी केलं..

Aug 02, 2022  |  06:52 PM (IST)
सोनसाखळी चोरीचा अट्टल गुन्हेगार कळवा पोलिसांच्या जाळ्यात

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन चोरीच्या घटनाच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने ते उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरू असताना पोलिसांना मोठे यश आले आहे. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो. उपनिरीक्षक घुघे व त्यांचे सहकारी तपास करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जबरीने चैनचोरी करून राहते ठिकाण बदलणारा संशयित आरोपी भिवंडी वडपे परिसरात शुक्रवार (ता 29) ला येणार असल्याची माहिती मिळली. या माहितीच्या आधारे कळवा पोलिसांनी सापळा रचून आरोपी, हैदर जब्बार जाफरी (32)स्वामी विवेकानंद नगर वासिंद (शहापूर)याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्याचा भाऊ सादिक जाफरी (41) याच्या मदतीने केली असल्याची त्याने कबुली दिली.अटक केलेल्या आरोपीकडून कळवा परिसरात चैन चोरीच्या 5 गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी 2 लाख 60 हजार रुपये किमतीचे एकूण 52 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले हे दुचाकीवरून चैन खेचून चोऱ्या करीत असत त्यांच्यावर ठाण्यातील नौपाडा, वसई, नालासोफारा, अर्नाळा आदी 6 ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून संशयित आरोपी हैदर जाफरी याला ठाणे न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

Aug 02, 2022  |  06:46 PM (IST)
BHANDARA | संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन
Aug 02, 2022  |  05:56 PM (IST)
जालना - विद्यूत पोलमध्ये करंट आल्याने दोन म्हशींचा मृत्यू

विद्यूत पोलमध्ये करंट आल्याने विद्युत पोलजवळ चरण्यासाठी गेलेल्या दोन म्हशींचा पोलच्या तारांना चिटकून जागीच मृत्यू झाला आहे. जालना शहरातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाजवळ ही घटना घडली आहे. या घटनेमुळे महावितरणच्या गलथान कारभारावर टिका होत असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याआधीही शहरातील बऱ्याच विद्युत पोलमध्ये करंट उतरत असल्याच्या तक्रारी सातत्याने महावितरणकडे करण्यात आल्या होत्या मात्र महावितरणने याकडे दुर्लक्ष केले. आज म्हशी दगावल्यानं या घटनांची प्रचीती आली आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मेलेल्या म्हशी या महावितरणनच्या गलथान कारभारमुळेच मेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मेलेल्या म्हशींची नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी म्हशींच्या मालकांनी केली आहे.

Aug 02, 2022  |  05:03 PM (IST)
NAVI MUMBAI | एमआयडीसीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना गणेश नाईकांचा इशारा 

नवी मुंबई  : भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन एमआयडीसी क्षेत्रातील जमीन विक्रीच्या निविदेला विरोध करत ही जागा विकू नये, अशी मागणी केली. एका खासगी कंपनीला विकण्याचा प्रयत्न करत आहे, ती कोणत्याही किंमतीत मिळू नये. भूखंडांच्या निविदा रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.यावेळी त्यांनी गणेशोत्सवात काळजी घ्या. उत्सव साजरा करताना कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेने पूर्ण काळजी घ्यावी.यावर्षी सरकारने सणांवरची बंदी हटवून अनेक सुविधा दिल्या असून,यासह पोलिस विभाग, वाहतूक विभाग आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले.
 

Aug 02, 2022  |  04:59 PM (IST)
MUMBAI | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली
MUMBAI | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली
Photo Credit: टाइम्स नाऊ मराठी
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि  माजी मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी आज राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. पूरग्रस्त भागांना लवकरात लवकर मदत मिळावी तसेच मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर व्हावा या मागणी करिता ही भेट घेण्यात आली आहे.
Aug 02, 2022  |  04:55 PM (IST)
MUMBAI | संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार सुद्धा काहीच बोलले नाहीत- संजय शिरसाट

- संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार सुद्धा काहीच बोलले नाहीत
- आम्हाला आजही तुमच्या विरोधात बोलायची मानसिकता नाही, पण आता लिमिट सोडून बोलायला लावू नका : संजय शिरसाट
 

Aug 02, 2022  |  04:33 PM (IST)
ठाणे : म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार; ग्रामस्थांचे उपोषण
म्हारळ येथील ग्रामस्थांनी उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. या उपोषणात महेश देशमुख, महेश खोत, दत्तू सांगळे, प्रमोद देशमुख, विकास पवार, लक्ष्मण कोंगेरे, बाळकृष्ण देशमुख हे सहभागी झाले आहेत. या उपोषणास सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव आणि रिपाईचे नेते रवींद्र चंदणे यांनी पाठिंबा दिला. ठाणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर कल्याण ग्रामीणचे म्हारळ ग्रामपंचायत येथील समाजसेवक महेश देशमुख यांनी काही ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी महेश देशमुख यांनी सांगितले की, म्हारळ ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच प्रगती कोंगेरे यांनी आतापर्यंत करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे. २०१० साली देखील सरपंच प्रगती कोंगेरे यांनी १ कोटी २० लाखांचा भ्रष्टाचार केला होता तर आता देखील याच प्रगती कोंगेरे सरपंच असून आता देखील त्यांनी ७० ते ८० लाखाचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या महिला सरपंच प्रगती कोंगेरे यांच्या ३९ प्रमाणे कारवाई करण्यात यावी. तसेच या सरपंचांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हे आमरण उपाषण असेच सुरु राहणार असल्याचा इशारा समाजसेवक महेश देशमुख यांनी दिला आहे.
Aug 02, 2022  |  03:51 PM (IST)
भारतात मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत वाढ, दिल्लीत आणखी एका व्यक्तीला लागण
भारतात मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत वाढ दिल्लीत आणखी एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण दिल्लीत आतापर्यंत एकूण तीन बाधितांची नोंद
Aug 02, 2022  |  03:36 PM (IST)
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी मुंबईत ईडीच्या दोन ठिकाणी धाडी.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी मुंबईत ईडीच्या दोन ठिकाणी धाडी.
Aug 02, 2022  |  02:54 PM (IST)
औरंगाबाद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात औरंगाबाद येथे तक्रार दाखल
Aug 02, 2022  |  02:17 PM (IST)
यवतमाळमध्ये सर्पमित्रांनी सापांना दिले जीवदान, नागपंचमीनिमित्त दिला खास संदेश
यवतमाळमध्ये सर्पमित्रांनी सापांना दिले जीवदान, नागपंचमीनिमित्त दिला खास संदेश
Aug 02, 2022  |  01:40 PM (IST)
NAVI MUMBAI | सातारा-बोरिवली शिवशाही बसचा नवी मुंबईत अपघात
Aug 02, 2022  |  01:12 PM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमान थांबवलं आणि केला फोन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमान थांबवलं आणि केला फोन.

#shorts मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमान थांबवलं आणि केला फोन.

लेटेस्ट न्यूज व्हिडीओज् पाहण्यासाठी...सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनेल... https://www.youtube.com/c/TimesNowMarathi?sub_confirmation=1Get Latest news and up...