LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 02 September 2022 Latest Update: शिंदे गट आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 02 September 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 02 September 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Sep 02, 2022  |  11:08 PM (IST)
तारापूर अणुऊर्जा केंद्रावर तैनात असलेला CISF जवान बेपत्ता, तपास यंत्रणा सतर्क

पालघर : तारापूर येथील अणुऊर्जा केंद्रात तैनात असलेला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (CISF) जवान बेपत्ता झाला आहे. शुक्रवारी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जवान मनोज यादव बेपत्ता झाल्याबाबत गुरुवारी पालघर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

Sep 02, 2022  |  07:47 PM (IST)
आईस्क्रीमच्या फ्रीजरचा शॉक लागून चिमुरडीचा मृत्यू

नाशिक : मेडिकलमध्ये आईस्क्रीमच्या फ्रीजरचा शॉक लागून एका 4 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या सिडको भागात घडली आहे. वडिलांनसोबत आईस्क्रीम घ्यायला ही चिमुरडी दुकानात गेली होती. ग्रीष्मा विशाल कुलकर्णी वय ४ वर्षे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. काल संध्याकाळी ही घटना त्रिमूर्ती चौकातील मातोश्री चौक येथील ही घटना आहे. या घटनेने नाशिक शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Sep 02, 2022  |  07:29 PM (IST)
पुणे-नाशिक महामार्गाच्या चंदनापुरी घाटात कोसळली दरड
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनपुरी घाटामध्ये मुसळधार पावसामुळे छोट-छोट्या दरडी व दगड महामार्गावर आल्याच्या घटना घडली आहे. छोट छोटे दगड महामार्गावर आल्याने पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनपुरी घाटामध्ये वहतुक मंदावल्याचे बघायला मिळत आहे. घटनेची माहिती समजतात महामार्ग पोलीस व टोलनाका प्रशासन घटनास्थळी हजर झाले असुन महामार्गावर पडलेले दगड बाजूला करण्याचे काम चालू आहे.
Sep 02, 2022  |  06:56 PM (IST)
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्ग सुखावला

सध्या राज्यात श्री गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वत्र भक्ती भावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिल्लोड येथे गणेश उत्सवामुळे अनेकांना तात्पुरता रोजगार मिळाला असून या उत्सवावर अवलंबून असलेल्या विविध मंडप डेकोरेशन , पूजेचे साहित्य विक्री करणारे व्यक्ती व दुकानदार, पुल विक्रेते, फुल उत्पादक शेतकरी, विविध वस्तू विक्रेते याचा व्यवसाय चांगल्या प्रमाणात सुरू झाला आहे. तसेच काही व्यक्तींना हंगामी स्वरूपात हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे कामगारवर्ग व व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sep 02, 2022  |  05:16 PM (IST)
टीस्टा सेटलवाडला अंतरिम जामीन मंजूर 

सामाजिक कार्यकर्त्या टीस्टा सेटलवाडला यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. 

Sep 02, 2022  |  05:11 PM (IST)
अफगाणिस्तान : मशिदीत नमाजादरम्यान स्फोट, मौलवीसह 20 जण ठार, 200 जखमी

Afghanistan Blast: अफगाणिस्तानच्या हेरांत प्रांतातील मशिदीत शुक्रवारी स्फोट झाला. हेरांत प्रांतातील गुजरगाह मशिदीत हा स्फोट झाला. शुक्रवारच्या नमाजानंतर हा स्फोट झाला. या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 200 जण जखमी झाले आहेत.

Sep 02, 2022  |  05:01 PM (IST)
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून अर्ज 

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून अर्ज 

शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून अर्ज

यापूर्वी शिवसेनेकडूनही अर्ज दाखल 

Sep 02, 2022  |  04:41 PM (IST)
अशोक चव्हाणांच्या भेटीचे फडणवीसांनी वृत्त फेटाळले

पुणे : काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी भेट झाली आहे. या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीसंदर्भात फडणवीस यांची प्रतिक्रीया आली आहे. अशोक चव्हाण आणि माझी कोणतीही भेट झाली नाही, असे स्पष्टीकरण देत, त्यांनी या भेटीचा दावा फेटाळून लावला आहे. ते आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Sep 02, 2022  |  03:53 PM (IST)
हे सरकार स्थिर आणि मजबूत - सुधीर मुनगंटीवार

सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी असलेल्या प्रकरणामुळे राज्यातील सरकार अस्थिर होईल, अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. अशा कोणत्याही चुका झालेल्या नाही, ज्यामुळे सरकारचे अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे या जर तरच्या गोष्टीत काही अर्थ नाही. हे सरकार स्थिर आणि मजबूत आहे, असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. विरुध्द निकाल लागण्यासाठी असा कोणताही मुद्दा सुप्रिम कोर्टात नाही की, ज्यातुन सरकार अस्थिर होऊ शकते. जनतेचं सरकार आहे.'सच परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता'.

Sep 02, 2022  |  03:50 PM (IST)
शिंदे गट आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

आगामी महानगरपालिका शिंदे गट आणि भाजप एकत्र लढणार अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली तसेच राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत त्यांच्यासोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तर अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट होणार की नाही याबद्दल आपल्याला माहित नाही असेही बावनकुळे म्हणाले.

 

Sep 02, 2022  |  01:32 PM (IST)
पंढरपुरात 200 किलो गव्हाचा वापर करून सात फुटाची आकर्षक व सुबक गणेश मूर्ती

पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयाजवळ असणाऱ्या व्यास नारायण नगर मधील कै. मनोज दादा परचंडे मित्र मंडळाच्या वतीने 200 किलो गव्हापासून गणेश मूर्ती तयार केली आहे. विशेष म्हणजे विसर्जनानंतर या मूर्तीवरील गहू काढून हे मंडळ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पेरणीसाठी वाटणार आहे.   व्यास नारायण नगर मध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे. 200 किलो गव्हाचा वापर करून सात फुटाची आकर्षक व सुबक गणेश मूर्ती तयार झाली आहे.  महत्वाचे म्हणजे मंडळातील कार्यकर्त्यांनीच 26 दिवसाच्या परिश्रमातून ही गणेशमूर्ती तयार केली. यंदा गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर या मूर्तीवरील गहू काढून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पेरणीसाठी देण्यात येण्याचा आदर्शवत निर्णय या मंडळांनी घेतला आहे.

Sep 02, 2022  |  01:01 PM (IST)
आरेमध्ये होणाऱ्या कारशेडमुळे काय समस्या उभ्या राहतील हा मुद्दाअधोरेखित करणारा देखावा
मुंबईचे फुफुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरेत आता मेट्रो -3 कारशेड उभारण्यात येणार आहे, पण हे कारशेड झाल्यावर काय काय समस्या उद्भवू शकतील ह्या मुद्द्याला लक्ष देऊन मघाटकोपर मधील शिवसम्राट गणेशोत्सव मंडळाने देखावा उभारला आहे. ह्या देखाव्यात मेट्रो समोर बिबट्या दाखवण्यात आला आहे, तसेच देखावा तयार करण्यासाठी टाकाऊ पासून टिकाऊ हि योजना लक्षात ठेऊन फटाक्याच्या पुट्टे आणि मोट्या फटाक्यांचे खाली दंडुके ह्यांनी इमारती आणि मॉल्स चे पोल उभारण्यात आले आहे.
Sep 02, 2022  |  12:16 PM (IST)
झारखंडमध्ये एक महिला नक्षलवाद्यासह दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

झारखंडच्या चैबासा जिल्ह्यात नक्षलवादी आणि झारखंड पोलिसांत चकमक उडाली. यात दोन नक्षलवादी ठार झाले असून त्यात एका महिला नक्षलवादीचाही समावेश आहे. या दोघांवर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते.

Sep 02, 2022  |  12:10 PM (IST)
MUMBAI | वेगवेगळ्या देशातील महावणिज्य दूत घेणार मुंबईतील प्रसिद्ध बाप्पांचं दर्शन; शासनाचा नवा उपक्रम

गणेशोत्सवाची संस्कृती परदेशात पोहोचावी परदेशी पर्यटक मुंबईत यावे यासाठी यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. यंदा मुंबईमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या देशातील महावणिज्य दूत यांना पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन करवण्यात येणार आहे. यासाठी पर्यटन विभागाकडून 2 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर या तारखांची निवड करण्यात आलेली आहे.

आज एमटीडीसीच्या वतीने लालबागच्या राजाचं यासोबतच गिरगावच्या राजाचं आणि जीएसबी गणपतीचं या सर्व कॉन्सिलेट जनरल यांना दर्शन करवण्यता येईल. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा लालबागचा राजाच दर्शन घेते वेळी या सर्व शिष्टमंडळासोबत उपस्थित राहणार आहेत. याबाबत माहिती देताना एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय महासंचालक जयश्री भोज म्हणाल्या की या उपक्रमाचं हे पहिलं वर्ष आहे. या उपक्रमामुळे नक्कीच परदेशातील नागरिकांपर्यंत गणेशोत्सवाबाबत माहिती पोहचेल आणि या उपक्रमाला पुढील वर्षी मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळेल.

Sep 02, 2022  |  09:53 AM (IST)
विमानवाहक नौका विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल करण्याचा सोहळा LIVE

विमानवाहक नौका विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल करण्याचा सोहळा LIVE

Sep 02, 2022  |  09:51 AM (IST)
श्री मुरुघा मठाचे मुख्य पुजारी शिवमूर्ति मुरुघा शरणारू हॉस्पिटलमध्ये

श्री मुरुघा मठाचे मुख्य पुजारी शिवमूर्ति मुरुघा शरणारू यांना छातीत दुखू लागल्यामुळे जिल्हा रुग्णालयात केले दाखल

Sep 02, 2022  |  09:50 AM (IST)
पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 93.01 डॉलरवर पोहचला आहे. आज ही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
 

Sep 02, 2022  |  09:48 AM (IST)
गुजरातमधील अरवली जिल्ह्यात मोठा अपघात, १२ पादचाऱ्यांना कारने उडवले, ६ जणांचा मृत्यू

गुजरातमधील अरवली जिल्ह्यात मोठा अपघात, १२ पादचाऱ्यांना कारने उडवले, ६ जणांचा मृत्यू

Sep 02, 2022  |  09:45 AM (IST)
अमेरिकेत ३०  मुलांना मंकीपॉक्सची बाधा

अमेरिकेत ३०  मुलांना मंकीपॉक्सची बाधा, अमेरिकेतील टेक्सास प्रांतात मंकीपॉक्समुळे एका नागरिकाचा मृत्यू

Sep 02, 2022  |  09:41 AM (IST)
लोकसभेच्या २०२४च्या निवडणुकीत पंतप्रधानपादासाठी विरोधकांचा उमेदवार ठरविण्याकरिता चर्चा सुरू

लोकसभेच्या २०२४च्या निवडणुकीत पंतप्रधानपादासाठी विरोधकांचा उमेदवार ठरविण्याकरिता चर्चा सुरू आहे. चर्चेतून लवकरच उमेदवार निश्चित होईल. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली माहिती.