LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 04 August 2022 Latest Update: संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 04 August 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 04 August 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Aug 04, 2022  |  05:57 PM (IST)
सातारा | साताऱ्यात ढगफुटी सदृश पाऊस, मुसळधार पाऊसाने जनजीवन विस्कळीत

सातारा शहरासह ग्रामीण भागामध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाल्याने शहरासह परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते तर अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठेमध्ये नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाल्याचे पाहायला मिळाले.

Aug 04, 2022  |  05:42 PM (IST)
मोटरसायकल आणि चारचाकी वाहन चोरणारा आरोपी अटकेत

लातूर - गेल्या वर्षभरापासून उदगीर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोटरसायकली चोरीचे प्रमाण वाढलेलं होतं आणि या अनुषंगाने लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी एक पथक तयार करून, सदर चोरी प्रकरणाचे चौकशी सुरू केली होती गेल्या एक महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीस गेलेल्या गाड्या रिकव्हर करण्यात व मोटरसायकल चोर ताब्यात घेण्याचं काम ग्रामीण पोलिसांच्या वतीने सुरू होतं.  आज पुन्हा आणखीन काही चोर  पोलिसांच्या हाती लागले असून त्यांच्याकडून चोरी गेलेले एक मोटरसायकल व चार चाकी वाहन ताब्यात घेण्यात आला असून  आरोपी हा उदगीर तालुक्यातील नावंदी येथील असून त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात येत असून आरोपीवर भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी दिली.

Aug 04, 2022  |  04:25 PM (IST)
कॉमनवेल्थ २०२२ - हिमा दास २०० मी धावण्याच्या स्पर्धेत कॉलिफाय

कॉमनवेल्थ २०२२ स्पर्धेत धावपटू हिमा दास हिने पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. २०० मी, धावण्याच्या स्पर्धेत पहिल्या हिटमध्ये हिमा दासने अतिशय सहजपणे आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला.

Aug 04, 2022  |  03:44 PM (IST)
सरस्वती स्कूलच्या समोर, हातगाड्यांवर दोन झाडे पडली

ठाणे : आज सकाळी आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे पोलिस हवालदार अवतार, स्वस्तिक रेसिडेन्सी जवळ, क्रिस कॉर्नर कमर्शियल प्लाझाच्या बाजूला, सरस्वती स्कूलच्या समोर, आनंद नगर, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे तीन हातगाड्यांवर दोन झाडे पडली होती. सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी २-पिकअप वाहनासह तसेच, अग्निशमन दलाचे जवान १-इमर्जन्सी वाहन व १-रेस्क्यू वाहनासह उपस्थित आहेत. सदर घटनेत कोणालाही दुखापत नाही.

Aug 04, 2022  |  02:32 PM (IST)
आमदार प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद

- लढाई करणाऱ्या प्रत्येकाला वाटत आपणच जिंकणार. एखाद्याच्या वाटण्यावर किंवा मतांवर न्यायालयाचा निर्णय होत नसतो

- शिवसेनेने आपल्या सोयी प्रमाणे वॉर्ड रचना केली होती. सत्तेचा दूरुपयोग करत शिवेनेने मनमानी कारभार केला, काँग्रेसला देखील वॉर्डची रचना पसंद नव्हती, त्यामुळे वॉर्ड पुनर्रचना करण्याची मागणी केली होती.

- गर्वाचे राजकारण कोणीं केलं हे माहिती आहे आणि त्याचा अंत काय झाला ते सुद्धा पहिला आहे.

Aug 04, 2022  |  01:57 PM (IST)
बुलडाणा - बुलढाण्यातील भारत विद्यालयाचे लाचखोर मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

अकरावीत प्रवेश घेण्याकरिता संबंधित पालकाकडून 15 हजार रुपयांची मागणी करत तडजोडी अंति दहा हजार रुपये मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्यांनी स्वीकारले, यावरून मुख्याध्यापकासह इतर चार खाजगी कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. बुलडाणा शहरातील भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश देण्यासाठी मुख्याध्यापक प्रल्हाद धोंडू गायकवाड यांनी एका पालकाला पंधरा हजार रुपयाची मागणी केली होती, त्यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत, तक्रारकर्त्याकडून मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांच्या वतीने राहुल विष्णू जाधव यांनी दहा हजार रुपयांची लाज स्वीकारली... त्याचबरोबर आरोपी गजानन सुखदेव मोरे, जितेंद्र प्रल्हाद हिवाळे यांनी तक्रारदारास लाच देण्यास प्रवृत्त केल्याने, मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड, वस्तीगृह कार्यवाहक गजानन मोरे, मजूर जितेंद्र हिवाळे, लेखापाल राहुल जाधव या चौघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. तर गेल्या महिन्यातच खामगाव तालुक्यातील आवार येथील एका मुख्याध्यापकावर देखील एसीबीने कारवाई केली होती, त्यामुळे आता विद्येचे मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळांमध्ये देखील कारवाई होत असल्याने, विद्यार्थ्यांनी अशा लाचखोर शिक्षकांकडून नेमका काय आदर्श घ्यावा, हा एक प्रश्न उपस्थित होत आहे?

Aug 04, 2022  |  01:53 PM (IST)
संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ 

संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

Aug 04, 2022  |  01:34 PM (IST)
हेराल्ड हाऊसवर ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेसचा संसदेत गदारोळ, लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज १४ वा दिवस असून ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेसने संसदेत जोरदार गदारोळ केला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान, नॅशनल हेराल्ड इमारतीतील यंग इंडियनचे कार्यालय अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सील केल्यानंतर काँग्रेसनेही गुरुवारी आपल्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.

Aug 04, 2022  |  01:26 PM (IST)
सोलापूर - अक्कलकोट तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग

- कुरनूर धरण ८५% भरले 

- कुरनूर धरणातील पाणी ६०० क्यूसेकने बोरी नदीत सोडले

- पुरस्थिती उदभवू नये म्हणून कुरनूर धारणाचा विसर्ग वाढवला

- नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

- धुवांधार पावसामुळे मोट्याळ - कुरनूर पूल गेला पाण्याखाली

Aug 04, 2022  |  01:17 PM (IST)
संजय राऊत प्रकरणात आणखी काही नवी कागदपत्रे मिळाली आहेत : ईडी

संजय राऊत प्रकरणात आणखी काही नवी कागदपत्रे मिळाली आहेत, तपासाकरिता ईडी कोठडी वाढवून मिळावी : ईडी

Aug 04, 2022  |  01:13 PM (IST)
ईडी कोठडीत एसी रूममध्ये आहेत संजय राऊत

ईडी कोठडीत काही त्रास आहे का असे कोर्टाने विचारताच संजय राऊत यांनी मला ज्या खोलीत ठेवलंय तिथे व्हेंटिलेशन नाही अशी तक्रार केली त्यावर रूममध्ये एसी असल्याची माहिती ईडीने दिली

Aug 04, 2022  |  01:01 PM (IST)
संजय राऊत यांना थोड्याच वेळात PMLA कोर्टात हजर करणार

पत्राचाळ घोटाळा : संजय राऊत यांना थोड्याच वेळात PMLA कोर्टात हजर करणार, राऊतांची ईडी कोठडी वाढणार की नाही लवकरच स्पष्ट होणार

Aug 04, 2022  |  12:54 PM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवसभरातील सर्व बैठका आणि भेटीगाठी रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवसभरातील सर्व बैठका आणि भेटीगाठी रद्द, प्रकृती बरी नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आजचे कार्यक्रम रद्द

Aug 04, 2022  |  12:41 PM (IST)
AURANGABAD | वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायतीच्या मतदानाला सुरुवात; १७ वार्डातील ७२ उमेदवारांसाठी आज मतदान

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायतीच्या मतदानाला आज सुरुवात झालीय या ग्रामपंचायत निवडणुकीत  १७ वार्डाकरिता ७२ उमेदवार उभे असून प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता योग्य पद्धतीने नियोजन केले आहे. ३७ हजार पेक्षा अधिक मतदार असलेल्या ग्रामपंचायतिच्या मतदानाला मतदार राजाचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मतदार राजा ही लोकशाही बळकट करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन मतदान करत आहे.

Aug 04, 2022  |  11:35 AM (IST)
भारतात २४ तासांत १९८९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतात २४ तासांत १९८९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, देशात सध्या १ लाख ३६ हजार ४७८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण.

Aug 04, 2022  |  11:26 AM (IST)
सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट वि. शिवसेना प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी

शिंदे गट वि. शिवसेना प्रकरणी पुढील सुनावणी सोमवार ८ ऑगस्ट २०२२ रोजी होणार

Aug 04, 2022  |  11:24 AM (IST)
निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय देऊ नये : सर्वोच्च न्यायालय

निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय देऊ नये : सर्वोच्च न्यायालय

Aug 04, 2022  |  11:22 AM (IST)
निर्णय आम्ही घेऊ : खंडपीठ

निर्णय आम्ही घेऊ, सिब्बल यांना सर्वोच्च न्यायालयाने सुनावले : खंडपीठ

Aug 04, 2022  |  11:21 AM (IST)
शिवसेना कोणाची हे कोर्टाने ठरवावे, मोठ्या खंडपीठाकडे पाठवू नये : सिब्बल

शिवसेना कोणाची हे कोर्टाने ठरवावे, मोठ्या खंडपीठाकडे पाठवू नये : सिब्बल

Aug 04, 2022  |  11:18 AM (IST)
निवडणूक चिन्हावर दावा केला तर त्यावर निर्णय घेण्यास निवडणूक आयोग बांधील

एखाद्या गटाने त्याची बाजू मांडत निवडणूक चिन्हावर दावा केला तर त्यावर निर्णय घेण्यास निवडणूक आयोग बांधील, वकील अरविंद दातार यांनी निवडणूक आयोगाच्यावतीने सांगितले