LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 05 August 2022 Latest Update: CWG 2022 कॉमनवेल्थ गेम्स कुस्तीमध्ये भारताला सिल्व्हर मेडल, अंशू मलिकची शानदार झुंज

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 05 August 2022 Latest Update:  दिवसभरातील घडामोडी
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 05 August 2022 Latest Update: दिवसभरातील घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Aug 05, 2022  |  09:55 PM (IST)
कुस्तीमध्ये भारतला सिल्व्हर मेडल, अंशू मलिकची शानदार झुंज

कुस्तीमध्ये भारतला सिल्व्हर मेडल, अंशू मलिकने फायनलमध्ये शानदार झुंज दिली. नाजेरियाच्या ओडिनायो हिने अंशू मलिक हिला 6-4 अशा गुणांनी पराभूत केले. ओडिनायो हीचे हे तिसरे गोल्ड मेडल आहे. गेल्या दोन कॉमनवेल्थमध्ये तीने गोल्ड मेडल जिंकले आहे. 

Aug 05, 2022  |  06:53 PM (IST)
भंडारा - सूडाच्या भावनेतून एकाची हत्या; दोन आरोपींना अटक

बहिनीची हत्या करणाऱ्या जावयाची हत्या करून बदला घेण्याची खूनगाठ मनात बांधुन घराबाहेर पडलेल्या दोघांना जावई तर भेटला नाही मात्र त्याचा भाऊ सापडल्याने फावडयाने त्याच्यावर हल्ला करून मृत बहिणीच्या दिराची निर्घृणपणे हत्या केली. सदर घटना भंडारा शहरातील मेंढा परिसरातील भुशुंड गणेश मंदिर परिसराच्या मागे असलेल्या बोडीलगत आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. ओमप्रकाश धनराज मेश्राम वय ३२ वर्षे रा.पांडराबोडी त.जि.भंडारा असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून क्रिष्णा रामदास चापरे वय २५ व राकेश महादेव मंदुरकर वय २५ वर्षे रा.नेहरू वार्ड भंडारा अशी आरोपींची नावे आहेत.

Aug 05, 2022  |  05:45 PM (IST)
जालन्यात बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त

जालन्यातील सदर बाजार पोलिसांनी सौंदर्य प्रसाधने विक्री करणाऱ्या दुकानांवर छापेमारी केली आहे. या छापेमारीत हिंदुस्थान युनिलीव्हर लिमिटेड कंपनीच्या नावाने बनावट सौदर्य प्रसाधने विक्री करणाऱ्या दुकानातून लाखो रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नेत्रीका कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेडच्या एका अधिकाऱ्याने या संदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.शहरातील कडबीमंडी भागात हिंदुस्थान युनिलीव्हर कंपनीचे बनावट सौंदर्य प्रसाधने विक्री होत असल्याची ही तक्रार होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कडबीमंडी भागांत जाऊन 3 दुकानांवर छापेमारी केली. या छापेमारीत लँकमे या ब्रँडचे 2 लाख 75 हजार रुपयांचे बनावट कॉस्मेटिक आढळून आले असून या प्रकरणी पोलिसांनी दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहे. या बनावट सौंदर्य प्रसाधनावर कोणताही बॅच नंबर, बारकोड आढळून आलेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

Aug 05, 2022  |  05:35 PM (IST)
NAVI MUMBAI | कोकण विभागात घरोघरी तिरंगा अभियान उत्साहात राबविणार

नवी मुंबई : संपूर्ण कोकण विभागात घरोघरी तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. संपूर्ण कोकण पट्ट्यात अंदाजे 37 लाख तिरंगा झेंड्यांची आवश्यकता असून याहून अधिक झेंडे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, नगर परिषद या सर्व शासकीय कार्यालयासह सर्व सार्वजनिक ठिकाणी झेंडे विक्री साठी उपलब्ध असणार आहेत. कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांनी यासंदर्भातील अधिक माहिती दिले. 

Aug 05, 2022  |  05:04 PM (IST)
संगमनेरमध्ये आज तीन ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

ग्रामविकास तथा विरभद्र मंडळाने ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे व उद्योजक आदिकराव खेमनर ८ जागा जिंकून सत्ता खेचून आणली.‌ तर शेतकरी विकास मंडळाच्या अवघ्या ३ जागा निवडून आल्या.

Aug 05, 2022  |  04:54 PM (IST)
CWG 2022 कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान सुरक्षेमध्ये त्रुटी, कुस्तीचा सामना थांबवल्यानंतर स्टेडियम रिकामे करण्यात आले

CWG 2022: सुरक्षेच्या त्रुटीमुळे कुस्तीचे सामने थांबवले

बर्मिंगहॅममधील कुस्तीचे सामने सुरक्षेतील त्रुटींमुळे स्थगित करण्यात आले आहेत. संपूर्ण स्टेडियम रिकामे करण्यात आले आहे. आता कुस्तीचे अंतिम सामनेही लांबणार आहेत. भारताच्या बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी पहिल्या फेरीत बाजी मारली आहे. दोन्ही कुस्तीपटूंनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

Aug 05, 2022  |  02:50 PM (IST)
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला - दीपक केसरकर

शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर लाईव्ह 

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य यांची बदनामी करण्याचा प्रयत्न 
आदित्य यांच्या बदनामी करण्यात राणेंचा मोठा वाटा
आदित्य यांच्या बदनामीनं दुखावल्यानं भाजपला जाब विचारला होता
राणेंनी आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप केले होते
मी नरेंद्र मोदींशी वैयक्तिक चर्चा केली होती - दीपक केसरकर
ठाकरे कुटुंबाबद्दल आम्हाला प्रेम आणि आदर आहे 
आदित्य ठाकरेंच्या बदनामीमुळे अनेकजण नाराज होते 

Aug 05, 2022  |  02:41 PM (IST)
कराड तालुक्यातील एकूण ७ ग्रामपंचायतींचा निकाल, राष्ट्रवादीची कमाल

शिवसेनेला तालुक्यात भोपळाही फोडता आला नाहीये. भाजपने एका ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे. शिंदे गटाला देखील एका ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल ४ ग्रामपंचायतींवर आपला विजयाचा गुलाल उधळला आहे. इतर स्थानिक आघाडी एका ग्रामपंचायतीवर सत्ता काबिज केली आहे.

Aug 05, 2022  |  02:39 PM (IST)
औरंगाबाद : एकनाथ शिंदे गटाचे संदीपान भुमरे गटाचा ७ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपंचायतीवर विजय

पैठणमध्ये एकनाथ शिंदे गटाचे संदीपान भुमरे गटाने ७ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. मतमोजणी अजूनही सुरू आहे.

Aug 05, 2022  |  02:30 PM (IST)
सोलापूर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामदैवत अमोगसिद्ध बहुजन ग्रामविकास पॅनल बहुमताने विजयी

-  दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतीवर ग्रामदैवत अमोगसिद्ध बहुजन ग्रामविकास पॅनलच्या 6 पैकी 5 उमेदवारांनी मारली बाजी
- मागच्या 15 वर्षांपासूनच्या भाजपच्या सत्तेला पडलं खिंडार
- भाजपाचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनलला एका जागेवर मानावे लागले समाधान
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वात सर्व पक्षांनी मिळून भाजपचा उडवला धुव्वा.
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायती भाजपच्या हातून निसटल्या.
- विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत हलगीच्या तालावर साजरा केला जल्लोष

Aug 05, 2022  |  01:22 PM (IST)
महागाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक 
काँग्रेसचं आज देशभरात आंदोलन
दिल्लीतील काँग्रेसच्या आदोलनात राहुल गांधी, प्रियंका गाधीही सहभागी 
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात
काँग्रेसचे अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात

Aug 05, 2022  |  12:43 PM (IST)
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून 125 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रविकांत तुपकर यांचा आरोप

राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाणं वाढलं आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करण्याचं आश्वासन दिलं होत. परंतु त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून आत्तापर्यंत 150 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला.

Aug 05, 2022  |  12:47 PM (IST)
MUMBAI | विधानभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ; विधानभवन परिसरातूनच काँग्रेस नेत्यांना पोलीस ताब्यात घेण्याची
MUMBAI | विधानभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ; विधानभवन परिसरातूनच काँग्रेस नेत्यांना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता
Aug 05, 2022  |  11:13 AM (IST)
वर्धा - वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ठोकले प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनियमित व मनमानी कारभार कंटाळून माजी सरपंच विजय तडससह रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्यांभऱ्यापुर्वी प्रामाणिकपणे सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी डॉ मिलींद गुजर व डॉ मुन यांच्या जागी दोन नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र हे दोन्ही वैद्यकीय अधिकारी आपला मनमानी कारभार करीत असुन वेळेवर रुग्णालयात येत नसल्याने याचा रोज याठिकाणी येत असलेल्या शेकडो ग्रामीण भागातील रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.याला कंटाळून गिरडचे माजी उपसरपंच विजय तडस,मोहगांव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास नवघरे,गिरडचे उपसरपंच मंगेश गिरडे यांच्यासह नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वार कुलूप लावून आधी असलेले दोन्ही डॉक्टरांची मागणी केली आहे.
Aug 05, 2022  |  09:46 AM (IST)
मुंबईत पुन्हा डी गँग कार्यरत
Aug 05, 2022  |  09:45 AM (IST)
भारताच्या सुधीरचा नवा विक्रम
Aug 05, 2022  |  09:45 AM (IST)
लॉन्ग जंपमध्ये श्रीशंकरनं पटकावलं रौप्यपदक
Aug 05, 2022  |  09:43 AM (IST)
धुळे जिल्ह्यात ५२ पैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध

धुळे जिल्ह्यात ५२ पैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध, ४१ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू आहे, संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदान होणार

Aug 05, 2022  |  09:39 AM (IST)
मुंबै बँकेत सत्तांतर होणार?
Aug 05, 2022  |  09:08 AM (IST)
Congress Protest : महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं आज देशव्यापी आंदोलन

काँग्रेसने आज (5 ऑगस्ट) महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत.