Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखर यांचा दणदणीत विजय. जगदीप धनखर यांना मिळाली ५२८ मते. मार्गारेट अल्वा यांना मिळाली १८२ मते. अल्वा यांचा पराभव.
#VicePresidentialElections2022 | Out of 780 electors comprising elected & nominated members of the RS & elected members of LS, 725 electors cast their votes. Total voter turnout - 92.94%: Utpal Kumar Singh, Lok Sabha Secretary-General pic.twitter.com/29xjxnkbXJ
— ANI (@ANI) August 6, 2022
Delhi | NDA candidate Jagdeep Dhankar won by 346 votes as he bagged 528 of the total 725 votes that were cast. While 15 were termed invalid, Opposition candidate Margret Alva received 182 votes in the election: LS Gen-Secy Utpal K Singh pic.twitter.com/ZNHcbmftAU
— ANI (@ANI) August 6, 2022
भारताचे १४वे उपराष्ट्रपती झाले जगदीप धनखर
#VicePresidentialElection #Breaking | NDA candidate #JagdeepDhankhar wins the election for the second-highest constitutional post. pic.twitter.com/yAMQVdto4B
— TIMES NOW (@TimesNow) August 6, 2022
जळगाव : दिवसेंदिवस वाढत चालल्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत जळगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशातील वाढती महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर कॉंग्रेसच्या देशव्यापी आंदोलन केले जात आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉक्टर उल्हास पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी देशात हुकूमशाही सुरु झाली आहे. बेरोजगारी महागाईच्या प्रश्नावर बोलणाऱ्यांना ईडीची भीती दाखवून त्यांना गप्प केले जात असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारने आणलेली अग्निपथ योजना, ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी, गॅस, दरवाढ आदी घोषणाबाजी केली. सदरच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा परीसर दणदणला होता. काँग्रेसच्या वतीने आंदोलनरुपी निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
जळगाव : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेने हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. या अभियानासाठी शासकीय निम शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था शैक्षणिक संस्था व सर्वसामान्य नागरिकांना तिरंगा झेंडा उपलब्ध व्हावा यासाठी चोपड्यात मनोरमा या ठिकाणी ना नफा न तोटा या तत्त्वावर तिरंगा झेंडा विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून शासकीय प्रशासकीय पदाधिकारी व अधिकारी यांना शहरात तिरंगा ध्वज घेण्यासाठी या ना नफा ना तोटा या नुसार या अभियानात जास्त जास्त सहभाग होण्यासाठी नक्कीच सोयीचे होईल.
भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरण
बलात्कार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल
प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश
एसआयटीत महिला आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश
- राज्यातील १६ मतदार संघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना दिली
- कल्याण लोकसभा मतदार संघाकरता अनुराग ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली.
- ३ दिवसांचा २१ कलमी कार्यक्रम असणार आहे.
- मोदींजींची योजना लोकांपर्यंत पोहोचली की नाही याबाबत आढावा घेणार केंद्रीय मंत्री.
- हे सरकार खुप चांगले काम करणार.
- काही लोकं दिवसा स्वप्न बघत आहेत.
- त्यांची जबाबदारी योग्य पणे पार पाडावी.
- शिंदे फडणवीस सरकार मजबूत आहेत.
- ३६ दिवसात ४२ निर्णय घेतले.
- राज्याला ओबीसी आरक्षण अणि निधी जास्त मिळावा याकरता हे दौरे आहेत.
- मोदींजीच्या कार्यक्रमाकरता सीएम डीसीएम दिल्लीत गेलेत
- सीएम डी सीएम ला ७० वेळा जावं लागेल.
- न्यायालय कुठेच बोलले नाही मंत्री मंडळ विस्तार करु नये म्हणुन
- मविआने अडीच वर्षे लोकांशी बेईमानी केली.
- अजित पवारांना पाहिजे असेल तर त्यांनाही दिल्ली घेवून जावू.
- आज निती आयोगाच्या बैठकीला गेलेत.
-पिकपाणी दौरा करुन पंचनामे केले.
- चौकशी होईल त्यात सर्व समोर येईल
- महाराष्ट्रात ४८ पैकी ४८ भाजपा येतील
- १२ आमदार दिल्या शिवाय मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक मंडळ सुरु करणार नारी असं बोलले होते
- जे काम १ वर्षात महाविकास आघाडीने केले नाही ते काम आताच्या मुख्यमंत्र्यांनी १महिन्यामध्ये करुन दाखवले.
— nitesh rane (@NiteshNRane) August 6, 2022
बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि बदलत्या हवामानाने साथीच्या आजाराने डोकं वर काढले आहे. जिल्हा रुग्णालय सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, अतिसार, यासह इतर आजारांनी त्रस्त झालेल्या रुग्ण संख्येत वाढ झाली. उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट वर आहे. रुग्णांमध्ये वृध्दांसह लहान मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे जिल्हा चिकित्सकांनी सांगितले. जलजन्य आजारांमध्ये डायरिया, कावीळ साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून प्यावे तसेच सर्दी ताप खोकला असेल तर लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घ्यावेत असा सल्ला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी दिला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना घेऊन जात असलेली बस उधमपूरमध्ये दरीत कोसळली, १८ जखमी. जखमींमध्ये ८ विद्यार्थी
देशात कोरोना संसर्ग किंचित कमी झाल्याचं दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात मिनी बस दरीत कोसळली. ही बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना दुर्घटना घडली आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.