LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 07 September 2022 Latest Update: उद्या रात्री 12 वाजता लालबाग राजाच्या मुखदर्शनाची रांग बंद करण्यात येणार

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 07 September 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 07 September 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
 

Sep 07, 2022  |  10:11 PM (IST)
उद्या रात्री 12 वाजता लालबाग राजाच्या मुखदर्शनाची रांग बंद करण्यात येणार

लालबागचा राजाची विसर्जन पूर्व तयारीसाठी उद्या सकाळी 6 वाजता चरणस्पर्शची रांग आणि उद्या रात्री 12 वाजता मुख दर्शनाची रांग बंद करण्यात येणार आहे.

Sep 07, 2022  |  08:53 PM (IST)
मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात

मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात

मुसळधार पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम 

मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम

Sep 07, 2022  |  06:54 PM (IST)
NANDED | नवनीत राणा यांची लायकी नाहीये उद्धव ठाकरेंना एकेरी भाषेत बोलण्याची - माजी खासदार सुभाष वानखेडे

आज हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे हे नांदेड येथे आले असता यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता नवनीत राणा यांची लायकी नाहीये. उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलण्याची. त्या 2019 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाने निवडून आल्या आहेत. पण आता भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या राणा दापत्य शिवसेनेच्या नादाला लागलं तर येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू देऊ.

राणा दापत्यांनी उद्धव ठाकरेंविषयी शब्द वापरू नये. येणारा दसरा मेळावा उद्धवसाहेब ठाकरे हेच घेतील. गेली 50-60 वर्षापासून शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे सभा घ्यायचे. आता उद्धवसाहेबच सभा घेतील हा माझा ठाम विश्वास आहे. असे पत्रकारांशी बोलताना सुभाष वानखेडे म्हणाले
 

Sep 07, 2022  |  06:01 PM (IST)
मुंबई, ठाण्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; यलो अलर्ट जारी

मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल आहे हवामान विभागाने या जिल्ह्यांन यलो अलर्ट जारी केला आहे. 

Sep 07, 2022  |  05:45 PM (IST)
राज्यातील 1166 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यातील 1166 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
1 हजार 166 ग्रामपंचायतीत जनतेतून सरपंच निवडणार

थेट सरपंचपदासह 1166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान 
18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांत 1 हजार 166 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक
संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू
14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होणार

Sep 07, 2022  |  04:56 PM (IST)
चार दिवसात डबेवाल्यांच्या सहा सायकली चोरीला

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर डबेवाल्यांचा व्यवसाय अद्याप पर्यंत स्थिरावला नाही. वर्क फॅार्म होमचा मोठा प्रभाव व्यवसायावर पडला आहे. अशा स्थितीतही काही मोजके डबेवाले मुंबईत काम करत आहेत. चार दिवसात डबेवाल्यांच्या सहा सायकली विविध ठिकाणावरून चोरीला गेल्या आहेत. नालासोपारा, बोरीवली, विलेपार्ले येथील स्टेशनच्या बाहेर उभ्या केलेल्या सायकलींपैकी काही सायकली चोरीला गेल्या आहेत. ज्या डबेवाल्यांच्या सायकली चोरीला गेल्या आहेत त्यांना दहा हजार रूपयांचा फटका बसला आहे. यामुळे डबेवाल्यांची चिंता वाढली आहे जर सायकल चोरी अशीच चालू राहीली तर उद्या आपली ही सायकल चोरीला जावू शकते. अशी शंका डबेवाल्यांन मध्ये निर्माण झाली आहे. नवीन सायकलची किंमत दहा हजार रूपयापर्यंत जाते. आधीच करोना मुळे रोजगार जेमतेम राहीला आहे, त्यात सायकलला दहा हजार रूपये खर्च कसा करायचा  हा प्रश्न डबेवाल्यांच्या पुढे उभा राहीला आहे. चोरी गेलेल्या सायकलींचा लवकरात लवकर शोध घ्यावा व डबेवाल्यांच्या सायकली स्टेशनच्या ज्या भागात लावल्या जातात तेथे पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी 'मुंबई डबेवाला असोशिएशन' मुंख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Sep 07, 2022  |  04:54 PM (IST)
नितीश कुमार यांनी घेतली शरद पवार यांची भेट

नितीश कुमार यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Sep 07, 2022  |  04:50 PM (IST)
ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात

ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात
सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस 

Sep 07, 2022  |  04:23 PM (IST)
संजय राऊतांचा मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज

संजय राऊतांचा मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज
अर्जावर उद्या सुनावणीची शक्यता
संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत
कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडीकडून अटक

Sep 07, 2022  |  04:10 PM (IST)
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार अनावरण

उद्या गुरूवारी कर्तव्य पथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार.

Sep 07, 2022  |  03:18 PM (IST)
AMRAVATI | पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी कॉल रेकॉर्ड केल्याचा नवनीत राणांनी केला आरोप

अमरावतीमध्ये काल एका 19 वर्षीय युवतींचे अपहरण केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला. या प्रकरणामध्ये सोहेल शहा नावाच्या युवकला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलेले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या खा. नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांना कॉल केला असता तो कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. त्यावरून राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे व पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्यावर नवनीत राणा चांगल्याच भडकल्या. 

मी मागासवर्गीय असल्याने माझा कॉल रेकॉर्ड केला असा आरोप करत ठाणेदार मनीष ठाकरे यांचा फोन हिसकावून घेतला. त्यावेळी पोलीस व नवनीत राणा यांच्यामध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला. गेल्या दहा दिवसात ही पाचवी घटना असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला व पोलीस तातड़ीने पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. दरम्यान नवनीत राणा यांनी मुलीच्या आईला आपल्या घरी सोबत नेले आणि दोन तासामध्ये मुलीला आणावे असा अल्टीमेट पोलीस अधिकारी विक्रम साळी यांना दिलं.

Sep 07, 2022  |  02:50 PM (IST)
अहमदनगरमध्ये मंदिरातुन श्री कृष्णाची मूर्तीची चोरी 

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हनवाडा येथील मंदीरातून श्री कृष्णाची मूर्ती चोरीला गेली आहे. श्री कृष्ण मंदिर मुकूंद आश्रम येथून ही मूर्ती चोरीला गेली असून याचा तपास अकोले पोलीस करत आहे. त्यासाठी फिंगरप्रिंट तसेच श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. सदर मूर्ती जर कोणाच्या निदर्शनास आली तर मंदिर प्रशासनाशी संपर्क करावा असे आवाहन महंत फाटे बाबा यांनी केले आहे.  अकोले पोलिसात याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 07, 2022  |  02:04 PM (IST)
आमचे सुप्रीम कोर्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - दिलीप लांडे (आमदार )

दसरा मेळाव्यासंदर्भात आज आमदार आणि खासदारांच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्यक्षात उपस्थित राहणार नाहीत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला पुण्यावरून उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे.

त्यामुळे नक्की शिंदे गटाचा दसरा मेळावा घ्यायचा की नाही आणि घेतला तर नेमका कुठे होणार हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. याबाबतच बोलताना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे म्हणाले की, आमचे सुप्रीम कोर्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत.
 

Sep 07, 2022  |  12:20 PM (IST)
आयकर विभागाची मोठी कारवाई, महाराष्ट्रासह देशातील 50 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी  

देशभरात विविध ठिकाणी आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. आज आयकर विभागनं देशातील विविध 50 ठिकाणी छापेमारी केली आहे. दिल्लीपासून, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके पोहोचली असून, चौकशी सुरु आहे. कर चुकवेगिरी प्रकरणी दिल्लीतील अनेक व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे

Sep 07, 2022  |  10:56 AM (IST)
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पुन्हा पुढे ढकलली, २७ सप्टेंबरला पुढील सुनावणीला होणार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पुन्हा पुढे ढकलली, २७ सप्टेंबरला पुढील सुनावणीला होणार

Sep 07, 2022  |  10:52 AM (IST)
धनुष्यबाण हे चिन्ह गोठवा, शिंदे गटाची घटनापीठासमोर मागणी

धनुष्यबाण हे चिन्ह गोठवा, शिंदे गटाची घटनापीठासमोर मागणी

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निवडणूक चिन्हावर निकल द्या - शिंदे गटाचे वकील कौल

Sep 07, 2022  |  10:50 AM (IST)
राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू

राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू,  नीरज किशन कौल सुरुवातीचा युक्तीवाद करत आहे

Sep 07, 2022  |  10:48 AM (IST)
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतले मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि  लालबागचा राजाचे दर्शन

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज, बुधवार दि. 7 सप्टेंबर रोजी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि  लालबागचा राजा गणेशोत्सवाला भेट देऊन श्रीगणपती बाप्पांचे दर्शन घेतले. राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध कर, राज्यातील सर्व नागरिकांना सुखी ठेव, महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा धावता ठेव, कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य अशा सर्व क्षेत्रातील देशातील सर्वात प्रगतशील, अव्वल राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक कायम राहू दे, अशी प्रार्थना अजितदादांनी श्रीगणपती बाप्पांकडे यावेळी केली.

Sep 07, 2022  |  09:46 AM (IST)
अबू आझमी यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला लावली हजेरी

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाला हजेरी लावली.

Sep 07, 2022  |  09:39 AM (IST)
वर्धा - अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी-वडिलांवर गुन्हा दाखल

बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना वर्धा जिल्ह्यात  उघडकीस आली आहे. नराधम बाप १७ वर्षीय पोटच्या मुलीवर सलग तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर पोलीस स्टेशन  अंतर्गत येणाऱ्या बोरगाव आलोडा या गावात घडली आहे.वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशनं अंतर्गत येणाऱ्या आलोडा बोरगावात गावात एक नराधम बापाने आपल्या पोटच्या १७ वर्षीय मुलीवर सलग तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता.