LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 08 August 2022 Latest Update: मंगळवारी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार?

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 08 August 2022 Latest Update:  दिवसभरातील घडामोडी
Breaking News 08 August 2022 Latest Update: दिवसभरातील घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Aug 08, 2022  |  08:05 PM (IST)
PUNE | जुन्नरच्या बेल्हे गावात पुराच्या पाण्यातून जाणं दोघांच्या आले अंगलट
Aug 08, 2022  |  06:59 PM (IST)
NASHIK | मला मंत्रिपद मिळालं तर नक्कीच... - आमदार सुहास कांदे
Aug 08, 2022  |  04:48 PM (IST)
KOLHAPUR | मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
Aug 08, 2022  |  03:44 PM (IST)
मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा होत असतात पण वस्तूथितीत रूपांतर होत नाही - उदयन राजे भोसले
मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा होत असतात पण वस्तूथितीत रूपांतर होत नाही - उदयन राजे भोसले
Aug 08, 2022  |  02:31 PM (IST)
महाराष्ट्रात मंगळवार ९ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार

महाराष्ट्रात मंगळवार ९ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार, सूत्रांची माहिती

Aug 08, 2022  |  01:52 PM (IST)
संजय राऊत न्यायालयीन कोठडीत

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी

Aug 08, 2022  |  12:52 PM (IST)
नागपुरात स्कूल व्हॅन पडली नाल्यात 3 मुले जखमी
दिलीप कांबळे । नागपूर नागपुरातील बेलतरोडी परिसरात आज सकाळी स्कूल व्हॅन नाल्यात पडली, या व्हॅनमध्ये एकूण 16 विद्यार्थी होते, त्यात 3 मुले जखमी झाली, मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपुरात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, आज सकाळी ही व्हॅन मुलांना घेऊन शाळेत जात असताना अचानक रस्त्यालगत वाहणाऱ्या नाल्यात पडली आणि त्याच व्हॅनमध्ये मुलंही अडकली. तेव्हा उपस्थित नागरिकांनी मुलांना वाचववले आणि सर्व मुलांना व्हॅनमधून बाहेर काढले. या अपघातात 3 मुले जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Aug 08, 2022  |  12:21 PM (IST)
दादर शिवाजी पार्क मधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड उन्मळून पडले
दादर येथील शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळील एक गुलमोहरचे झाड उन्मळून पडले आहे. हे झाड खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी लावले होते. हे झाड उन्मळून पडल्याने स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर स्मृतीस्थळावर पहाणीकरता दाखल झाल्या असून स्मृतीस्थळाची दुरूस्ती करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत.
Aug 08, 2022  |  11:09 AM (IST)
टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं; चर्चा होताच सत्तारांना आला बदनामीचा संशय

 महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून  या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली होती. या  यादीमध्ये हिना अब्दुल सत्तार आणि उझमा अब्दुल सत्तार या माजी राज्यमंत्र्यांच्या मुलींचीही नावं समोर आली आहेत. 

Aug 08, 2022  |  11:07 AM (IST)
खाटूश्यामजी जत्रेत चेंगराचेंगरी; मंदिराचे दरवाजे उघडताच घडली घटना, महिलांचा गुदमरुन मृत्यू
राजस्थानातील सीकर येथील खाटूश्यामजी मंदिरात चेंगराचेंगरीची घटना घडली असून यात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे.
Aug 08, 2022  |  10:48 AM (IST)
 कल्याण रामबाग परिसरात धोकादायक इमारत कोसळली ; ६० वर्षीय माणसाचा मृत्यू

कल्याण पश्चिम रामबाग मेनरोड पवनबारच्या समोर 29 जूनला पहाटे  6 वाजेच्या सुमारास  तळ अधिक  १ मजला असलेले चाळ कोसळली. यत  60 वर्षीय सूर्यभान काकड याचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी उषा काकड या गंभीर जखमी झाल्या आहेत.  या दुर्घटनेनंतर  पालिका प्रशासनाने  कारवाईचा बडगा  उचलत रामबाग परिसरातील धोकादायक इमारतीवर कारवाई सुरू केली आहे. अशा प्रकारे  दुर्घटना झालेल्या  चाळीला लागूनच असलेल्या दोन मजली धोकादायक इमारतीवर पालिकेने ही कारवाई केली. मात्र पालिका कर्मचाऱ्यांचे तोडक कारवाई करताना इमारतीचे  वरचे दोन मजले पाडले आणि तळमजला  न तोडता काम बंद केले होते. 

Aug 08, 2022  |  10:43 AM (IST)
अकोल्यातील निर्गुणा धरण ओव्हरफ्लो
अकोला जिल्ह्यातील निर्गुना धरण ओव्हर फ्लो झाले आहे दोन्ही सांडव्यामधून अर्ध्या फुटाने पाण्याचा विसर्ग सुरूआहे. तसेच धरण भरल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदचे वातावरण आहे. या धरणातून 27 गावातील शेतकऱ्यांना पाणी पुरवठा केला जातो व 14 गावांना पिण्याकरिता पाणी पुरवठा केला जातो. येणाऱ्या दिवसामध्ये पाण्याची आवक पाहता पाहता नदीकाठच्या गावांन सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
Aug 08, 2022  |  10:33 AM (IST)
गेल्या 24 तासात देशात 16 हजार 167 नवीन कोरोनाबाधितांची नोंद

देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 167 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर रविवारी दिवसभरात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  देशात आजपर्यंत 4 कोटी 34 लाख 99 हजार 659 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

Aug 08, 2022  |  08:15 AM (IST)
आज श्रावणातील दुसरा सोमवार, आजची शिवामूठ तीळ

श्रावण महिना सुरु झाला आहे. आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे. दुसऱ्या सोमवारची शिवामूठ तीळ आहे. 

Aug 08, 2022  |  08:12 AM (IST)
दुगारवाडी धबधबावर अडकलेल्या 17 पर्यटकांची सुटका, एक जण अजूनही बेपत्ता

नाशिक: त्र्यंबकेश्वरमधील दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या 17 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मध्यरात्री त्यांची सुटका करण्यात यश आलं. अद्याप एक पर्यटक बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Aug 08, 2022  |  08:08 AM (IST)
संजय राऊतांना जामीन मिळणार की तुरूंगात राहावं लागणार? आज होणार सुनावणी

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची आज ईडी कोठडी आज संपणार आहे. आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे राऊतांना आज जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Aug 08, 2022  |  08:03 AM (IST)
राज्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

पुढील 4 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  हवामान विभागानं (IMD) म्हटलं आहे की, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.