LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 10 August 2022 Latest Update: पुण्याच्या रुपी बँकेचा परवाना रद्द

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 10 August 2022 Latest Update:  दिवसभरातील घडामोडी
Breaking News 10 August 2022 Latest Update: दिवसभरातील घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Aug 10, 2022  |  08:05 PM (IST)
पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13, 600 रुपयांची मदत जाहीर

मुंबई : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे शतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यात पंचनामे झाले आहेत. काही ठिकाणी आणखी पंचनामे सुरु आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात 15 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शिवसेना आणि भाजपच्या सरकारने निर्णय घेतला आहे. एनडीआरफच्या निकषानुसार, शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार 800 रुपये मिळतात. शिंदे सरकारकडून याच्या दुप्पट रक्कम देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या निर्णायानुसार शेतकऱ्यांना आता 13, 600 रुपये मिळणार आहेत.   

Aug 10, 2022  |  07:50 PM (IST)
राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजियोप्लास्टी
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना कार्डियेक अरेस्ट आला होता, त्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर अँजियोप्लास्टी होणार आहे.
Aug 10, 2022  |  07:49 PM (IST)
रक्षाबंधन सणाचा उत्साह; बाजारात राख्या खरेदीसाठी गर्दी

उद्या (१० ऑगस्ट) रक्षाबंधन सण असल्याने सर्वत्र रक्षाबंधन सणाचा उत्साह आहे. बाजारात देखील खरेदीसाठी धूम आहे. गेले दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने सण मोठ्या उत्साहात साजरा करता आले नाही. घरीच रक्षाबंधन सण साजरा केला गेला. याशिवाय बहिणींना देखील भावाकडे न जाता आल्याने त्यांनी राख्या पोस्टाने पाठविल्या होता. मात्र यंदा कोरोनाचा आकडा कमी झाला आणि सर्वत्र निर्बंध देखील हटविण्यात आले. त्यामुळे मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सण देखील साजरा करता येणार आहे. त्यामुळे अनेकांनी बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे बुकिंग देखील केले आहे. तसेच काहींनी बसने जाण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आता रेल्वे, बसला देखील गर्दी वाढली आहे. याशिवाय बाजारात देखील मोठ्या प्रमाणावर राखी खरेदी करण्यासाठी महिला, युवतींकडून गर्दी केली जात आहे. बाजारात देखील राख्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. एकूणच शहरात रक्षाबंधन सणाचा उत्साह आहे. परंतु मागील वर्षापेक्षा यावर्षी राख्यांची भाव जरा वाढलेच आहे असे महिलांनी सांगितले. यावेळी दुकानांमध्ये दहा रुपयांपासून अडीचशे ते साडेतीनशे रुपये पर्यंतची राखी सध्या उपलब्ध आहे. त्यापेक्षाही जास्त किमतीच्या राख्या मार्केटमध्ये असल्याचे व्यापारी सांगत आहे.

Aug 10, 2022  |  07:45 PM (IST)
नितीश कुमार यांना व्हायचे होते उपराष्ट्रपती, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
जदयूचे नेते नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती व्हायचे होते असा गौप्यस्फोट भाजप नेते सुशील मोदी यांनी केला आहे. तसेच जदयूच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपकडे ही मागणी केल्याचेही मोदी यांनी सांगितले.
Aug 10, 2022  |  07:12 PM (IST)
AURANGABAD | शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांचे शहरात जंगी स्वागत
Aug 10, 2022  |  07:07 PM (IST)
पुण्याच्या रुपी बँकेचा परवाना रद्द

आरबीआयची मोठी कारवाई 
पुण्याच्या रुपी बँकेचा परवाना रद्द

Aug 10, 2022  |  06:14 PM (IST)
'हर घर तिरंगा'मुळे खादीवर झालाय परिणाम?
Aug 10, 2022  |  05:24 PM (IST)
एक कोटीची लाच मागणारा निलंबित पोलीस कॉन्स्टेबल जॉन तिवडे अखेर सांगली पोलिसांच्या जाळ्यात

सांगली : पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथील शेतकऱ्याकडे एक कोटीच्या लाचेची मागणी करणारा कोल्हापूर पोलीस दलातील निलंबित पोलीस कॉन्स्टेबल जॉन विलास तिवडे याला सांगली जिल्ह्यातील कुपवाड एम. आय. डी. सी. पोलिसांनी अटक केली. 2020 मध्ये नात्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार केल्याप्रकरणी जॉन तिवडे यावर कुपवाड मध्ये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो दोन वर्षापासून फरार होता. कुपवाड एम. आय. डी. सी. पोलिसांनी जॉन तिवडे याला अटक केली असून आरोपी जॉन तिवडे याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 

Aug 10, 2022  |  05:01 PM (IST)
SANGLI | वारणा धरणातून 9448 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू
Aug 10, 2022  |  04:51 PM (IST)
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तात्काळ दिलासा पाहिजे - बाळासाहेब थोरात

राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे आज मंत्रिमंडळाची बैठक आहे शेतकऱ्यांना दिलासा पाहिजे. - माजी मंत्री बाळासाहेब थोरात

राज्यातील माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे फेसबुक येथे जात असताना चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालय येथे सदिच्छा भेट दिली यावेळी माजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील यांनी त्यांचे स्वागत केलं यावेळी महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांनी देखील त्यांची भेट घेतली यावेळी विधानपरिषदेचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महिला जिल्हा अध्यक्ष सुलोचना पाटील माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी चर्चा केली. चाळीस दिवसानंतर का असेना मतभेद दूर होऊन मंत्रिमंडळ बनविले या 40 दिवसांमध्ये बरंच काही घडलं अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पिकांचे दहा लाख हेक्टर पेक्षाही जास्त नुकसान झाला आहे अजून पर्यंत पंचनामे नाही त्या ठिकाणी शासनाचे कुठले निर्देश नाही शेतकऱ्यांना काय मदत करणार की नाही काही बोलायला तयार नाही मंत्रिमंडळ बनला आहे खातेवाटप कधी होणार आपण सांगू शकत नाही मंत्रिमंडळाचे आज बैठक आहे त्यांनी काहीतरी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे आज तातडीने शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा दिला पाहिजे.

Aug 10, 2022  |  03:37 PM (IST)
DHULE | 24 तास उलटून गेले पण अद्यापही खाते वाटप नाही: बाळासाहेब थोरात
Aug 10, 2022  |  03:17 PM (IST)
वाशिम, यवतमाळ येथे पावसामुळे झालेल्या नुसान भरपाईला वेगळं पॅकेज द्या - खासदार भावना गवळी

वाशिम, यवतमाळमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचे तातडीने पंचनामे करून वाशिम यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भाला वेगळे पॅकेज जाहीर करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ही मागणी करणार असल्याचे यवतमाळ, वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी म्हटले आहे.

Aug 10, 2022  |  02:19 PM (IST)
SANGLI | वारणा धरणातून विसर्ग वाढवला, वारणा नदी पात्रा बाहेर; सांगलीत कृष्णा नदीला पूर
Aug 10, 2022  |  02:10 PM (IST)
नितीश कुमार यांनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ 

बिहारमध्ये आता गठबंधन सरकार 
नितीश कुमार यांनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ 
नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्रिपदी
तेजस्वी यादव बिहारचे उपमुख्यमंत्री

Aug 10, 2022  |  01:05 PM (IST)
जळगाव : खाजगीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांचा संप

जळगाव - केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेशन योजना लागू करा, डाक विभागाचं खाजगीकरण करू नये या मागण्यांसाठी आज डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या पोस्ट कार्यालयातील सर्व कर्मचारी या संपात सहभागी झालेत. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी खाजगीकरण रद्द करा,जुनी पेन्शन योजना लागू करा,अशी घोषणाबाजी करत आपल्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आज डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यानं पोस्ट कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरीकांची चांगलीच गैरसोय झाली.

Aug 10, 2022  |  12:51 PM (IST)
भीमा कोरेगाव प्रकरण:84 वर्षीय पी. वरवरा राव यांना वैद्यकीय कारणांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

भीमा कोरेगाव प्रकरणात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 84 वर्षीय पी. वरावरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी वैद्यकीय कारणांवर जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती यू.यू. ललित, अनिरुद्ध बोस आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने राव यांनी वैद्यकीय कारणास्तव कायमस्वरूपी जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नकाराला आव्हान देणाऱ्या विशेष याचिकेवर हा आदेश दिला आहे.

Aug 10, 2022  |  12:07 PM (IST)
CHANDRAPUR | वर्धा, इरई व पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Aug 10, 2022  |  11:45 AM (IST)
अहमदनगरमधल्या कोपरगावत मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणीच पाणी; जनजीवन विस्कळीत

कोपरगाव परिसरात पहाटेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आलाय. रस्ते जलमय झाले तर अनेक शेतात पाणी साचले. नाले ओसंडून वाहत असल्याने शहरातील अनेक भागात  घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे आतोनात हाल झाले.

Aug 10, 2022  |  11:30 AM (IST)
प्रियांका गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

प्रियांका गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Aug 10, 2022  |  10:57 AM (IST)
राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला
गेले तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजापैकी द्वार क्रमांक सहा हा स्वयंचलित दरवाजा सकाळी साडेपाच वाजता उघडला आहे. त्यातून 1428 क्युसेस व बीओटी पावर हाऊस मधून1600 क्युसेस असे मिळून 3028 क्युसेस भोगावती नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी नदी पातळीत वाढ होणार असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.