LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 10 July 2022 Latest Update: दक्षिण आफ्रिकेतील एका बारमध्ये गोळीबार,14 जणांचा मृत्यू

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाउ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Breaking News 10 July 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 10 July 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाउ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 10, 2022  |  01:58 PM (IST)
जोहान्सबर्ग शूटिंग: जोहान्सबर्गच्या बारमध्ये हल्लेखोरांचा अंदाधुंद गोळीबार, 14 ठार, 10 हून अधिक जखमी
दक्षिण आफ्रिकेतील एका बारमध्ये झालेल्या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी मध्यरात्रीनंतर सोवेटो या बारमध्ये प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार केला. हल्ला केल्यानंतर बंदुकधारी हल्लेखोर पांढऱ्या टोयोटा क्रांटम मिनीबसमधून पळून गेले.
Jul 10, 2022  |  01:23 PM (IST)
आरेमधील मेट्रो कारशेडविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज आरेमधील मेट्रो कारशेड विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनाला आमचा भक्कम पाठिंबा असल्याचे, सांगून, आरे बचावासाठी शिवसेना सदैव लढा देईल. मुंबईच्या फुफ्फुसांना धक्का पोहचू देणार नाही, असा विश्वास आंदोलनकर्त्यांना दिला.

Jul 10, 2022  |  12:51 PM (IST)
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार

कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची सलग संततधार सुरू असल्याने तसेच धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या जोरदार पावसाने पंचगंगेची पाणीपातळी इशारा पातळकीडे वाटचाल करत आहे.  गेल्या चोवीस तासांमध्ये पंचगंगेच्या पाणीपातळीत दीड फुटांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे राधानगरी धरणही (Radhanagari dam) 50 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील इतर प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीमध्येही वाढ होत असल्याने पाणी  पात्राबाहेर पडत आहे. 

Jul 10, 2022  |  12:48 PM (IST)
रोहिणी कारागृहातील 81 कर्मचारी-अधिकारी सुकेश चंद्रशेखरकडून दर महिन्याला घेत दीड कोटी रुपयांची लाच

आर्थिक गुन्हे शाखेने (दिल्ली) दिल्लीतील रोहिणी कारागृहातील 81कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या हवाल्याने रविवारी ही माहिती देण्यात आली. महाथुग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची बाब समोर येत आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने 8 तुरुंग कर्मचाऱ्यांना अटक केली होती.  सुकेश दर महिन्याला दीड कोटी रुपये तुरुंगातील कर्मचाऱ्यांना वाटून देत असे. त्या बदल्यात त्याला कारागृहात मोबाईल वापरणे, वेगळ्या कोठडीत राहणे यासह अन्य सुविधा मिळत होत्या. पोलिसांना एक चिठ्ठी देखील मिळाली आहे ज्यात लाच घेणाऱ्या सर्व तुरुंग कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Jul 10, 2022  |  12:43 PM (IST)
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही राजकीय भूकंप; काँग्रेसला मोठा धक्का, सायंकाळपर्यत 10 आमदार भाजपात प्रवेश करणार

गोवा राज्यातही राजकीय भूकंप होणार आहे. काँग्रेसचे 11 पैकी 10 आमदार भाजपात विधिमंडळ गटात विलीनीकरण करण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप श्रेष्ठींकडूनही यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येत आहे. आज गोव्यातील राजकीय हालचाली गतीमान होणार असल्याचं सांगितलं जात आहे.  गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून आज सायंकाळपर्यंत दहा आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

Jul 10, 2022  |  12:41 PM (IST)
Ashadhi Ekadashi Yatra : तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Jul 10, 2022  |  12:31 PM (IST)
आदित्य ठाकरे वगळून ५३ आमदारांना नोटिस; व्हिप उल्लंघन प्रकरणी दोन्ही गटाच्या आमदारांना नोटिस

आदित्य ठाकरे वगळून ५३ आमदारांना नोटिस; व्हिप उल्लंघन प्रकरणी दोन्ही गटाच्या आमदारांना नोटिस

Jul 10, 2022  |  12:30 PM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज्यातील पहिला शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा आयोजित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज्यातील पहिला शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा आयोजित