LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 11 July 2022 Latest Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे १३ जुलै रोजी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाउ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Breaking News 11 July 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  BCCL
Breaking News 11 July 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाउ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 11, 2022  |  06:32 PM (IST)
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, नदीकाठची मंदिरे गेली पाण्याखाली
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे नदीकाठची मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. हवामान विभागाने पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Jul 11, 2022  |  05:24 PM (IST)
ओबीसी आरक्षण सहित या निवडणुका झाल्या पाहिजेत - जयंत पाटील
ओबीसी आरक्षण सहित या निवडणुका झाल्या पाहिजेत, राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांची मागणी
Jul 11, 2022  |  05:17 PM (IST)
अंबरनाथमध्ये शिवसेनेला धक्का, २० माजी नगरसेवकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा
अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रातील २० माजी नगरसेवकांनी कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेल अंबरनाथमध्ये खिंडार पडले आहे.
Jul 11, 2022  |  04:52 PM (IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे १३ जुलै रोजी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार 

१३ जुलै रोजी कार्यकर्त्यांना संबोधित करणार 

रंगशारदा येथे पक्षाच्या पदाधिकारी, सरचिटणीस यांना उपस्थित राहण्याचे आदेश 

Jul 11, 2022  |  02:58 PM (IST)
अनिल देशमुखांना दिलासा नाहीच:विशेष सीबीआय कोर्टाने जामीन नाकारला

भ्रष्ट्राचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष सीबीआय कोर्टाने जामीन नाकारला आहे. देशमुखांचे जवळचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचेही जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. 

Jul 11, 2022  |  02:16 PM (IST)
सांगली जिल्ह्यात वारणा नदीतील पाणी पात्राबाहेर, नदी काठची शेती पाण्याखाली
सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची गवत आणि पिके पाण्याखाली गेली आहेत. तर दुसरी कडे सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे.
Jul 11, 2022  |  01:30 PM (IST)
आमदार भरत गोगावले यांच्या गाडीचा अपघात
एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. आठ गाड्या एकमेकांना धडकल्याची माहिती समोर आली आहे.
Jul 11, 2022  |  01:16 PM (IST)
National Emblem Unveiled: : पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवनात केलं नवीन अशोक स्तंभाचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) सकाळी नवीन संसद भवनाच्या इमारतीच्या छतावर कांस्य राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभाचे अनावरण केले. यानंतर त्यांनी नवीन संसद भवनाचे काम करत असलेल्या कार्यकर्त्यांशीही संवाद साधला

Jul 11, 2022  |  12:07 PM (IST)
शिवसेना आमदार निलंबन प्रकरणी लवकरच खंडपीठ स्थापन होईल
शिवसेना आमदार निलंबन प्रकरणी लवकरच खंडपीठ स्थापन होईल आणि त्यानंतर तारीख देण्यात येईल अशी माहिती वकील राजसाहेब पाटील यांनी दिली.
Jul 11, 2022  |  12:05 PM (IST)
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदार निलंबनाप्रकरणी तातडीची सुनावणी नाकारली.
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदार निलंबनाप्रकरणी तातडीची सुनावणी नाकारली. सरन्यायाधीश म्हणतात प्रकरणाला वेळ लागेल. ऍडव्होकेट राजसाहेब पाटील यांची माहिती.
Jul 11, 2022  |  11:33 AM (IST)
शिवसेनेने जनादेशाचा आदार राखावा- बानवकुळे 

सेनेने दाखल केलेल्या सर्व याचिका मागे घ्याव्यात, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन
शिवसेनेने जनादेशाचा आदार राखावा- बानवकुळे 
 

Jul 11, 2022  |  11:24 AM (IST)
उद्याही सुनावणीची शक्यता नाही.

सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कारवाई नको. - कोर्ट

तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी कुठलीही कारवाई करू नये -कोर्ट

सुनावणी कधी होईल अद्याप सांगता येणार नाही.

उद्याही सुनावणीची शक्यता नाही.

Jul 11, 2022  |  11:11 AM (IST)
सर्वोच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी करण्यास नकार

सर्वोच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी करण्यास नकार
आजच सुनावणी घेण्याची शिवसेनेची मागणी.
सर्वोच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी करण्यास नकार
 

Jul 11, 2022  |  11:07 AM (IST)
शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना
शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
१६ आमदारांच्या निलंबनासाठी खंडपीठ नेमणार
 

Jul 11, 2022  |  11:14 AM (IST)
सुनावणी पूर्ण होई पर्यंत १६ आमदारांवर कारवाई नको - कोर्ट

सुनावणी पूर्ण होई पर्यंत १६ आमदारांवर कारवाई नको - कोर्ट
महाधिवक्त्यांना कोर्टाच्या सूचना
शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू