LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News : सलमान रश्दी यांच्यावर न्यू यॉर्कमध्ये चाकू हल्ला

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 12 August 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  BCCL
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Aug 12, 2022  |  09:01 PM (IST)
सलमान रश्दी यांच्यावर न्यू यॉर्कमध्ये चाकू हल्ला

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यू यॉर्कमध्ये एका कार्यक्रम दरम्यान चाकू हल्ला करण्यात आला.  ते भाषण करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. 

Aug 12, 2022  |  06:27 PM (IST)
माझा मुख्यमंत्री रस्त्यावरील लोकांकरिता लढतो - संजय गायकवाड

माझा मुख्यमंत्री रस्त्यावरचा आहे तो रस्त्यांवरील लोकांसाठी लढतो आणि सत्ता आली असली तरी त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी मोर्चात सहभागी होणार आहे अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलढाणा येथे धनगर समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर दिली आहे. तसेच त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत ते म्हणाले की, एक एक फॉरेस्ट ऑफिसर चांगले बीट मिळण्याकरिता पाच पाच हजाराची लाच घेतात. यावेळी आमदार गायकवाड यांनी धनगर समाजाची पदाधिकाऱ्याला आपल्या भाषेत सुनावले की तुमचा वापर तिकडे कोणी केला असेल पण जेवढे धनगर मी वाचवले तेवढे कोणीही वाचवले नसतील तसेच ते पुढे म्हणाले की हा त्रास होणाऱ्या मेंढ्या तलवार काढून वाचवले मी. त्यामुळे अशी भाषा येथे वापरू नका अशी तंबी ही यावेळी आमदार गायकवाड यांनी दिली आहे.

Aug 12, 2022  |  04:53 PM (IST)
चोरीच्या २१ लाखांच्या ६४ मोटारसायकली जप्त

पंढरपूर शहर गुन्हा प्रकटीकरण शाखेकडून आठ आरोपींकडून २१ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या ६४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या मोटारसायकली सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, बीड, पंढरपूर या शहरातून चोरण्यात आल्या आहेत. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, टाकळी रोड बायपास येथे एक इसम चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती शहर पोलिसांना बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून येथील एका आरोपीस ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता यातील संशयित आरोपी विशाल रजपुत (रा. टाकळी बायपास) याच्याकडून माहिती मिळाली. 

Aug 12, 2022  |  04:00 PM (IST)
मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेरमध्ये वाद्याच्या तालावर धरला ठेका, गिरीश महाजनांचं जामनेरमध्ये जोरदार स्वागत
जळगाव - भारतीय जनता पार्टीचे आमदार गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज ते जामनेर मतदारसंघांमध्ये दाखल झाले. जामनेर शहरांमध्ये गिरीश महाजनांचे जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी डीजे व विविध वाद्याच्या तालावरती गिरीश महाजनांनी ठेका धरल्याचे पहावयास मिळाले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता बदल झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ते प्रथमच त्यांच्या जामनेर मतदारसंघामध्ये पोहोचले. आज जामनेर येथे पोहोचल्यानंतर गिरीश महाजन यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. गिरीश महाजन यांची जंगी मिरवणूक ही करण्यात आली. यावेळी फटाक्याची आतिषबाजी, विविध वाद्यांचे ताल, सूर व डीजे च्या आवाजामुळे जामनेर परिसर दुमदुमून निघाला होता. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनीही विविध वाद्यांच्या व डिजेच्या तालावरती ठेका धरून कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळण्याचे चित्र आज जामनेरात पहावयास मिळाले आहे.
Aug 12, 2022  |  03:19 PM (IST)
चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजपचे तर आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे दोघेही राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री झाले. यानंतर सरकार आणि संघटना या दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर एकच व्यक्ती नको या भाजपच्या अंतर्गत नियमानुसार महाराष्ट्र भाजपसाठी आणि मुंबई भाजपसाठी नव्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजपचे तर आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष झाले.

Aug 12, 2022  |  03:09 PM (IST)
बाळासाहेबांचे विचार जे जपतात तेच खरी शिवसेना - मंत्री दीपक केसरकर

बाळासाहेबांचे विचार जे जपतात तेच खरी शिवसेना  - मंत्री दीपक केसरकर

Aug 12, 2022  |  03:06 PM (IST)
वादळी पावसात अकोलेचे जोगेश्वरी विद्यालय भुईसपाट

वादळी पावसात अकोलेचे जोगेश्वरी विद्यालय भुईसपाट

Aug 12, 2022  |  03:06 PM (IST)
बापू कुटी मध्ये आल्या नंतर आत्मिक समाधान आणि आनंद प्राप्ती होते - देवेंद्र फडणवीस

बापू कुटी मध्ये आल्या नंतर आत्मिक समाधान आणि आनंद प्राप्ती होते - देवेंद्र फडणवीस

Aug 12, 2022  |  03:04 PM (IST)
संगमनेरमध्ये बसने दुचाकीस्वारास उडवले;दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू

मध्यप्रदेश आगाराच्या बसने दुचाकीस्वारास उडवले असून अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली

Aug 12, 2022  |  03:03 PM (IST)
सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील - सुधीर मुनगंटीवार

Aug 12, 2022  |  02:58 PM (IST)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी संगमनेरमध्ये शासकिय अधिकाऱ्यांनी काढली प्रभात फेरी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी संगमनेरमध्ये शासकिय अधिकाऱ्यांनी काढली प्रभात फेरी

Aug 12, 2022  |  02:57 PM (IST)
नाशिक: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त हर घर तिरंगा रॅली, येवले नगरपरिषद व बचत गटाच्या महिलांचा समावेश

नाशिक: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त हर घर तिरंगा रॅली, येवले नगरपरिषद व बचत गटाच्या महिलांचा समावेश

Aug 12, 2022  |  02:57 PM (IST)
राज्यात रखडलेला विकास मार्गी लागेल - गिरीश महाजन

राज्यात रखडलेला विकास मार्गी लागेल, अधिवेशन सुरू होण्याआधी खातेवाटप पूर्ण होईल - गिरीश महाजन

Aug 12, 2022  |  02:54 PM (IST)
कोयना धरणाचे वक्रदरवाजे १ फूट ६ इंचानी उचलले; गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पर्जन्य आवक वाढल्याने धरणाचे वक्रदरवाजे एक फूट सहा इंच उघडून आठ हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. धरण पायथा विद्युत गृहातून २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. एकूण नदीपात्रात १०१०० क्युसेक्स विसर्ग होत आहे.

Aug 12, 2022  |  02:34 PM (IST)
उद्धव ठाकरेंचं माजी नगरसेवकांना मार्गदर्शन

उद्धव ठाकरेंचं माजी नगरसेवकांना मार्गदर्शन
आगामी निवडणुकीसाठी माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंचा सल्ला
शिंदे गटाला कामातून उत्तर देऊ - उद्धव ठाकरे
कामं करा, वॉर्डमध्ये फिरा - उद्धव ठाकरे
तुम्हाला खूप आश्वासनं दिली जातील... त्यांचं काही ऐकू नका - उद्धव ठाकरे
खूप आमिष दाखवली जातील, पण कुणाचं ऐकू नका - उद्धव ठाकरे 

Aug 12, 2022  |  01:37 PM (IST)
धुळ्यात पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित पेट्रोलची विक्री, अनेक ग्राहकांच्या तक्रारी

धुळ्यात पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित पेट्रोलची विक्री, अनेक ग्राहकांच्या तक्रारी

धुळे शहरातील सौजन्य पोलिस पेट्रोल पंप या नावाने असलेल्या पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी पेट्रोल भरुन वाहन चालवले मात्र काही अंतरावर गेल्यावर वाहने अचानक बंद पडत असल्याची तक्रारी पुढे आल्या. त्यानंतर पेट्रोल पंप मॅनेजर ने पेट्रोल कंपनीशी बोलून ग्राहकांच्या तक्रारी ऐकून पेट्रोल बदलून दिले.   

वाहन चालकांनी आपापली वाहने गॅरेज मध्ये दाखवल्यानंतर पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल सोबत पाणी असल्याचं उघड झालं. यानंतर वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर धाव घेऊन तपासणी केली असता पाणी मिश्रित पेट्रोलची विक्री होत असल्याचं निदर्शनास आलं. तर अनेक वाहनधारकांनी पेट्रोल बाटलीत घेतले आणि पाहणी केली तर काय पाणी मिश्रित पेट्रोलची विक्री होत असल्याचे दिसून आलं. 

Aug 12, 2022  |  10:45 AM (IST)
भारतात २०७ कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचले
भारतात २०७ कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचले
Photo Credit: टाइम्स नाऊ मराठी
भारतात २०७ कोटी ४७ लाख १९ हजार ०३४ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचले
भारतात २०७ कोटी ४७ लाख १९ हजार ०३४ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचले
Aug 12, 2022  |  09:55 AM (IST)
दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून केली मजुराची हत्या

जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून केली मजुराची हत्या. बांदीपोरा जिल्ह्यात सोदनारा सुंबल येथे मोहम्मद अमरेज नावाच्या मजुराची हत्या. दिवंगत मजूर बिहारमधील मधेपुराचा रहिवासी.

Aug 12, 2022  |  09:44 AM (IST)
मुंबईत वांद्रे खाडी परिसरात बुडालेल्या दोघांचा शोध सुरू

मुंबईत वांद्रे खाडी परिसरात बुडालेल्या दोघांचा शोध सुरू

Aug 12, 2022  |  09:35 AM (IST)
विदर्भाला १४ ऑगस्ट पासून ऑरेंज अलर्ट

विदर्भाला १४ ऑगस्ट पासून ऑरेंज अलर्ट. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येसुद्धा दमदार पावसाचा अंदाज.