दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.
दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.
नवी मुंबईत आज केंद्रीय मंत्री नारायण राणे एका कार्यक्रमांसाठी आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटले, राजनाथ सिंग यांच्या फोन नंतर उध्दव ठाकरे रागावले असल्याचे कोणी पाहिले. ते एकटेच घरात होते. फार फार त्यांच्या पत्नीने पाहिले असेल. राजनाथ सिंग संरक्षण मंत्री आहेत... उद्धव ठाकरे कोण आहेत, काय त्यांच अस्तित्व. उद्धव ठाकरेंना इतरांकडे हात जोडत फिरावे लागत असल्याचे सांगत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांची खाल्ली उडवली. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे राणे म्हणाले. आता काय रागवण्या एवढे दिवस राहिले आहेत का उध्दव ठाकरेंचे. काय परिस्थीती वाईट आहे.
सलग पाचव्या दिवशी पडत असलेल्या मुसळधार पावसाने चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची तीन दारे उघडली आहेत. 0.25 मीटर्सने उघडलेल्या तीन दारातून 51 क्युमेक एवढा जलविसर्ग, इरई नदी व पुढे वर्धा नदीच्या तीरावरील वसाहती आणि गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 48 मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. बल्लारपूर राजुरा आणि जिवती या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील दहापैकी पाच सिंचन प्रकल्प काठोकाठ भरले, तर इरई धरणही 86 % भरले असून पुढील तीन महिन्यांचा पाऊस काळ बघता धरणातून विसर्गाला सुरुवात करण्यात आली.
शहरातील भडकल गेट परिसरातून औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध करण्यासाठी औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद शहरातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनांना आमंत्रित करण्यात आले होते मात्र सदरील मोर्चाला अल्प प्रतिसाद आज रोजी मिळाला आहे. खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा सदरील मोर्चामध्ये एक औरंगाबादकर म्हणून या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. औरंगाबाद शहरातील काही मुस्लिम संघटना आणि काही राजकीय पक्षांचा औरंगाबाद शहराची संभाजीनगर करण्याला विरोध असून त्याचा निषेध म्हणून आज भडकल गेट परिसरातून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील मोर्चा आज रोजी काढण्यात आला असून मात्र या मोर्चासाठी पाहिजे तशी नागरिकांची गर्दी झाली नाही.
पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदरील मोर्चा अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता. भर पावसामध्ये भडकल गेट परिसरातून नामांतराचा निषेध करण्याच्या अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात आला असून.यामध्ये नागरिकांनी सहभाग घेतल्याचे चित्र दिसून आले मात्र मोर्च्याला पाहिजे तशी गर्दी आज जमा झाली नाही.
देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. काही राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळं राज्यात आत्तापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे.
मनसे नेते अमित ठाकरे हे आज महासंपर्क अभियानासाठी पनवेलमध्ये आले असता त्यांनी दि.बा.पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले,तर घरात बसून दि.बा.पाटील यांच्या कुटुंबीया सोबत चर्चाही केली.आपण दी.बा.पाटील साहेब यांना ओळखत असून,त्यांचे कार्य खूप मोठे होते,तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव मिळणार असल्याने आनंद व्यक्त केला.यावेळी त्यांनी राज साहेब या निर्णयाने खुश असल्याचे आवर्जून सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या. मात्र, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीय. एका अहवालात म्हटलंय की, कमी किमतीत इंधनाची विक्री केल्यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना जून तिमाहीत 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं (ICICI Securities) सोमवारी जारी केलेल्या आपल्या अहवालात म्हटलंय की, एप्रिल-जून तिमाहीत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. परंतु, पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले. त्यामुळं तेल कंपन्यांचं विपणन स्तरावर मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने गडचिरोली, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, कोल्हापूर अशा डझनावर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे प्रशासनही सज्ज असून अनेक ठिकाणी एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. हवामान विभागाने सोमवार व मंगळवार अशा दोन दिवसांसाठी औरंगाबादसह जालना जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात गडचिरोलीसह नागपूर, नाशिक, नांदेड जिल्हा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापुरात पावसाचा जोर आहे.
बंडखोरांनी अजूनही परत यावे, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, असे आवाहन सातत्याने करणाऱ्या शिवसेनेने दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांविरोधात कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. दररोज एक-एक पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली जात आहे. यामध्ये मंगळवारी आणखी एका बंडखोराची भर पडली. शिवसेनेकडून शिंदे गटातील बंडखोर आमदार रवींद्र फाटक यांची पालघर जिल्हासंपर्क प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.