LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 13 July 2022 Latest Update: मुसळधार पावसामुळे कल्याण - मुरबाड - नगर महामार्ग वाहतुकसाठी बंद

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 13 July 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 13 July 2022 Latest Update

दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 13, 2022  |  07:46 PM (IST)
कल्याण मुरबाड नगर महामार्ग वाहतुकसाठी बंद

ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस 
मुसळधार पावसाचा फटका कल्याण नगर महामार्गाला 
माळशेज  घाटाच्या माथ्यावरही जोरदार पाऊस 
मुरबाड तालुक्यातील किशोर गावातून देखील पुराच्या पाण्याचे लोंढे वाहत असल्याने रस्ता पाण्याखाली 
शेकडो प्रवासी अडकून पडलेत तर नगरहून येणारी सर्व वाहनं मुरबाड येथे थांबण्यात आली आहेत
या महामार्गावरील कांबा येथे उल्हास नदीचं पाणी शिरलं, त्याचप्रमाणे रायते पुलही पाण्याखाली गेलाय

Jul 13, 2022  |  07:46 PM (IST)
बार्शी तालुक्यातील आगळगाव उंबरगे, भानसळे, कळंबवाडी, खडकोणी गावाचा संपर्क तुटला

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने आगळगावातील चांदणी नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांमधून मागणी होत आहे. संततधार पावसामुळे सोयाबिन, उडीद, मूग पिके पिवळी पडायला लागली आहेत.

Jul 13, 2022  |  05:05 PM (IST)
नागपुरात मुसळधार पाऊस, नागरिकांच्या घरात शिरले पाणी, 20 जणांचा मृत्यू
पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुरात बुडाले आहेत. गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उपराजधानी नागपूरमध्येही अशीच परिस्थिती आहे.
Jul 13, 2022  |  04:53 PM (IST)
राधानगरी धरणामध्ये 55 टक्के पाणीसाठा

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. राधानगरी धरण हे राजर्षी शाहू महाराजकालीन ऐतिहासिक धरण म्हणून ओळखले जाते. या धरणाची क्षमता 8.36 टीएमसी असून गेले पंधरा दिवस पावसाचा रोज जोर आहे. साधारण 120 ते 130 मिलिमीटर रोज पाऊस पडत आहे. धरणाची क्षमता 8.36 असली तरी आज रोजी धरणात 4.7 टीएमसी म्हणजे साधारण 55 टक्के पाणीसाठा आहे. 

दाजीपूर, हसणे आणि पडळी मधला पाऊस या धरणामध्ये एकत्रित येतो. असाच जर पावसाचा जोर रोज सुरू राहिला तर धरण भरायला साधारण आठ ते दहा दिवस लागू शकतात. धरणावर बीओटी तत्त्वावर पॉवर हाऊस आहे, ज्यावर 1350 क्यूसेक्सचा विसर्ग आणि पॉवर जनरेशन सुरु आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी जलसंपदा विभागाच्या सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत. दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे यावर्षीही धरण उशिरा भरण्याचा एक मोठा प्रयत्न लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार जलसंपदा विभागामार्फत केला जात आहे. जेणेकरून पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास धरणात पाणी साठवता येईल. तसेच पुराचे गांभीर्य थोडे कमी होईल. 

राधानगरी धरणाचे आपत्कालीन कक्ष 24 तास सुरु आहेत. याठिकाणी कर्मचारी नियुक्त केले असून धरणावर हे कर्मचारी रात्रंदिवस चोखपणे कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना, इशारे हे विभागीय कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तसेच व्हाट्सअपच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत.

Jul 13, 2022  |  04:14 PM (IST)
अकोला: बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील महादेव मंदिराला पाण्याचा वेढा
Jul 13, 2022  |  02:19 PM (IST)
नागपुरात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस
नागपूर शहरात गेल्या ४८ तासांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील तलाव नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
Jul 13, 2022  |  02:17 PM (IST)
हिंगोली जिल्ह्यातील मधुमती नदीला पूर
हिंगोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके गावाजवळून वाहणाऱ्या मधुमती नदीला आज सकाळी पूर आला आहे. येहळेगाव ते निशाणा या गावादरम्यान असणाऱ्या पुलावरून या पुराचे पाणी जात असल्याने निशाणा, आसोंदासह तीन ते चार गावांतील नागरिकांना प्रवास करण्यासाठी गैरसोय होत आहे. अनेक नागरिक जीव धोक्यात घालून या पुलावरून पलीकडे जात आहेत. काल रात्री झालेल्या या पावसामुळे परिसरातील शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
Jul 13, 2022  |  02:05 PM (IST)
सतत होणाऱ्या पावसामुळे पनवेलमधील रस्ते गेले पाण्याखाली
Jul 13, 2022  |  01:58 PM (IST)
गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा शेतकऱ्यांना फटका, निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शेती पाण्याखाली
गेल्या सहा दिवस नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नांदूर मधमेश्वर धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या निफाड तालुक्यातील गोदाकाट परिसरात असलेल्या गावातील शेती पिकांना याचा फटका बसला. नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेकडील त्रंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात पावसाने सहा दिवस जोरदार बॅटिंग केल्यामुळे दारणा आणि गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होते यामुळे गोदावरी नदीला पूर आला. या पुराचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या चांदोरी, सायखेडा, शिंगवे, चापडगाव, भुसे आणि करंजगाव या गावातील नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरले. पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने कांदा, ऊस, सोयाबीन, टोमॅटो, भुईमूग, मूग इत्यादी शेती पिके पाण्यातच असल्याने सोडून जाणार आहे. यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचे विसर्ग येणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजनबद्ध केले असते, तर शेतीचे नुकसान झाले नसते. योग्य नियोजन केल्यास शेतीचे नुकसान टाळता येईल याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करत झालेले शेतीचे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बाधित शेतकरी करत आहे.
Jul 13, 2022  |  01:07 PM (IST)
पावसामुळे महाराष्ट्रात ८९ मृत्यू, मागील २४ तासांमध्ये पावसामुळे ५ मृत्यू
पावसामुळे महाराष्ट्रात ८९ मृत्यू, मागील २४ तासांमध्ये पावसामुळे ५ मृत्यू
Jul 13, 2022  |  12:57 PM (IST)
कृष्णा नदीपात्रामध्ये लाखो मृत माशांचा खच
सांगली शहरासह जिल्ह्यातील नागठाणे ते आमणापूर कृष्णा नदीच्या पात्रालगत आज लाखो मृत माशांचा खच पडला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवणे गरजेचे असून नदीपात्रात रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता सोडल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात येत आहे. नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून याचाच लाभ उठवित कुणीतरी कारखान्यातील रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता तसेच सोडून दिले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे पाणी नदीत सर्वत्र पसरल्यानंतर लाखो मासे आणि खेकडे मृत्युमुखी पडले आहेत. नदीकाठी मृत माशांचा आणि खेकडय़ांचा खच पडला असून नदीकाठी तीव्र दुर्गंधी पसरलेली आहे. कृष्णा नदीकाठी असलेल्या पलूस तालुक्यातील नागठाणे, आमणापूर, भिलवडी घाटापर्यंत सर्वत्र या मृत माशांचे ढिग आढळत आहेत.
Jul 13, 2022  |  12:12 PM (IST)
नागपूरमध्ये पावसाचा कहर, अनेक नागरी वस्त्यांमध्ये शिरलं पावसाचं पाणी
Jul 13, 2022  |  12:08 PM (IST)
भिवंडीतील तीन बत्ती भाजी मार्केट पाण्याखाली, पावसाची संततधार सुरुच
Jul 13, 2022  |  12:04 PM (IST)
हिंगोली जिल्ह्यातील औंढा-नागनाथ तालुक्यातील मधुमती नदीला पूर
Jul 13, 2022  |  11:58 AM (IST)
मुंबईत संततधार सुरुच अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम
Jul 13, 2022  |  11:56 AM (IST)
कल्याण-डोंबिवली भागात तुफान पाऊस, खाडीचं पाणी वाढलं
Jul 13, 2022  |  11:50 AM (IST)
गिरणा नदीच्या पूराचे पाणी शेतात शिरले, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

गिरणा नदीच्या पूराचे पाणी शेतात शिरले, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Jul 13, 2022  |  11:42 AM (IST)
Nagpur Rain : नागपुरात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस

नागपूर शहरात गेल्या ४८ तासांपासून संततधार पाऊस पडत आहे.  त्यामुळे शहरातील तलाव नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचे तीन दरवाजे उघडले  आहेत. त्यामुळे नागपूरच्या पिवळी नदीला पूर आला आहे.  अधिक वाचा -Nagpur Rain : नागपुरात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस

Jul 13, 2022  |  11:39 AM (IST)
Maharashtra Rain: राज्यात पावसाचं थैमान, आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू; 'या' 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यात (Maharashtra) पावसानं थैमान घातलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD) राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक (Nashik) आणि नागपूर (Nagpur) जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अधिक वाचा -Maharashtra Rain: राज्यात पावसाचं थैमान, आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू

Jul 13, 2022  |  10:33 AM (IST)
SOLAPUR | २४ हजार लिटरचा पेट्रोल टँकर पेटला, अग्निशामक दलामुळे मोठी दुर्घटना टळली

उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी जवळील इंडियन ऑइलच्या डेपोतून एकूण २४ हजार लिटर पेट्रोल आणि डिझेल घेउन टँकर निघाला होता.  तो टँकर सोलापूरच्या दिशेने फ्लाय ओव्हेर पुलादरम्यान सर्व्हिसरोड वरून जात असताना अचानक टँकर चालकाच्या केबिनला आग लागली.