LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 14 August 2022 Latest Update : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केले भाषण

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 14 August 2022 Latest Update
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Aug 14, 2022  |  08:43 PM (IST)
नंदुरबार - जिल्ह्याच्या कुपोषणाच्या व दळणवळणाच्या प्रश्न सोडवण्यास प्राधान्य - मंत्री डॉ. विजयकुमार गावित

9 तारखेला मंत्रिमंडळाच्या विस्तार झाल्यानंतर आज अखेर खाते वाटप करण्यात आले. नंदुरबारचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांना पुन्हा एकदा आदिवासी विकास विभागाचे खाते देण्यात आले आहे .नंदुरबार जिल्ह्याला अॅड के. सी. पाडवी यांच्या रूपाने आदिवासी विकास खाते देण्यात आले होते. परंतु महाआघाडी सरकारच्या वेळेस पाहिजे तसा विकास जिल्ह्याच्या तसेच आदिवासी समाजाच्या झालेला नाही. त्यामुळे डॉ. विजयकुमार गावित यांच्या रूपाने जिल्ह्याच्या खुंटलेला विकास पूर्णतःस येईल. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याच सार्थक ठरून जे आदिवासी विकास खाते मला देण्यात आलेले आहे त्या खात्याच्या संपूर्ण उपयोग जनतेसाठी करण्यात येईल. रस्ते पाणी दळणवळण, रोजगार अशा वेगवेगळ्या समस्या या भागात आहेत त्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. असे डॉ. विजयकुमार गावित यांनी बोलताना सांगितले. 

Aug 14, 2022  |  08:28 PM (IST)
वन मंत्रालयाच्या निमित्ताने राज्यातील "वन है तो कल है" महत्व दाखविणारे मंत्रालय मिळाले: सुधीर मुनगंटीवार

राज्याच्या नवनियुक्त मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर झाले. त्यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना वन- सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय ही खाती मिळाली. त्यावर प्रतिक्रिया देताना कोणतेही खातं छोटं- मोठं नाही. राज्यातील सर्व 50 विभाग महत्त्वाचे आहेत. मात्र नोटा मोजताना श्वास बंद करून मोजला तर वनांचे महत्त्व समजेल अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वसुंधरेचे शोषण रोखण्यासाठी मागील काळात आपण ग्रीन आर्मी उभारली होती त्याच माध्यमातून 'ग्रीन महाराष्ट्र' बनविण्याचा संकल्प पुढे नेऊ असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. आपल्याकडे आलेल्या सांस्कृतिक खात्याच्या माध्यमातून राज्यातील पराक्रमाचा इतिहास नव्या पिढीच्या समोर ठेवला जाईल असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Aug 14, 2022  |  08:11 PM (IST)
गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी

मुंबई : विनायक मेटे यांच्या निवासस्थानी अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली.

Aug 14, 2022  |  07:56 PM (IST)
मुंबई। काळाचौकी येथील महागणपतीचे आगमन
Aug 14, 2022  |  07:43 PM (IST)
शिंदे-फडणवीस सरकारचं खाते वाटप

शिंदे-फडणवीस सरकारचं खाते वाटप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे: सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती

 1. राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
 2. सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
 3. चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
 4. डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
 5. गिरीष महाजन- ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 
 6. रवींद्र  चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
 7. अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
 8. सुरेश खाडे- कामगार
 9. मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
 10. गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता 
 11. दादा भुसे- बंदरे व खनिकर्म 
 12. संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
 13. संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
 14. उदय सामंत- उद्योग
 15. प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
 16. अब्दुल सत्तार- कृषी
 17. दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
 18. शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
Aug 14, 2022  |  07:38 PM (IST)
प्रत्येक मंत्री त्यांना दिलेल्या खात्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार : देवेंद्र फडणवीस

प्रत्येक मंत्री त्यांना दिलेल्या खात्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार : देवेंद्र फडणवीस

Aug 14, 2022  |  07:04 PM (IST)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केले भाषण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केले भाषण

Aug 14, 2022  |  07:00 PM (IST)
पीएम किसान सन्मान निधी योजना : ई-केवायसी ३१ ऑगस्टपर्यंत करता येणार
Aug 14, 2022  |  06:59 PM (IST)
अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ तैवानच्या दौऱ्यावर, अमेरिका-चीन तणाव वाढण्याची शक्यता
Aug 14, 2022  |  06:18 PM (IST)
विनायक मेटे यांच्या मृत्यूमुळे शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांना अश्रू अनावर
विनायक मेटे यांच्या मृत्यूमुळे शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांना अश्रू अनावर
Aug 14, 2022  |  05:18 PM (IST)
शिंदे-फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर, फडणवीसांनी अनेकांना दिला 'धक्का'
Aug 14, 2022  |  05:08 PM (IST)
टॅक्सी आणि App बेस्ड कॅब सेवेविरोधात तक्रारींसाठी RTO Helpline
Aug 14, 2022  |  04:13 PM (IST)
तिरंगा लावताना शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू
मध्य प्रदेशमध्ये तिरंगा लावताना शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
Aug 14, 2022  |  04:12 PM (IST)
बिहारमध्ये काँग्रेसला मिळणार तीन मंत्रिपदं
बिहारमध्ये काँग्रेसला मिळणार तीन मंत्रिपदं, काँग्रेस नेते भक्त चरण दास यांची माहिती.
Aug 14, 2022  |  03:56 PM (IST)
NEW MUMBAI | विनायक मेटेंचा अपघात झाला आहे कि घातपात?, संपूर्ण चौकशी झाली पाहिजे - आबासाहेब पाटील
Aug 14, 2022  |  02:34 PM (IST)
बुलडाणा - कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ या दुःखद घटनेमुळे हरवला - आ.संजय गायकवाड

टीव्हीवर बातमी पाहिली आणि एक जबरदस्त मोठा धक्का बसला. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अतिशय सामान्य कुटुंबातून राज्य पातळीवर ज्यांनी काम केलं असं नेतृत्व विनायक मेटे साहेब होते. इतर जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी काम तर केलंच मात्र 20 ते 25 वर्ष मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी लढा त्यांनी दिला. 2004 पासून मेटे साहेबांसोबत काम केले आहे. मी कार्यकर्त्यांसाठी त्यांची जवळून तळमळ पाहिली. कार्यकर्त्यांसाठी जीव सोडणारा महाराष्ट्रातील हा एकमेव नेता असेल जो कार्यकर्त्यांच्या कामासाठी कोणाशी वाईटपणा घ्यायला तयार राहायचा. कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ या दुःखद घटनेमुळे हरवलेला आहे. मराठा समाजाची लढाई लढणारा एक योद्धा शहीद झालेला आहे. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष होते. दुर्दैवाने ते स्मारक त्यांच्या हयातीमध्ये होऊ शकले नाही. ती एक खंत त्यांच्या मनामध्ये कदाचित राहून गेली असेल. अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

Aug 14, 2022  |  01:52 PM (IST)
विनायक मेटे गेले यावर विश्वास बसत नाही - खासदार सुजय विखे पाटील
विनायक मेटे गेले यावर विश्वास बसत नाही - खासदार सुजय विखे पाटील
Aug 14, 2022  |  01:51 PM (IST)
अग्नीवीरसाठी हरयाणात भरती सुरू
वादग्रस्त ठरलेल्य अग्नीवीरसाठी हरयाणा जिल्ह्यात भरती सुरू झाली आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी ही भरती सुरू केली आहे त्यामुळे तरुणांना आणखी उत्साह येईल अशी माहिती मेजर जनरल रंजन महाजन यांनी दिली आहे.
Aug 14, 2022  |  01:06 PM (IST)
शिवसंग्राम भवन कार्यालयावर कार्यकर्त्यांची गर्दी ; कार्यकर्त्यांना शोक अनावर
शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच अपघाती निधन झाल आहे ही बातमी बीडमध्ये समजताच त्यांच्या समर्थकांनी शिवसंग्राम भवन कार्यालयावर गर्दी केली आहे दरम्यान या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरलीय सर्व कार्यकर्ते धाय मोकलून रडत आहेत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे काल रात्री बीड हुन मुंबईच्या दिशेने निघाले होते आणि त्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि ही बातमी मिळताच कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. भाऊ राम हरी मेटे हे शिवसंग्राम भवन येथे दाखल झाले आहेत आणि या ठिकाणी शोक व्यक्त केला जातोय