दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.
दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन एक घोषणा केली की आणि सरपंच आणी नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार... माझं तर असं मत आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा जनतेतून निवडला गेला पाहिजे असं विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. तर आमदार पळून नेऊन, चोरून असं घाबरण्यासारखं अशी निवड अयोग्य आहे त्याच्यामुळे हा निर्णय अमलात आणत असताना कृषीमंत्री आणखी वेगवेगळ्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सुद्धा जनतेतून निवडून आणण्याच धाडस करा असा सल्लाही मिटकरी यांनी दिला. आज जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे की जनतेतून निवडून सरपंच आला पाहिजे, तर भारतीय राज्यघटनेच्या अपमान केला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात 30.33 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर 10 जुलै पर्यंत अंगावर वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच 25 जनावरेही अपघाती मृत्युमुखी पडल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात घेण्यात आली आहे. परंतु गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सततचा पाऊस सुरू आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, काही ठिकाणी शेतात पानी साचले असून पिकांना धोका निर्माण झालाय, तर यावर्षी आपत्ती विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 4 जणांचा अंगावर विज पडून मृत्यू झालाय एक महिला पुरात वाहुन गेल्याने तिचा मृत्यू झालाय. यासोबतच 25 जनावरे देखील मृत्युमखी पडले आहेत.
रत्नागिरी : कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू आहे. संततधार पावसाने पाणी आल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील मुख्य रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ मंदावली. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. गुरुवारी देखील दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. त्याचा फटका कोकण रेल्वेलाही बसला असून चिपळूण ते अंजनी रेल्वे मार्गावर दरड कोसळली होती त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.
मागील तीन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले आता दुथडी भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी नदीचं पाणी हे थेट सखल भागात शिरलं आहे. यंदा सुरू असलेल्या पावसामुळे काही भागात शेती पहिल्यांदाच पाण्याखाली आली आहे. तर अमरावती जिह्यातील विसरोळी धरणाचे ५ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले असल्याने जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे.
मोठ्या विश्रांतीनंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार बॅटींग सुरु केली आहे. त्यामुळे माना टाकलेल्या पिके पुन्हा प्रफुल्लित झाले आहे. गेल्या पंधरवड्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पिके कोमेजून जाऊ लागली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने पिकांना संजीवनी मिळाली आहे.
यासह परिसरातील नदी, नाले, तलावही ही तुडुंब भरले आहेत. अमरावती जिल्ह्यातील विश्रोळी धरणाचे ०५ दरवाजे १० सेमीने उघडले असून त्यातून ३०.२९ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारी झालेल्या पावसामुळे शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी संग्रामपूर-शेगांव तालुकाकरांचे पावले खिरोडा नदीकडे वळू लागले आहे.
आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आष्टी ते चंद्रपूर मार्ग बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात संततधार पावसामुळे गोसेखुर्द धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. चामोर्शी तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या आष्टी येथील वैनगंगा नदीपुलावरुन सकाळी 8 वाजतापासून पाणी वाहत असल्यामुळे आष्टी चंद्रपुर मार्ग बंद झाले आहे. त्याला पर्यायी म्हणून घाटकूळ मार्ग सुरु आहे. गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.तरी वैनगंगा नदिकाटावरील परिसरातील गावकऱ्यांनी सतर्क रहावे असे आव्हान प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाबाबत चर्चा रंगल्या आहेत. आता या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे मंत्रिमंडळाचा लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार 19 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे.
चार दिवसांपासून सुरू असलेल्या या संततधार सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्ह्यात अलर्ट मोडवर आहे. दुसरीकडे पाडळी सर्कलसह सिंदखेड राजा तालुक्यातील चार सर्कलमध्ये 13 जुलै रोजी सकाळी 8 वाजता 24 तासात सरासरी 53 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सिंदखेडराजा तालुक्यातील बायगाव खुर्द येथील नदीवर निर्माणाधीन असलेल्या पुलाजवळ रस्त्यासाठी टाकण्यात आलेला भराव वाहून गेल्याने परिरसातील काही गावांचा संपर्क तुटला आहे.
बायगाव खुर्द परिसरात दमदार पाऊस झाला आहे. गावा शेजारी असलेल्या नदीवर गेल्या सहा महिन्यापासून एका पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या पुलालगतच भराव टाकून तेथे तात्पुरत्या स्वरुपात एक पुल उभारण्यात आला होता. तो पूल झालेल्या दमदार पावसामुळे वाहून गेला. यापूर्वीही येथील हा पूल वाहून गेला होता. बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोन दिवस सार्वत्रिक पाऊस अशाच पद्धतीने पडणार आहे. त्यानंतर, 15 जुलै ते 16 जुलैच्या दरम्यान जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात हा पाऊस पडले, असा अंदाज कृषी हवामान केंद्रातील तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी स्पष्ट केले. या पावसामुळे जिल्ह्यात दुबार पेरण्याचेही संकट टळले असल्याचे चित्र आहे.या भिज पावसामुळे जिल्ह्याची भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
महाराष्ट्र : मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
1. पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय
2. राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविणार
3. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
4. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने
5. राज्यातील ग्रामपंचायत सरपंचाची थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
6. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.
7. बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.