LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 14 September 2022 Latest Update: मुंबईत मेट्रोची सेवा विस्कळीत

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 14 September 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 14 September 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Sep 14, 2022  |  09:02 PM (IST)
मुंबईत मेट्रोची सेवा विस्कळीत

मुंबईत मेट्रोची सेवा विस्कळीत
घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा विस्कळीत
तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोची सेवा विस्कळीत 

Sep 14, 2022  |  08:07 PM (IST)
गुजरातजवळील समुद्रात २०० कोटी रुपयांचे ड्रग्स पकडले

गुजरातजवळील अरबी समुद्रात पाकिस्तानी बोटीत २०० कोटी रुपयांचे ४० किलोचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. 

Sep 14, 2022  |  07:58 PM (IST)
वेदांता प्रकल्प हा गुजरातकडे वळविण्यात आला हा महाराष्ट्रावर अन्याय आहे - एकनाथ खडसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची राज्यशासनावर जोरदार टीका केलि आहे . महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास कारणीभूत ठरणारा वेदांत प्रकल्प हा गुजरातकडे वळविण्यात आला असून हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. तसेच राज्यासाठी मोठी दुर्देवी बाब आहे.  अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. या प्रकल्पामुळे राज्याची जी आर्थिक उलाढाल आहे, त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली असती, राज्याचा जीडीपी दर वाढला असता. प्रत्यक्ष उत्पन्न वाढल असत, लाखो तरुणांना यामुळे रोजगार मिळाला असता, मात्र हा प्रकल्प गुजरातकडे वळविल्याने या सर्वांपासून महाराष्ट्र वंचित राहणाार आहे.  सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतांना हा प्रकल्प गुजरातकडे वळविला गेल्या यात मोठे राजकारण आहे, असेही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले. तसेच अजूनही वेळ गेलेली नाही, महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय असून यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घ्यावी असेही खडसे म्हणाले. अजूनही वेळ गेलेली नाही, राज्यसरकारने प्रतिष्ठा पणाला लावून हा प्रकल्प पुन्हा राज्याकडे आणावा असेही खडसे म्हणाले. मात्र २०१४ निवडणुकीच्या शिवसेनेच्या त्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. मुक्ताईनगरचे असो की , जिल्ह्यातील इतर रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत, अशी अपेक्षाही एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त केली. गैरसमजातून साधूंना मारहाण झाली, म्हणजे या राज्यात साधु सुध्दा सुरक्षित नाही, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. या घटनेत सुदैवाने अनर्थ टळला अन्यथा पालघरच्या घटनेची पूनरावृती झाली असती, असेही खडसे म्हणाले.

Sep 14, 2022  |  06:10 PM (IST)
MUMBAI | शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 98 कोटी 58 लाख रूपयांचा निधी- कृषी मंत्री अब्दुल सत्तार

बाधित क्षेत्र आणि नुकसान भरपाईचा एकनाथ शिंदे सरकारने जारी केला तातडीच्या मदतीचा जीआर जारी

चालू हंगामामध्ये लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायींमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शासनाने तातडीने उपाय योजना करत 98 कोटी 58 लाख रूपयांच्या मदतीस मंजूरी दिली आहे. केंद्र शासनाने जाहिर केलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये पेस्ट अटॅक म्हणजे किटकांचा हल्ला ही अंतर्भूत आहे. त्यानुसार गोगलगायींचा उपद्रव हा पेस्ट अटॅक असल्याने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. 

लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून 98 कोटी 58 लाख इतका निधी वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्यासंदर्भात जीआर जारी करण्यात आला आहे. त्यानुसार विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातील NDRF च्या निकषांमध्ये बदल करून दुप्पट दराने मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, याच निर्णयाच्या अनुषंगाने गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात वाढीव दर निर्धारित करण्यात आले आहेत. तीन जिल्ह्यांमधील सुमारे 1 लाख 18 हजार 996 शेतकऱ्यांना या योजनेतून मदत मिळणार आहे. गोगलगायींमुळे एकूण 72 हजार 491 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 

मदत वाटपात संपूर्ण पारदर्शिता बाळगण्यासाठी पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत लाभार्थ्यांना थेट ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासंदर्भात ही सूचना देण्यात आल्या आहेत. 

गोगलगायींमुळे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीपिके/फळपिकांच्या नुकसानीसाठी 3 हेक्टरपर्यंतही नुकसानभरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाई च्या या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. होत असलेल्या मदतकार्याचा दररोज आढावा घेतला जाणार आहे. 

Sep 14, 2022  |  05:44 PM (IST)
बुलढाणा - बँकेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले तीन आरोपींना अटक

झटपट श्रीमंत होण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करीत बँक लुटून लुटलेल्या पैश्यातुन एक ऑफिस तयार करून एक कार विकत घेवून त्या कारमध्ये बुलढान्यातील मोठे उद्योगपतींना किडनॅप करण्याचा बुलडाणा शहरात राहणारे तिघांचा प्लॅन होता. अशी खळबळजनक माहिती दिल्लीत आयबी ने अटक केलेल्या आरोपींकडून समोर आली आहे.. आरोपीं मध्ये मिर्झा आवेज बेग (२१) शेख साकीब शेख अन्वर (२०) उबेद खान शेर खान (२०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.हे सर्व ते बुलडाणा शहरातील शेर-ए-अली चौकातील राहणारे आहेत. तिघेही काही दिवसांआधी दर्शनाकरिता अजमेर येथे गेले होते..सध्या या तीन आरोपींना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले असून या तिघांची अकोला एटीएस कडून चौकशी करण्यात येत आहे..असून तिघां वर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती बुलडाणा शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली आहे.

Sep 14, 2022  |  05:09 PM (IST)
AHMEDNAGAR | 9 लाख 98 हजार रुपये किंमतीची तीन सोन्याची कमळ फुले शिर्डी साईबाबांच्या चरणी

हैद्राबाद येथील रेड्डी साईभक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी आज 214.45 ग्राम वजनाचे तब्बल 9 लाख 98 हजार 497 रुपये किंमतीचे तीन नग सोन्‍याचे कमळ फुले साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले. याबाबतची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

Sep 14, 2022  |  04:50 PM (IST)
उदयोग मंत्री उदय सामंत येण्यापूर्वी कळताच रस्ते झाले चकाचक

नुकताच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान कल्याण डोंबिवलीतील खराब रस्त्यांसदर्भात त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. आज राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत एका कार्यक्रमानिमित्त डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात येत आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर याच्या नंतर उदयोग मंत्री उदय सामंत यांनी खरडपट्टी काढू नये, यासाठी पालिका यंत्रणा आधीच सज्ज झाली आहे. आज सकाळपासूनच डोंबिवली परिसरामधील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने सुरू करुन रस्ते चकाचक केल्याचे दिसून येत आहे.

Sep 14, 2022  |  04:43 PM (IST)
महाराष्ट्र सोडून इतर राज्यात प्रोजेक्ट जात असेल तर खूप दुर्दैवी गोष्ट - सुप्रिया सुळे
- खुप दुर्दैवी गोष्ट,महाराष्ट्र सोडून इतर राज्याला प्रोजेक्ट मिळत असेल तर ठीक पण महाराष्ट्राचा प्रोजेक्ट तिकडे गेला त्यामुळे नोकऱ्या जाणार आहेत,राज्य सरकारला विनंती विषय राजकीय करू नका,सर्वांनी एकत्रितपणे येऊन लढल जावा - बाळासाहेब थोरात याच स्टेटमेंट वाचलं,महत्वाच्या विषयावर केली नाही - इतर दौरे रद्द जरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी यावर चर्चा करावी - १ लाख नोकऱ्या जातील - मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी हाऊस व्हिजिटिंग बंद करून इकडे लक्ष द्यावे - पालकमंत्री नसल्याने नुकसान होत आहेत - बाळासाहेंबा सारख कोणी होणे नाही ,शाळेत फॅन्सी ड्रेस व्हायचे तसे आता बाळासाहेब ड्रेस घालून काहीजण करत आहेत - सर्वसमावेशक पवार बोलले आहेत त्यामुळे शिवसेना दसरा मेळावा यावर बोलले आहेत
Sep 14, 2022  |  04:12 PM (IST)
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची पत्रकर परिषद Live

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची पत्रकर परिषद Live

Sep 14, 2022  |  03:56 PM (IST)
वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार - उदय सामंत

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावर उद्योगमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद

6 महिन्यात फक्त भेटीगाठी, निर्णय नाही
5 जानेवारीला कंपनीने सरकारला पत्र पाठवलं
7 जानेवारी 2020 मधला अहवाल
मविआच्या आरोपांना उद्योगमंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर
साडेतीन लाखांचा प्रकल्प महाराष्ट्रात आहे 
मोठा प्रकल्प आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील 
मतांसाठी राजकारण करु नका
युवा पिढीच्या हितासाठी राजकारण करा
फॉक्सकॉन येणारच नाही अशी मविआची मानसिकता होती
जानेवारी ते जून 2022 मविआने काय केलं? 
कंपनी येणार नाही असा अहवालात उल्लेख
मविआने हाय पॉवर कमिटीची मिटिंग घेतली नाही 

वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार 
महाराष्ट्राला आणखी मोठा प्रोजेक्ट देणार
पंतप्रधान मोदी यांचं मुख्यमंत्री शिंदे यांना आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिलेला शब्द पाळतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्यातील चर्चेबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
मोठ्या प्रकल्पाबाबत मोदींनी आश्वासन दिलंय 
येत्या 8 ते 15 दिवसांत आम्ही मोदींना भेटणार 
राजकारणासाठी काहीही आरोप करु नका

Sep 14, 2022  |  03:51 PM (IST)
चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने काढले झोडपून 

इरई धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे इरई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. याचा फटका नदी काठावरील गावांना बसला आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे .पोडसा,तोहोगावाला बेटाचे स्वरूप आले  असून पोडसा गावातील नागरिक बोटीने प्रवास करून जात आहेत. या पावसामुळे अनेक शेतात पाणी शिरले आल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Sep 14, 2022  |  03:08 PM (IST)
AHMEDNAGAR | वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प  पुन्हा महाराष्ट्रात आणावा - सत्यजित तांबे

खनिकर्म क्षेत्रातील दिग्गज कंपनी वेदांताने, तैवानची इलेक्ट्रॉनिक उत्पादने निर्मिती करणारी कंपनी फॉक्सकॉन या कंपनीच्या सहाय्याने भारतामध्ये 1 लाख 54 हजार कोटी गुंतवणूक असणारा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले होते. 

काल-परवापर्यंत हा प्रकल्प महाराष्ट्रात होणं अपेक्षित होते.  मात्र अचानक गुजरातने हा प्रस्तावित महाकाय प्रकल्प आपल्याकडे वळवला. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी या घडामोडींनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, या प्रकरणात लक्ष घालावे आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा.

सत्यजीत तांबे यांनी म्हटलं की, 'असा प्रकल्प कोरिया वगळता जगाच्या इतर कोणत्याही देशात आलेला नाही. चीनमध्ये देखील असा प्रकल्प नाही. वेदांता समूहाने हे तंत्रज्ञान देशात आणण्याचे ठरवले होते आणि महाराष्ट्राला या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली होती. इतकंच नाही तर या उद्योगाशी पूरक व्यवसायांमधूनही तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला असता.' 

'हा प्रकल्प गुजरातला जाणे हा महाराष्ट्रातील युवकांना बसलेला मोठा धक्का असून हा महाराष्ट्रातील जनतेला दिलेला आणखी एक धोका आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने अनेक युवकांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. देवेंद्र फडणवीसांनी शर्थीचे प्रयत्न करावेत आणि हा प्रकल्प महाराष्ट्रात आणावा.' असं तांबे म्हणाले.
 

Sep 14, 2022  |  02:54 PM (IST)
गुजरात : अहमदाबादमध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अपघात, लिफ्ट कोसळून सात जणांचा मृत्यू आणि एक गंभीर जखमी

गुजरात : अहमदाबादमध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अपघात, लिफ्ट कोसळून सात जणांचा मृत्यू आणि एक गंभीर जखमी

Sep 14, 2022  |  02:53 PM (IST)
गोव्यात काँग्रेसला जबर धक्का, निवडून आलेले अकरापैकी आठ आमदार भाजपमध्ये दाखल

गोव्यात काँग्रेसला जबर धक्का, निवडून आलेले अकरापैकी आठ आमदार भाजपमध्ये दाखल

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो, डेलिया लोबो, केदार नाईक, राजेश फलदेसाई, अलेक्सो स्कायरिया, संकल्प अमोलकर आणि रोडॉल्फो फर्नांडीस या आठ काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून कळवले आहे.

Sep 14, 2022  |  02:53 PM (IST)
मध्य रेल्वेच्या नऊ स्टेशनांच्या परिसरात इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करता येणार
Sep 14, 2022  |  02:52 PM (IST)
मुंबईतला रिक्षा टॅक्सी संप १० दिवस पुढे ढकलला, दरवाढीबाबत चर्चा सुरू
Sep 14, 2022  |  02:51 PM (IST)
शिंदे फडणवीस सरकारच्या अठरापैकी तेरा कॅबिनेट मंत्र्यांचे वर्क फ्रॉम होम

शिंदे फडणवीस सरकारच्या अठरापैकी तेरा कॅबिनेट मंत्र्यांचे वर्क फ्रॉम होम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांव्यतिरिक्त गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, संजय राठोड, दीपक केसरकर, गिरीश महाजन या पाच मंत्र्यांनी मंत्रालयातील दालनात बसून कारभार सुरू केला आहे. बाकीचे तेरा मंत्री वर्क फ्रॉम होम करत आहेत. 

Sep 14, 2022  |  01:50 PM (IST)
शिंदे फडणवीस सरकारच्या बेजबाबदारीमुळे प्रकल्प बाहेर निघून गेला,  काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची टीक

शिंदे फडणवीस सरकारच्या बेजबाबदारीमुळे हा प्रकल्प बाहेर निघून गेला अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे. तसेच. हे असंच सुरू राहिलं तर कसा काय महाराष्ट्राचा विकास होणार? महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा त्यांचा कट आहे, या सगळ्या गोष्टींचा आम्ही  निषेध करतो.  पंतप्रधान चर्चा करतात, महाराष्ट्रामध्ये येऊन राजकारण करतात पण महाराष्ट्राला काही देत नाहीत. जे काही मुंबईत आहे ते सर्व त्यांना अहमदाबादमध्ये  हलवायचं आहे, आणि त्याच्यासाठी हा सारा खटाटोप आहे असेही ठाकूर म्हणाल्या.

Sep 14, 2022  |  12:51 PM (IST)
THANE | ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर लवकरात लवकर उपाययोजना करावी, निरंजन डावखरेंची मागणी

ठाणे शहर महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. विशेषत: घोडबंदर रोड, कळवा, भिवंडी बायपास परिसरात दिवसभर कोंडी असते. ठाणे शहरात जेएनपीटी व नाशिकहून येणारी अवजड वाहने ये-जा करतात. परिणामी ठाणे शहरातील नागरिकांना दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याप्रकरणी लवकरात लवकर उपाययोजना करण्याबाबत योग्य कार्यवाही करावी. अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Sep 14, 2022  |  12:11 PM (IST)
 उस्मानाबादमध्ये गावठी पिस्तुलसह दोघांना अटक; एक लाखाचा ऐवज जप्त

उस्मानाबाद जिल्ह्यातील बार्शीतील बस स्थानकात विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तुल, दोन राउंड आणि धारधार शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे. त्यांच्याकडून एक लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सुजित मुंढे आणि मेघराज बागल असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.