LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 16 August 2022 Latest Update : राष्ट्रवादीतला एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख, नवाब मलिकांसोबत असेल : मोहित कंबोज

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 16 August 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  BCCL
Breaking News 16 August 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Aug 16, 2022  |  10:26 PM (IST)
राष्ट्रवादीतला एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख, नवाब मलिकांसोबत असेल : मोहित कंबोज

राष्ट्रवादीतला एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख, नवाब मलिकांसोबत असेल 

मोहित कंबोज यांचं खळबळजनक ट्विट

Aug 16, 2022  |  07:24 PM (IST)
मेटेंच्या गाडीच्या अपघातातील त्या ट्रकची फॉरेन्सिक टीमने केली तपासणी

मेटेंच्या गाडीच्या अपघातातील त्या ट्रकची फॉरेन्सिक टीमने केली तपासणी

रसायनी पोलीस ठाण्यात संशयास्पद ठेवलेल्या आयसर ट्राकची फॉरेन्सिक लॅब च्या टीमने कसून तपासणी केली. गाडीच्या सर्व बाजू तपासल्या असून,गाडीचे भागावर आसलेले काही अंश काढून नेले आसून,विनायक मेटे यांच्या गाडी बरोबर काही मिळते का याची चाचपणी केली जाणार आहे.गाडीचे रंग ही काढून घेतले आहे.गाडीच्या ड्रायव्हर शिट वर चढून काही मिळते का याचीही तपासणी फॉरेन्सिक टीमने केली.

पोलीस स्थानकात अनेक जणांना बोलाऊन त्यांचे जवाब नोंदविले जात आहेत.त्याच प्रमाणे रसायनी पोलिसांची टीम सकाळीच एम.जी.एम रुग्णालयात पोहचली असून रुग्णालयातच विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम यांची चौकशी करत आहे.तिथून त्याला रसायनी पोलीस ठाण्यात आणणार असून, आयसर चालक सोबत एकत्र चौकशी करणार आहेत.

Aug 16, 2022  |  07:22 PM (IST)
बुलढाणा - वनमजुरांवर मेंढपाळांचा हल्ला; दोन वनमजूर गंभीर जखमी

बुलढाणा - बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा रेंजमध्ये असलेल्या खैर खेड मेंढपाळांनी दोन मजुरांवर हल्ला केल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली आहे. यावेळी दोन वनमजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी नेहा मुरकुटे व सहकाऱ्यांसह घटनास्थळावर गेले असता मेंढपाळांना पांगवण्यासाठी तीन वेळा हवेत गोळीबार करण्यात आला आहे. घटनेची तक्रार बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत देण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

Aug 16, 2022  |  07:22 PM (IST)
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद LIVE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

आमच्यापेक्षा विरोधकांनी स्वत:च्या एकजुटीसाठी प्रयत्न करावेत - देवेंद्र फडणवीस
मविआ सरकारच्या काळात ९ महिने शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही - देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षाला सत्तेत असताना जी कामे जमली नाही ती आता आमच्याकडून करुन घेतली जातायत - देवेंद्र फडणवीस

Aug 16, 2022  |  06:24 PM (IST)
येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्याच्या तळ्यात दोघांचा बुडून मृत्यू

नाशिक - येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या काही तरुणांपैकी दोघांचा तळ्यातील पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून हे दोघेजण नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रहिवासी असून अंकाई किल्ल्यावर श्रावण महिन्यानिमित्त मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते यावेळी कोपरगाव येथील काही तरुण आज पर्यटनासाठी आला असता ही दुर्दैवी घटना घडली आहे.

Aug 16, 2022  |  05:43 PM (IST)
THANE | दहीहंडी हा खेळ क्रीडा प्रकारात समविष्ट करुन घेतला तर त्याला वेगळे प्रलय प्राप्त होईल: श्रीकांत शिंदे

धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा शुक्रवार 19 ऑगस्ट 2022 रोजी टेंभीनाक्यावर पहायला मिळणार आहे. हा दिमाखदार सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे. गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही दहीहंडी फक्त पारंपारिक पध्दतीने साजरी करण्यात आली. परंतु या वर्षी पुन्हा धर्मवीरांची ही मानाची हंडी त्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरी होणार आहे. हा दिमाखदार सोहळा साजरा करताना ठाणे व मुंबईतील गोविंदा पथकांकरीता प्रत्येकी रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

दहीहंडी हा पारंपारिक उत्सव असला तरी तो एक साहसी खेळ आहे, त्यामुळे या उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी नमूद केले.या दहीहंडी महोत्सवात मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील मोठ्या आणि जास्त थर लावणाऱ्या गोविंदा पथकासाठी प्रत्येकी 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी 1,00,000/- रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 12,000 हजार, सहा थरांसाठी 8,000 हजार, पाच थरांसाठी 6000 हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 5000 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले. तसेच या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी व हिंदी चित्रपट व मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिध्द लावणी सम्राज्ञी आपल्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच या उत्सवात आपल्या सुमधूर व जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत. त्याचबरोबर उत्तम असा साउंड तसेच नेत्रदिपक रोषणाई या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहे.दही हंडी हा सण गोविंदा आला की खेळला गेला नसुन वर्षभर हा खेळ खेळला गेला पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री यांना केली आहे. या खेळाला साहसी दर्जा मिळाला पाहिजे. तसेच शाळेमध्ये देखील खेळला गेला पाहिजे. दहीहंडी हा खेळ क्रिडा प्रकारात समविष्ट करुन घेतला तर त्याला वेगळे प्रलय प्राप्त होईल.

Aug 16, 2022  |  04:34 PM (IST)
मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलकडून गुजरातील ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश, 1,026 कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. सुमारे 513 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला असून जप्त केलेल्या औषधांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1,026 कोटी रुपये आहे.  याप्रकरणी महिलेसह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Aug 16, 2022  |  04:29 PM (IST)
NASHIK | रिपब्लिकन पक्षाला सुध्दा एक मंत्री पद मिळावं - रामदास आठवले
Aug 16, 2022  |  04:20 PM (IST)
सरकारकडून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक - अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पत्रकार परिषद
चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारकडून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक
महत्त्वाचे प्रश्न सोडून वेगळ्याच मुद्द्यांवर चर्चा - अजित पवार
राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर आधी बोला - अजित पवार
राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान
सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा - अजित पवार
शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा - अजित पवार
शेतकऱ्यांचा मुद्दा अधिवेशनात मांडणार - अजित पवार
आम्ही सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांना तिप्पट मदत केली 

Aug 16, 2022  |  04:15 PM (IST)
SANGLI | सांगली नगरीत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे कावड यात्रेचे आयोजन

तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते सात गड आणि अकरा नद्यांचे पाण्याची आणि कावडची पूजा करण्यात आली. यावेळी श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांच शिवतांडव स्तोत्र पठन झाले. आणि त्यानंतर या कावड यात्रेस सुरवात झाली. नद्यांच्या पाण्याने श्री क्षेत्र संगमेश्वर येथे मंदिरात संगमेश्वरास अभिषेक करण्यात आला. पवित्र अशा श्रावण महिन्यात पवित्र नद्यांच्या पाण्याने भगवान महादेवांना अभिषेक करण्याची आपली शेकडो वर्षांची परंपरा आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मार्फत आपल्या सांगली मधे हि परंपरा आपण सुरू करण्यात आली. 

Aug 16, 2022  |  03:40 PM (IST)
मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी

मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी

20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Aug 16, 2022  |  03:07 PM (IST)
'त्या' संशयित ट्रकची आरटीओ अधिकाऱ्यांनी केली पाहणी
Aug 16, 2022  |  02:50 PM (IST)
दुधाच्या दरात वाढ, या कंपनीने केली घोषणा

मदर डेअरी दुधाच्या किंमतीत दोन रुपयांनी वाढ केली आहे. १७ ऑगस्टपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

Aug 16, 2022  |  01:43 PM (IST)
JALGAON | ट्रक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने ट्रकची सालबर्डी पुलाला धडक
Aug 16, 2022  |  12:54 PM (IST)
मुंबईत मुसळधार पाऊस, तिनही मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, असे असले तरी मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.
Aug 16, 2022  |  12:52 PM (IST)
सोलापूरातील हिंगणी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हिंगणी मध्यम प्रकल्प सलग तिसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे प्रकल्प परिसरातील शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
Aug 16, 2022  |  12:50 PM (IST)
मुंबईत मुसळधार पाऊस, दादर हिंदमाता परिसरात साचले पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस, दादर हिंदमाता परिसरात साचले पाणी
Aug 16, 2022  |  12:03 PM (IST)
मुंबईसह ठाण्यात पावसाची तुफान बॅटिंग 

मुंबई शहर आणि उपनगरात पावसानं सकाळपासून हजेरी लावली आहे. ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसानं शहराला चांगलंच झोडपून काढलं आहे. गेल्या दोन तासांपासून मुंबईत शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.  

Aug 16, 2022  |  10:38 AM (IST)
 63 दिवसांनंतर देशात सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद 

कोरोनाबाबत देशाला काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन महिन्यातील सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. देशात सोमवारी दिवसभरात  8 हजार 813 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 63 दिवसांनंतर देशात सर्वात कमी कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.

Aug 16, 2022  |  10:04 AM (IST)
ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक

ठाण्यात ११ ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीचा विनयभगं केल्याप्रकरणी दिनेश बाकेलाल गौड या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल ३५ ते ४० सीसीटीव्ही फूटेज तपासले, त्यानंतर त्याला शोधून अटक कराण्यात आली आहे. आरोपी गौडने असेच कृत्य इतर महिलांसोबत केले आहे आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.