दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.
दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे :
१. मावळत्या सरकारचे जबाबदारी ढकलणारे नाही तर उगवत्या सूर्याचे जबाबदारी स्वीकारणारे निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतले आहेत.
२. औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर‘ असे नामकरण, उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ‘लोकनेते स्व. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ‘ आणि एमएमआरडीएला ₹60,000 कोटींचे कर्ज घेण्यास मंजुरी आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
३. एमएमआरडीएच्या कर्जाला 12,000 कोटी रुपयांची शासकीय हमी देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला.
४. थेट नगराध्यक्ष निवडीत पैशाची खेळी करता येत नाही, हे लक्षात आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने तो निर्णय रद्द ठरविला होता.
MMRDAला ६० हजार कोटींच्या कर्ज उभारणीसाठी मंजुरी, पहिल्या टप्प्यातील १२ हजार कोटींच्या कर्ज उभारणीसाठी शासन हमी - मुख्यमंत्री
औरंगाबाद झाले छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद झाले धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव झाले लोकनेते स्व. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद.
गेल्या १५ दिवसांत मुंबईत उपनगरात ११५ टक्के पावसाची नोंद.
मुंबई शहरात ९५ टक्के पावसाची नोंद.