LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 17 August 2022 Latest Update :Monsoon Session: विनायक मेटे अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 17 August 2022 Latest Update :
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 17 August 2022 Latest Update :

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
 

Aug 17, 2022  |  05:34 PM (IST)
विनायक मेटे अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार

विनायक मेटे अपघाती मृत्यू प्रकरण
विनायक मेटे अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सीआयडी चौकशीचे आदेश 

Aug 17, 2022  |  05:20 PM (IST)
उद्योजक गौतम अदाणी यांना झेड प्लस सुरक्षा
अदाणी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदाणी यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
Aug 17, 2022  |  05:13 PM (IST)
मेंढया चोरी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

धुळे : गेल्या अनेक दिवसांपासून धुळे जिल्ह्यात मेंढ्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत होत्या. पोलिसात तक्रार देऊनही चोरटे पकडले जात नसल्याने ठेलारी मेंढपाळ समाजाच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना या संदर्भात तक्रारी देण्यात आल्या होत्या. या तक्रारींची धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत कोटा राजस्थान येथून एका टोळीच्या मुसक्या आवळत सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून इनोवा कार व चार मोबाईल असा एकूण 3 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. धुळे जिल्हा पोलीस या टोळीचा शोध घेत असताना कोटा राजस्थान येथील राजू बंजारा याने आपल्या साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती मिळताच धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट कोटा राजस्थान येथे जाऊन या टोळीला अटक केली आहे. 

Aug 17, 2022  |  04:31 PM (IST)
 बेकायदेशीरपणे एसटी चालवल्याप्रकरणी जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा : भाजप

बेकायदेशीरपणे एसटी चालवल्याप्रकरणी जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा -  धैरशील मोरे (भाजपा वाळवा तालुका अध्यक्ष)

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची चक्क एस टी बस चालवली. यावेळी उपस्थित सगळेच अचंबित झाले. यावेळी सर्व प्रवाशांनी एस टी बस मध्ये बसून याचा आनंद घेतला.मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याना एस टी बस चालवणे महागात पडणार आहे कारण बेकायदेशीरपणे एस टी बस चालवल्याप्रकरणी आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा या बाबत भाजपाच्या नेत्यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रार दिली आहे. एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना, किंवा जड वाहन चालक म्हणून आवश्यक असणाऱ्या परवाना किंवा, बॅच बिल्ला नसताना जड वाहन बेकायदेशीरित्या जयंत पाटील यांनी चालवले असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Aug 17, 2022  |  03:47 PM (IST)
बुलढाणा -  जिल्हावासीयांनो आता बुलडाणा नव्हे "बुलढाणा" असेच लिहा 

इंग्रजांच्या काळात जिल्हा मुख्यालय झालेल्या भिलठानाचे कालांतराने नामकरण झालेय, त्यावर  बुलडाणा की बुलढाणा यावरून अजूनही बरीच चर्चा होते. मात्र ते अधिकृतरित्या बुलढाणा असेच आहे. कारण जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये सुद्धा जिल्हा मुख्यालयाचा बुलढाणा असाच उल्लेख आहे. अनेकदा शासकीय व्यवहार मध्ये 'ढा' च वापरला जातो. मात्र काही ठिकाणी कालांतराने त्यात बदल होत गेले. ढा च्या ऐवजी डा लिहिण्यात येत होते तर काही वेळा वाचताना ही त्याचा उच्चार डा असाच यायचा. मात्र  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात रंगरंगोटी, डागडुजी करण्यात आली, त्यावेळी सुद्धा बुलडाणा ऐवजी आता बुलढाणा लिहिण्यात आलेय. यातही विशेष म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा असा बदल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, गॅझेट मध्येही बुलढाणा असाच उल्लेख आहे. यामुळे किंचित बदल झाल्याचे सांगून, आता अनेक पत्रव्यवहारामध्ये बुलढाणा असाच उल्लेख करण्यात येत असल्याचे यावरून स्पष्ट झालेय. तर नागरिकांना ही आता बुलडाणा ऐवजी बुलढाणा असेच लिहावे लागणार आणि वाचावे सुद्धा लागणार आहे.

Aug 17, 2022  |  03:06 PM (IST)
सांगलीत कृष्णा काठी अजस्र मगरीचे दर्शन
सांगली ते भिलवडीपर्यंत कृष्णा नदीच्या काठी नेहमीच मगरींचा वावर असल्याचे दिसून येतो. कृष्णा नदीकाठी आज नांद्रेच्या पायथ्याशी ब्रम्हनाळ नदी काठी अजस्त्र मगरीचे दर्शन झाले. कृष्णा नदी काठावर 12 फुटी अजस्त्र मगर नागरिकांना दिसली. काहींनी या मगरीचा व्हिडीओ काढला असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या अजस्र मगरीचे दर्शन झाल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
Aug 17, 2022  |  03:01 PM (IST)
पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीची मुंबईत झाडाझडती
संजय राऊत यांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज मुंबईत अनेक ठिकाणी झाडाझडती घेतली आहे.
Aug 17, 2022  |  03:01 PM (IST)
बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभ्यारण्यातील रस्त्यावर बिबट्याचा वावर
बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील प्राणी रस्त्यावर व आणि जवळच असलेल्या ग्रामीण भागातील गावामध्ये बिनधास्त फिरताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातून बुलढाणा ते खामगाव महामार्ग आहे. या रस्त्यांवर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. आज या मार्गावर बिबट्याचे दर्शन झाले. ही घटना एका प्रवाशाने आपल्या कॅमेर्‍यात कैदी केली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Aug 17, 2022  |  02:52 PM (IST)
MUMBAI | आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांचा मोहित कुंभोज यांच्या ट्विट सडेतोड प्रश्न

मुंबई : राज्यातील ED (एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस)सरकारच्या हाती काही अधिकार राहिले आहेत की नाहीत ? अमित शहा यांनी राजीनामा दिला का? पंतप्रधान मोदी जी यांनी सर्व अधिकार MK (मोहित कंबोज) यांना बहाल केले काय? कुणावर कारवाई करायची याची पॉवर ऑफ ऑथॉरिटी मोहित कंबोज कडे आहे का ? असे सडेतोड प्रश्न विचारत आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवरुन भाजपावर निशाणा साधाला आहे.

Aug 17, 2022  |  02:51 PM (IST)
बीड -  विनायक मेटे यांच्या अपघाताची एसआयटीकडून चौकशी करा - राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख

बीड  - शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर, त्यांचा घात की अपघात? असा संशय कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलाय. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी, या प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केली आहे. त्याचबरोबर स्व. विनायकराव मेटे यांच्या आईने एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर, त्या बातमीवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक गजानन खमीतकर यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे.

Aug 17, 2022  |  02:35 PM (IST)
भाजपच्या संसदीय बोर्ड आणि निवडणूक समितीची घोषणा

भाजपच्या संसदीय बोर्ड आणि निवडणूक समितीची घोषणा
देवेंद्र फडणवीस भाजपच्या निवडणूक समितीचे सदस्य
भाजपच्या संसदीय समितीवर महाराष्ट्रातील नेत्याला स्थान नाही 

Aug 17, 2022  |  01:50 PM (IST)
आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांचा मोहित कुंभोज यांच्या ट्विटवर सवाल

आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांचा मोहित कुंभोज यांच्या ट्विटवर सवाल

राज्यातील ED (एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस)सरकारच्या हाती काही अधिकार राहिले आहेत की नाहीत ? अमित शहा यांनी राजीनामा दिला का? पंतप्रधान मोदी जी यांनी सर्व अधिकार MK (मोहित कंबोज) यांना बहाल केले काय? कुणावर कारवाई करायची याची पॉवर ऑफ ऑथॉरिटी मोहित कंबोज कडे आहे का ? असे सडेतोड प्रश्न विचारत आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवरुन भाजपावर निशाणा साधाला आहे.

Aug 17, 2022  |  01:15 PM (IST)
उदयनराजेंनी कार्यकर्त्याला तोंडाने पेढा भरवला, पहा व्हिडीओ
उदयनराजेंनी कार्यकर्त्याला तोंडाने पेढा भरवला

#shorts उदयनराजेंनी कार्यकर्त्याला तोंडाने भरवला पेढा

लेटेस्ट न्यूज व्हिडीओज् पाहण्यासाठी...सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनेल... https://www.youtube.com/c/TimesNowMarathi?sub_confirmation=1Get Latest news and up...

Aug 17, 2022  |  01:05 PM (IST)
'हे गद्दार सरकार, कोसळणार म्हणजे कोसळणारच'- आदित्य ठाकरे 

 हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, बेईमानांचं सरकार आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

Aug 17, 2022  |  12:55 PM (IST)
बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात ७५ टक्के भूमीअधिग्रहण पूर्ण, रेल्वे मंत्रालयाची माहिती

बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात ७५ टक्के भूमीअधिकग्रहण पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. तसेच गुजरातमध्ये बुलेट ट्रेनसाठी ९८ टक्के तर दमण दीवमध्ये १०० टक्के भूमीअधिग्रहण झाल्याचेही रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. 

Aug 17, 2022  |  12:51 PM (IST)
जळगावात फुलांची शेती  करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक प्रकारचे फुलं येत असतात. त्याफुलांमध्ये जास्त लागणारे झेंडूचे फुल व गुलाबाचे फुलंच असतात. मात्र याच फुलांची आवक जास्त व मागणी कमी असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. जळगाव शहरातील गोलाणी बाजारात फुलांचे व्यापारी असतात. त्यांच्याकडूनच सर्व फुल विक्रेता फुलं घेतात. मात्र यावर्षी फुलांची अवाक जास्त व मागणी कमी, तसेच यंदा पाऊसही जास्त असल्याने शेतकरी व व्यापारी दोन्हीचेही नुकसान होत आहे. झेंडूचे फुल १०० ते १५० रुपये किलो विक्री केले जात होते, त्याच फुलाला आता १० रुपये किलोनेही कोणी खरेदी करण्यासाठी येत नाही. फुलं नाशवंत आल्याने  खूप आर्थिक नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. 

Aug 17, 2022  |  11:45 AM (IST)
सेन्सेक्सनं ओलांडला 60 हजार अंकांचा टप्पा

सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा गाठला आहे. आज बाजार उघडताच सेन्सेक्स निर्देशांक 95.84 अंकांनी वधारत 59,938.05  अंकांवर खुला झाला. एनएसईचा निफ्टी निर्देशांक 42 अंकांनी वधारत 17,868 अंकांवर खुला झाला. 

Aug 17, 2022  |  11:19 AM (IST)
Monsoon Session: “50 खोके एकदम ओके!, विधिमंडळ परिसरात विरोधकांची घोषणाबाजी

आज विधिमंडळ अधिवेशन होतंय. हे अधिवेशन किती वादळी ठरणार याची पहिली झलक अधिवेशनाआधी विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीतून दिसून आली. विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी घोषणाबाजी केली. “50 खोके एकदम ओके!”,”रोक घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!”,”सुधीरभाऊंना चांगलं खातं न सरकारचा धिक्कार असो!”, अश्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी विधिमंडळ परिसर दुमदुमुन गेला होता. 

Aug 17, 2022  |  11:07 AM (IST)
Nashik Rain : नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला! गंगापूर धरणातून 3 हजार क्यूसेकने विसर्ग

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिकसह गंगापूर पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप शहरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच असून स्वातंत्र्यदिनाच्या झालेले सूर्यदर्शन आज दिवसभर झालेले नव्हते. तर आजही जिल्हाभरात तशीच परिस्थिती असून पावसाची संततधार सुरूच असल्याने जिल्ह्यातिल धरणासाठयातही कमालीची वाढ झाली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर टिकून असल्याने आज सकाळी 6 वाजल्यापासून 3000 क्यूसेकने गंगापूर धरणातून विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर सतत राहिल्यास टप्याटप्याने विसर्ग वाढण्यात येईल. 
 

Aug 17, 2022  |  10:52 AM (IST)
CHANDRAPUR | वैनगंगा कोपली, ब्रम्हपुरी तालुक्यात पुरस्थिती ; आठवड्यात सलग दुसऱ्यांदा पुर
दोन दिवसांपूर्वी आलेला संततधार पाऊस आणि गोसेखुर्द धरणातीत पाण्याचा विर्सग यामुळे ब्रह्मपुरीत तालुक्यात एक आठवड्यात दुसऱ्यांदा पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. ब्रह्मपुरी आरमोरी मुख्यमार्गासह तालुक्यातील काही गावांतील रस्ते बंद झाले आहे. त्यामुळे पुन्हा जनजीवन प्रभावित झाले आहे .भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले . त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे . ब्रह्मपुरीत तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील पिंपळगाव , खरकाडा , अहेरनवरगाव , रणमोचन , बेलगाव या गावांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे . त्यामुळे या गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे . १० आणि ११ आगस्टला ब्रह्मपुरी तालुक्याती पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता एका आठवडयात दुसऱ्यांदा पूर आला आहे . किन्ही येथील विद्युत उपकेंद्र पाण्याखाली आले आहे . पुराचे पाणी वाढल्यास या उपकेंद्राला जोडलेली गाव अंधारात जाण्याची शक्यता आहे .