LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 17 July 2022 Latest Update: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 17 July 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 17 July 2022 Latest Update

दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 17, 2022  |  05:49 PM (IST)
बरसणाऱ्या पावसाने उसंत दिल्याने बळीराजाची पुन्हा शेतीच्या कामांची लगबग सुरू

औरंगाबाद : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दोन दिवसापासून ऊसंत दिल्याने औरंगाबाद तालुक्यातील बळीराजा निंदणी, खुरपणी, खत फवारणी, डवरणी च्या कामाला गती देत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. औरंगाबाद मंडळात सर्वदूर पाऊस समाधानकारक पडल्याने औरंगाबाद तालुक्यातील शेतातील पिके डोमाने डुलत असून आता शेतातील पिकाच्या वाढीसाठी तालुक्यातील बळीराजा निंदणी, खुरपणी,खत फवारणी, डवरणी करत आपल्या शेतातील पिकाची देखभालीची कामे उरकून घेत असून अजून पंधरा दिवस अशीच पावसाने उघड द्यावी अशी आशा परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

Jul 17, 2022  |  04:44 PM (IST)
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी 

शरद पवारांची पत्रकार परिषद 

शरद पवारांच्या घरी विरोधकांची तासभर खलबतं 

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार ठरला

विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी 

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत मार्गारेट अल्वा यांच्या नावावर झाला शिक्कामोर्तब

Jul 17, 2022  |  03:11 PM (IST)
उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधकांची खलबतं

उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधकांची खलबतं
उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक
टीआर बालू शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी पोहोचले
कॉंग्रेस नेते जयराम रमेश, रामगोपाल यादव शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल

Jul 17, 2022  |  02:33 PM (IST)
संगमनेर तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथे पावसामुळे घरांची पडझड
संगमनेर तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथे सतत पंधरा दिवस चाललेल्या पावसाने मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांच्या घरांची पडझड झाल्याची घटना समोर आली आहे. सदर घटनेची माहिती समजतात गावचे कामगार, पोलीस आयुक्त घटनास्थळी जाऊन पंचनामा करुत शासन दरबारी माहिती पाठवली. तालुक्यात वाढत्या पावसाच्या प्रमाणामुळे घरांची पडझड झाल्याचे चित्र तालुक्यात बघायला मिळत आहेत. यामुळे प्रशासनाने त्वरित अशा घटनेची नोंद घेऊन भरपाई द्यावी अशी अपेक्षा कुटुंबाकडून करण्यात आली आहे.
Jul 17, 2022  |  02:19 PM (IST)
उस्मानाबाद जिल्ह्यात सततच्या पावसाने शेताला तळ्याचे स्वरूप, पिकाचे प्रचंड नुकसान
अगोदर पावसाअभावी पेरण्या लांबल्या होत्या. जेथे थोडी ओल आहे अशा शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र गेल्या आठ दिवसापासुन सतत पाऊस सुरू असल्याने शेतात पाणी साचले आहे. शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. साचलेल्या पाण्यामुळे पेरलेले बी खालीच सडले तर जे वरी आले तेही पिवळे पडले आहे. यामुळे शतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून उरले सरले पीक शंखी गोगलगाय व पैसा फस्त करत आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणी शिवाय पर्याय नसून त्यासाठी शासनाने पंचनामे करून आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Jul 17, 2022  |  01:36 PM (IST)
चंद्रपूर शहरातील पुराचे पाणी ओसरायला सुरुवात, रहमत नगर- राजनगर भागातील नागरिकांना दिलासा

चंद्रपूर शहरातील पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. रहमत नगर- राजनगर या भागातील नागरिकांना दिलासा, ईरई धरणाचे सात पैकी दोन दरवाजे 0.25  मीटर्सने खुले, तर चार दरवाजे 0.50 मीटर्सने खुले आहेत. चंद्रपूर राजुरा मार्ग वर्धा नदी पुलावर पाणी असल्याने अद्यापही बंद आहे. येथेच प्रशासनाने खुला केला सास्तीचा पर्यायी मार्ग, चंद्रपूर गडचिरोली जोडणारा आष्टी पूल अद्यापही बंद आहे. निम्न वर्धा आणि ऊर्ध्व वर्धा धरणांचा विसर्ग कमी झाल्यास परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. 

Jul 17, 2022  |  12:58 PM (IST)
कोल्हापूरात मुसळधार पाऊस, राधानगरी धरण ६७ टक्के भरले
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात सतंधार सुरूच आहे. राधानगरीधरणपरिसरात 133 मिलिमीटर पाऊस झाला असून आतापर्यंत 1809 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे धरण 67% भरले असल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.राधानगरी धरण परिसरात गेली 14 दिवस पावसाचा जोर असल्याने धरणाची पाणी पातळी 331.40 घन फुट इतकी झाली आहे. भोगावती नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली असून शिरगाव बंधारा गेले दोन दिवस पाणी आल्याने त्यावरून जाणारी वाहतूक बंद झाली आहे.
Jul 17, 2022  |  11:22 AM (IST)
पश्चिम बंगालच्या मालदामध्ये बॉम्बस्फोट, स्फोटात दोघांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील मालदा येथे बॉम्बस्फोट झाला असून त्यात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या बॉम्बस्फोटाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गोपाळपूर येथील माणिक चौकात हा स्फोट झाला. आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.

Jul 17, 2022  |  11:20 AM (IST)
Breaking News LIVE: पश्चिम बंगालच्या मालदामध्ये बॉम्बस्फोट, स्फोटात दोघांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील मालदा येथे बॉम्बस्फोट झाला असून त्यात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या बॉम्बस्फोटाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गोपाळपूर येथील माणिक चौकात हा स्फोट झाला. आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.

Jul 17, 2022  |  11:15 AM (IST)
उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची  बैठक होणार आहे. आज दुपारी  3 वाजता बैठक होणार असून यात  उपराष्ट्रपती निवडणुकीवर होणार चर्चा होणार आहे. 

Jul 17, 2022  |  11:10 AM (IST)
KALYAN | खड्ड्यात तोल गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू ; प्रशासन जागे होईल का संतप्त नागरिकांचा सवाल

बदलापूर खोनी रोडवर म्हाडा प्रकल्पासमोर आज सकाळच्या सुमारास खड्डे वाचवताना खड्ड्यात दुचाकी आदळल्याने पडलेला दुचाकी स्वार बसच्या मागच्या चाकाखाली चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बदलापूर पाईप लाईन रोड हा एमआयडीसीच्या अखत्यारीत येतो. या पावसात खड्ड्यांमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. एमआयडीसीकडून रस्ते दुरूस्तीचे काम सुरू असले तरी दगड माती डांबराचे ठोकळे टाकून बुजवले जाणारे खड्डे काही तासातच उघडे पडत आहेत.
 

Jul 17, 2022  |  08:53 AM (IST)
अनुस्कुरा घाटात पुन्हा दरड कोसळली , पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प

राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. ठिकठिकाणी नदी नाले तुटुंब भरून वाहत आहे. कोकणामध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. यामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.   आज पहाटे पाचच्या सुमारास अनुस्कुरा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे रत्नागिरीवरून राजापूर- कोल्हापूर मार्गे पुण्याला जाणारी एसटी घाटात अडकल्याची माहिती समोर आली आहे. 

Jul 17, 2022  |  08:52 AM (IST)
भाजप-शिंदे गटाच्या बैठका सुरूच, आजही हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक

हॉटेल ट्रायडंटमध्ये संध्याकाळी भाजप-शिंदे गटातील आमदारांची बैठक होणार आहे.  राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस आमदारांना  प्रशिक्षण मार्गदर्शन करणार 

Jul 17, 2022  |  08:49 AM (IST)
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार, दिपाली सय्यदच्या ट्विटनं खळबळ

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या एक ट्विटनंतर राज्यात मोठ्या नवीन राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, 'येत्या दोन दिवसात आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार, हे ऐकून खूप बरं वाटलं. शिंदेसाहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली, हे स्पष्ट झालं. या मध्यस्थी करता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. 

Jul 17, 2022  |  08:49 AM (IST)
Mumbai Local Mega Block: प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

आज लोकलने प्रवास करणे तुम्हाला त्रासदायक ठरेल. कारण आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी म्हणजे आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Jul 17, 2022  |  08:48 AM (IST)
भगवंत मान यांच्या घराजवळ तीन आंदोलकांचा आत्महत्येचा प्रयत्न

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घराजवळ गेल्या दोन दिवसांमध्ये तीन युवकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलीस दलात नोकरी न मिळाल्यानं नाराज झालेल्या तीन जणांनी मुख्यमंत्री निवासस्थानाजवळ आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या तिघेही रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.