LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 18 August 2022 Latest Update: Maharashtra Monsoon Session : हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 18 August 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  BCCL
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Aug 18, 2022  |  05:33 PM (IST)
DHULE | जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; शिवसेनेची मागणी

सध्या राज्यभरात तसेच धुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे, राज्यातील अनेक भागात पावसाने शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धुळे  जिल्ह्यासह तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून चार हेक्टरच्या मर्यादेत सरसकट आर्थिक मदत करा अशी मागणी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.प्रशासनाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान झालेल्या पिकाचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा. त्यासाठी प्रशासनाने सकारात्मक धोरण स्वीकारावे आणि राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव दाखल करावा. धुळे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दुबार विभाग पेरणी करावी लागली आहे. त्याचीही आर्थिक झळ शेतकऱ्याला बसलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यंदा महाराष्ट्रासह धुळे तालुक्यात व जिल्हा भरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे, सरासरी पेक्षाही जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिरिक्त पावसामुळे जिल्ह्यातील मुख्य पीक कापूस, ज्वारी, बाजरी, मका तसेच कडधान्य याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण झाले असून शेतकऱ्यांना निंदणी व कोळपणी करता आलेली नाही, तसेच खते ही देता आले नाहीत म्हणून महागडे खते बी- बियाणे शेतकऱ्यांना देणे शक्य नाही. म्हणून यंदा उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. त्यामुळे धुळे जिल्हासह तालुक्यात तात्काळ महसूल व कृषी विभागाच्या मार्फत संयुक्त पंचनामे करून सरासरीने मदत मिळावी अशी मागणी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Aug 18, 2022  |  05:03 PM (IST)
चंद्रपूर जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर शेतीचे नुकसान

चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचा आकडा समोर आला असून, तो एक लाख 60 हजार हेक्टर एवढा भव्य आहे. जिल्ह्यात सतत पडणारा पाऊस, नद्या-नाल्याना वारंवार आलेला पूर आणि पुराचे पाणी गाव-शिवारात शिरण्यास मदत करणारे कोळसा खाणींच्या मातीचे ढिगारे यामुळे हे नुकसान झाले आहे. पंचनामे करताना त्यांचे गावात वाचन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, मदतीपासून एकही पूरपीडित व्यक्ती सुटता कामा नये, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. त्यांनी प्रशासनाची यासंदर्भात एक बैठक घेतली. त्यात नुकसानीचा आढावा घेण्यात आला. प्रशासनाने तातडीने मदत करण्यासाठी 108 कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. 

Aug 18, 2022  |  04:36 PM (IST)
SOLAPUR | शिंदे समर्थक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची

- शिंदे समर्थक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची

- महापालिका आंदोलक कर्मचाऱ्यांना पोलीस ताब्यात घेत असताना झाली शाब्दिक चकमक

- पोलिसांनी महापालिका कामगारांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनी अडवल्या पोलीस गाड्या

- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कांही काळ तणावपूर्व वातावरण

- महापालिका कर्मचाऱ्यांनी आज  एकदिवसीय काम बंध आंदोलन आयुक्त हटाव मागणीसाठी पुकारले होते.

Aug 18, 2022  |  04:23 PM (IST)
हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कुर्ला स्टेशनजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Aug 18, 2022  |  02:45 PM (IST)
रायगडमध्ये संशयास्पद बोट आढळून आल्या, बोट भरकटत ओमानहून रायगडमध्ये?

रायगडमध्ये संशयास्पद बोट आढळून आल्या

नेप्यच्यून मेरिटाइम सिक्युरिटीचे स्टीकर सापडले

ओमानला ही बोट रेस्क्यू करण्यात होती

ओमानमध्ये ती अँकर करण्यात आली होती

यातील दोन क्रू मेंबर हे इंडोनेशियन नागरीक आहेत

ही बोट युकेला रजिस्टर करण्यात आली आहे

Aug 18, 2022  |  02:02 PM (IST)
मुख्तार अन्सारीवर ईडीची कारवाई, दिल्ली-लखनौ-मऊसह 11 ठिकाणी छापे

तुरुंगात असलेला बाहुबली नेता मुख्तार अन्सारी आणि त्याच्या निकटवर्तीयांवर मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी छापे टाकले. ईडीने 11 ठिकाणी छापे टाकले आहेत. 

Aug 18, 2022  |  01:59 PM (IST)
IND vs ZIM 1st ODI : झिम्बाब्वेवर भारतीय गोलंदाजांचे पारडे जड, 10 षटकांत 4 गडी बाद
झिम्बाब्वेवर भारतीय गोलंदाजांचे पारडे जड, 10 षटकांत 4 गडी बाद 
Aug 18, 2022  |  01:33 PM (IST)
IND vs ZIM 1st ODI :  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा  भारताचा निर्णय, झिम्बाब्वेचा डाव सुरू झाला

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हरारे येथे खेळवला जात आहे. वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देताना व्यवस्थापनाने केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवले आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Aug 18, 2022  |  01:32 PM (IST)
अजित पवारांचा सवाल अन् तानाजी सावंत गडबडले... विधानसभेतील नेमका ड्रामा काय?
Aug 18, 2022  |  01:31 PM (IST)
प्रसारण मंत्रालयाची कारवाई; 8 YouTube चॅनेल ब्लॉक
Aug 18, 2022  |  01:23 PM (IST)
MUMBAI | आधीच्या सरकारने हिंदू सणांवर बंदी घातली होती, आम्ही हिंदू सणांवरची बंदी हटवली- आ. राम कदम
Aug 18, 2022  |  01:18 PM (IST)
अजित पवारांनी कार्यक्रम पत्रिकेबाहेरचा प्रश्न विचारला, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची उडाली भंबेरी

अजित पवारांनी कार्यक्रम पत्रिकेबाहेरचा प्रश्न विचारला, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची उडाली भंबेरी. पालघर जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्ह्यातील हत्तीरोगबाधीत बालकांच्या संख्येत वाढ होत आहे. या परिस्थितीला हाताळण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम आहे का,  पालघर जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय जागांची माहिती द्यावी असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. यावर या प्रश्नाचे उत्तर तासभरात देतो सविस्तर उत्तर सोमवारी देतो अशा स्वरुपाचे उत्तर तानाजी सावंत यांनी आयत्यावेळी दिले.

Aug 18, 2022  |  01:12 PM (IST)
विधानसभेत नितेश राणे विरुद्ध भास्कर जाधव असा शाब्दिक संघर्ष

विधानसभेत नितेश राणे विरुद्ध भास्कर जाधव असा शाब्दिक संघर्ष, भास्कर जाधव बोलत असताना नितेश राणेंनी मध्येच केलेल्या वक्तव्याने भास्कर जाधव संतापले. दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष

Aug 18, 2022  |  01:07 PM (IST)
आम्ही गद्दार नव्हे खुद्दार - सरनाईक

विरोधकांच्या घोषणाबाजीला आमदार प्रताप सरनाईक यांचे प्रत्युत्तर, आम्ही गद्दार नव्हे खुद्दार म्हणाले आमदार प्रताप सरनाईक

Aug 18, 2022  |  01:03 PM (IST)
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित

अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित आणि उप जिल्हा पोलीस अधीक्षक जयभाये यांची आकार्यकारी पदावर बदली - गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

Aug 18, 2022  |  01:03 PM (IST)
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे

अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्याच्या निरीक्षकाचे निलंबन करावे, आमदार नमिता मुंदडांची मागणी

Aug 18, 2022  |  12:58 PM (IST)
Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यात आढळला दुर्मिळ पट्टेरी मण्यार; जहाल विषारी साप म्हणून नोंद
चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे जहाल विषारी पट्टेरी मण्यार साप आढळून आला. चार फुट लांबीचा या सापाला सर्पमित्रांनी पकडले. सापाला मुक्त अधिवासात सोडण्यात आले आहे. पट्टेरी मण्यार गडचिरोली जिल्ह्यात सापडल्याचा अनेक नोंदी आहेत. मात्र चंद्रपूरात या सापाचा नोंदी नाहीत. ब्रम्हपुरी हा तालुका गडचिरोली जिल्हाला लागून आहे. त्यामुळे पुरात हा साप वाहात आल्याची शक्यता आहे. जहाल विषारी साप असला तरी मानवाला दंश केल्याचा नोंदी दोन्ही जिल्ह्यात नसल्यातच आहेत. ब्रम्हपुरी शहरातील पेठ वॉर्ड येतील विजय अंबादे यांच्या राहत्या घरी चार फूट लांबीचा पट्टेरी मण्यार साप आढळून आला. साप असल्याची माहीती माहिती सर्पमित्र गणेश सातरे, सार्थक मेहर यांना देण्यात आली. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने सापाला पकडले. सापाला मुक्त अधिवासात सोडण्यात आले आहे. पट्टेरी मण्यार साप ब्रम्हपुरीत आढळल्याचा नोंदी फार कमी आहेत. कुठे आढळून येतो हा साप पट्टेरी मण्यार हा साप भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल, आसाम, बिहार आणि पूर्व महाराष्ट्रातील वैनगंगा नदीकाठच्या भागात आढळून येतो. गडचिरोली जिल्ह्यात हा साप सापडल्याचा नोंदी आहेत.
Aug 18, 2022  |  12:27 PM (IST)
Maharashtra Monsoon Session : अजित पवारांची फुल बॅटिंग; आरोग्यमंत्री तानाजी सावंत उत्तर देताना गडबडले

पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन अजित पवार सरकारला प्रश्न विचारला. पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना घेरलं. अजित पवार यांनी पालघरमध्ये किती जागा रिक्त आहेत?, असं विचारलं. अजित पवार यांनी प्रश्न विचारताच तानाजी सावंत यांची गडबड झाली.दादांच्या प्रश्नाचं लगोलग त्याच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना उत्तर देता आलं नाही. आपण महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय. पण मी अधिक माहिती घेतो आणि तासाभरात त्याचं उत्तर देतो, असं सावंत म्हणाले.

Aug 18, 2022  |  12:21 PM (IST)
बीड - गोदावरी नदी पात्रात पाण्याची वाढ, पांचाळेश्वर सह राक्षसभुवन येथील शनी मंदीर पाण्याखाली
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने नाथसागर जलाशय 95 टक्यांच्या पुढे भरले आहे.धरणात पाण्याची आवक लक्षात घेता जायकवाडी धरणातुन 75456 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला आहे.त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदीमध्ये पाण्याची वाढ झाल्यामुळे गेवराई तालुक्यातील साडेतीन पिकांपैकी एक असलेले राक्षसभुवन येथील शनी मंदीराचा एक मजला पाण्याखाली गेला आहे तर पांचाळेश्वर येथील दत्त मंदिर ही पाण्यात गेले आहे.