LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 18 July 2022 Latest Update: Parliament Monsoon Session : उद्धव ठाकरेंना आणखी एक दणका, सेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी शिंदेकडून बरखास्त

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 18 July 2022 Latest Update:
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 18 July 2022 Latest Update:

दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 18, 2022  |  10:44 PM (IST)
दिल्ली - शिवसेना खा. विनायक राऊत यांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र
Jul 18, 2022  |  09:00 PM (IST)
कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रचंड खराब रस्ते, रिक्षाचालक केडीएमसीवर धडकले

कल्याण-डोंबिवली शहरात खड्डयांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. बहुतांश चाकरमानी हे रिक्षाने प्रवास करतात. या खड्डयांमुळे रिक्षाचालक देखील हैराण झाले आहेत. अनेक अपघातात नागरिकांचे जीव जातायेत तरीही प्रशासन ढिम्म असल्याने अखेर आज सुमारे 200 रिक्षाचालक केडीएमसीच्या ह प्रभाग कार्यालयावर धडकले. प्रवासी भाडे न घेता आज रिक्षाचालकांनी मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.. डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा, जुनी डोंबिवली, नवापाडा आदी रस्त्यांवर तर खूप खड्डे पडले असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्या रस्ते हे समजन मुश्किल झालंय.. रिक्षाचालकांनी मोर्चा काढून ह प्रभाग अधिकारी प्रमोद पाटील आणि कार्यकारी अभियंता महेश गुप्ते यांना चांगलेच धारेवर धरले. अखेर येत्या आठवड्याभरात रस्त्यावरील खड्डे भरले जातील असे आश्वासन महपालिका अधिकाऱ्यांनी रिक्षचालकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, येत्या आठ दिवसात हे खड्डे भरले नाही तर महापालिका कार्यालयावर हजारो रिक्षचालकांसह भव्य मोर्चा काढला जाईल असा इशारा संघटनेचे पदाधिकारी भगवान मोरजकर यांनी सांगितले. तर याबाबत बोलताना पालिका आयुक्तांनी प्रत्येक प्रभागात खड्डे भरण्यासाठी एक टीम कार्यरत केली असून गेल्या चार पाच दिवस पाऊस खूप पडल्याने खड्डे बुजवायला अडचणी येत होत्या मात्र लवकरात लवकर हे खड्डे बुजवले जातील असे सांगितले. 

Jul 18, 2022  |  07:57 PM (IST)
शिवसेनेचे खासदार फुटले का?, पाहा या सवालावर अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले
Jul 18, 2022  |  07:40 PM (IST)
NANDURBAR | गरम पाण्याचा झरा पर्यटकांना घालत आहे भुरळ; उनपदेव पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी

नंदुरबार जिल्हात या वर्षी चांगला पाऊस पडल्याने निसर्गरम्य वातावरण आणि धबधबे बघण्यासाठी पर्यटक गर्दी करताना दिसून येत आहे. शहादा तालुक्यातील उनपदेव  येथील वर्षा पर्यटन स्थळी गरम पाण्याचा झरा असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.

पर्यटक गरम पाण्याचा झरा तसेच धरण परिसरात  फोटोसेशन आणि सेल्फी घेत असताना दिसत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या उनपदेव परिसरात निसर्ग सौंदर्य भरभरून निघाले आहे. उनपदेव परिसरातील धरण भरले असून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून या ठिकाणी पर्यटक पाण्यात पोहण्यासाठी आणि निसर्गरम्य वातावरणचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.

उनपदेव या ठिकाणी असलेल्या गरम पाण्याचे झरे पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. गुजरात मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. हा परिसर वनविभागाच्या ताब्यात असून वन विभागाच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन केले असल्याने या ठिकाणी दिसुन येत आहे. तसेच गरम पाण्याचे झरे निसर्गरम्य वातावरण वर्षा पर्यटनासाठी अनेक पर्यटकांना भुरळ घालत आहे . या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात ,परंतु वर्षा पर्यटन करत असताना पर्यटकांनी सावधगिरी बाळगून आपल्या जिवाशी खेळू नये. 

Jul 18, 2022  |  07:39 PM (IST)
WARDHA | बढे चौकातील मोबाईल दुकानाला आग लागल्याने मोठे नुकसान

वर्धा : आज शहरातील बढे चौकात असलेले आर एस मोबाईल दुकानाला दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यास सुरूवात करण्यात आली,सदर आगीत दुकानातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची महिती आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले, यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली, विशेषतः दुकानाचे शटर इलेक्ट्रॉनिक असल्याने दुकानाचे शटर उघडण्यात वेळ लागल्याने चेनच्या सहाय्याने शटर उघडावे लागले.

Jul 18, 2022  |  07:37 PM (IST)
NAGPUR | नागपुरात अनैतिक संबंधामुळे दगडाने ठेचून युवकाची हत्या

नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाबा बुध्दाजी नगरमध्ये आसिफ खान या युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. आरोपी दीक्षित भगवान जनबंधू याच्या पत्नी सोबत मृतक व्यक्तीचे अनैतिक संबंध होते. या अगोदर पण आरोपीचे आसिफ सोबत भांडण झाले होते. परंतु आसिफ याने आरोपीच्या पत्नी सोबत संबंध संपविले नव्हते, त्याचा राग मनात घेऊन आज सकाळी आरोपीने आसिफला गाठले आणि आसिफच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याचा डोक्यावर दगडाने ठेचून हत्या केली. पाचपावली पोलिसांनी आरोपी दीक्षित भगवान जनबंधू याला अटक केली असून पुढील तपास करीत आहे.

Jul 18, 2022  |  05:12 PM (IST)
'महागाई, दुष्काळ त्यातच जीवनावश्यक वस्तूंवर GST लादून निजामशाहीचा राजवट या देशामध्ये चालू आहे का?'
Jul 18, 2022  |  05:05 PM (IST)
बीडच्या एसटी स्टॅण्डला खड्ड्यांचा वेढा, बस चालकांसह प्रवाशांची तारेवरची कसरत
बीडच्या मध्यवर्ती बस स्थानकाला खड्ड्यांचा वेढा पडला आहे. बस स्थानकाच्या कुठल्याही बाजूला गेलं तरी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. तर या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून बस चालकांसह पायी चालणाऱ्या प्रवाशांना यातून वाट शोधण्याकरिता कसरत करावी लागते. तळ्याचं स्वरूप आलेलं हे ठिकाण आहे. बीडचं मध्यवर्ती बस स्थानक, दररोज या बस स्थानकातून शेकडो प्रवासी येजा करतात. मुख्य बस स्थानकाच्या छतावरून पाणी गळत असल्याने प्रवाशांना निवारा देखील नाही. दरम्यान तात्काळ हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते.
Jul 18, 2022  |  05:05 PM (IST)
उद्धव ठाकरेंना आणखी एक दणका, सेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी शिंदेकडून बरखास्त

मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड, पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावला नाही

सेनेची राष्ट्रीय कार्यकारणी शिंदेकडून बरखास्त 

प्रवक्तेपदी दीपक केसरकर यांनी नियुक्ती

उद्धव ठाकरे यांना एक दणका

शिवसेनेच्या नेते पदी आनंदराव अडसूळ,शिवाजी आढळराव पाटील

शिवसेनेचे उपनेते म्हणून उदय सामंत, तानाजी सावंत, शरद पोंक्षे

Jul 18, 2022  |  04:34 PM (IST)
BULDHANA | बुलडाणा जिल्ह्यात पिक विमा योजनेच्या नोंदणीला सुरु 

बुलढाणा :  हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा अत्यंत करणे गरजेचे असल्याने,प्रधानमंत्री पिक विमा योजना ही 2022 च्या खरीप हंगामात राबविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने मान्यता दिली आहे,त्यानुसार जिल्ह्यात खरीप हंगामातील पिक विमा नोंदणीला सुरुवात झाली आहे.

शेतकऱ्यांनी अधिसूचित पिकांचा विमा काढणे आवश्यक आहे..केंद्र शासनाच्या सूचनेनुसार यावर्षी शेतकऱ्यांना दोन टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे,उर्वरित हप्ता शासनाकडून भरला जाणार आहे..नगदी पिकांसाठी पाच टक्के हप्ता भरावा लागणार असून, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले अर्ज ई पीक पाहणी अँप वर भरावे,असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे. तर प्रधानमंत्री पिक विमा योजनेत समाविष्ट असलेल्या खरीप हंगामातील पिकामध्ये ज्वारी, सोयाबीन, उडीद, मुग, तूर आणि कापूस ही पिके अनुसूचित करण्यात आली आहेत

Jul 18, 2022  |  04:31 PM (IST)
SOLAPUR |  स्लॅब कोसळलेल्या जिल्हा परिषद शाळेची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी, स्ट्रक्चरल ऑडिटच्या दिल्या सूच

सोलापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून संततधार येणाऱ्या पावसामुळे आगळगाव जिल्हा परिषद शाळेतील एक स्लॅब कोसळला होता आणि त्यातून मोठा अनर्थ होता होता टळला होता. आता त्याच धोकादायक वर्ग खोल्यांची सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली आहे. यामध्ये शाळेतील पाच वर्गखोल्या या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहेत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची तात्पूर्ती व्यवस्था दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी करून  जिल्हा परिषद शाळेचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना प्रशासनाकसून देण्यात आल्या आहेत

Jul 18, 2022  |  04:29 PM (IST)
MUMBAI | मध्यप्रदेश दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाखाची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

MUMBAI | मध्यप्रदेश दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाखाची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा केली.

विरोधी पक्षनेत्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ

अत्यावश्याक प्रकल्प आहेत त्यांना स्थगिती दिली नाही.

Jul 18, 2022  |  01:32 PM (IST)
नाशिकमधील नऊ धरणे ओव्हरफ्लो; गिरणातील पाणीसाठा ३४ वरुन ९२ टक्के

जिल्ह्यातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणाऱ्या गिरणा धरणातील पाणीसाठा आठवडाभरात ३४ वरून ९२ टक्क्यांवर पोहाचला आहे. आठवडाभर पावसाचा धुव्वांधार वर्षाव झाल्याने एकूण उपयुक्त पाणीसाठाही ४३ टक्क्यांनी वाढून ८० टक्के झाला आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातच नऊ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. 

Jul 18, 2022  |  12:12 PM (IST)
Presidential Election 2022 Live: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवरुन पोहोचले, बजावला मतदानाचा हक्क

 राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवरुन संसदेत पोहोचले आहेत. बजावला मतदानाचा हक्क

Jul 18, 2022  |  11:54 AM (IST)
इंदूरहून जळगावकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Jul 18, 2022  |  10:46 AM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी केले मतदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी केले मतदान

Jul 18, 2022  |  10:45 AM (IST)
राष्ट्रपती निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मतदान
राष्ट्रपती निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मतदान
Jul 18, 2022  |  09:06 AM (IST)
मॉलच्या फूड कोर्टमध्ये बंदूक घेऊन घुसला हल्लेखोर; गोळीबारात 4 लोकांचा मृत्यू, अनेक जखमी

अमेरिकेत दिवसेंदिवस गोळीबाराच्या घटना झपाट्यानं वाढू लागल्या आहेत. आता पुन्हा इंडियाना येथे गोळीबार  झाल्याची बातमी समोर येतेय. रविवारी संध्याकाळी इंडियानामधील ग्रीनवुड पार्क मॉलमध्ये (गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झालेत. 
 

Jul 18, 2022  |  08:28 AM (IST)
Mumbai Crime : मीरा रोडमध्ये भाजप महिला पदाधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला

 मुंबई पश्चिम उपनगरातील मीरा रोडमध्ये भाजप महिला मोर्चा महाराष्ट्राच्या प्रदेश महिला प्रमुख सुलताना समीर खान यांच्या गाडीवर दोन अज्ञात इसमांनी रविवारी (17 जुलै) रात्री हल्ला केला आहे. यात सुलताना यांच्या डाव्या हातावर दोन ठिकाणी जखमा झाल्या.

Jul 18, 2022  |  08:25 AM (IST)
महाराष्ट्रात ४ ते ५ दिवसात पावसाचा जोर वाढणार

महाराष्ट्रात ४ ते ५ दिवसात पावसाचा जोर वाढणार जोरदार वारे वाहण्याची शक्यता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश चंद्रपूर ते गडचिरोलीत पूर ओसरण्यास सुरुवात