LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 19 August 2022 Latest Update: मुंबईत दहीहंडी दरम्यान सहा गोविंदा जखमी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 19 August 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  BCCL
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Aug 19, 2022  |  05:53 PM (IST)
मुंबईत दहीहंडी दरम्यान सहा गोविंदा जखमी

मुंबईत दहीहंडी दरम्यान सहा गोविंदा जखमी, जखमींपैकी तीन गोविंदांवर परळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Aug 19, 2022  |  05:44 PM (IST)
बीड - माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांनी घेतली मेटे यांच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट

बीड - माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी दिवंगत विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन्पर भेट घेतली आहे. या दरम्यान माध्यमांशी साधलेल्या संवादावेळी नरेंद्र पाटील यांनी मराठा समाज विखुरला असून त्याने एकत्र येणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त केलीय. नव्याने स्थापन झालेले शिंदे सरकार मराठा समाजाविषयी गंभीर आहे. आरक्षणा संदर्भात वेळोवेळी बैठका लागतील आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला. तर यावेळी विनायक मेटे यांच्या अपघाता संदर्भात नरेंद्र पाटलांनी देखील संशय व्यक्त केला. याची चौकशी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे. शिवसंग्राम पुन्हा एकदा ताकतीने उभी राहिली पाहिजे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल त्यावेळी खरी श्रद्धांजली मेटे साहेबांना वाहिली जाईल, तोपर्यंत शांत बसू नका असं एल्गार पाटलांनी केलाय.

Aug 19, 2022  |  03:48 PM (IST)
ठाणे : जय जवान गोविंदा पथकाने मनसेच्या हंडीत ९ थर लावले; १० थर लावताना...
ठाणे : जय जवान गोविंदा पथकाने मनसेच्या हंडीत ९ थर लावले; १० थर लावताना पडले
Aug 19, 2022  |  02:49 PM (IST)
अहमदनगर : मेजर सचिन साळवे यांना अखेरचा निरोप
शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील रहिवाशी मेजर सचिन रामकिसन साळवे, वय ३३ यांना आसाममधील गुवाहाटी येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये गोळी लागून वीरमरण आले‌. आज सकाळी दहा वाजता त्यांच्यावर त्यांच्या राहत्या गावी राक्षी, ता.शेवगांव, जिल्हा अहमदनगर येथे शासकीय इंतमानात अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी साडे आठ वाजता शेवगाव शहरातील आंबेडकर चौक येथे त्यांचे पार्थिव आले असता शेवगाव शहरातील नागरिकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर त्यांच्या राहत्या गावी राक्षी येथे त्यांचे पार्थिव नेण्यात आले. यावेळी राक्षी गाव व पंचक्रोशीतील हजारो लोक यावेळी मेजर साळवे यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित होते. यावेळी अमर रहे....अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.
Aug 19, 2022  |  02:47 PM (IST)
नागपूर - कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची पत्रकार परिषद

नागपूर - कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची पत्रकार परिषद

नागपूर विभागात झालेल्या अतिवृष्टीचा नुकसान आढावा घेतला.
जुलै पर्यंतचे पंचनामे 100 टक्के झाले आहेत.
त्यानंतर झालेल्या पावसाचे नुकसानीचे पंचनामे अर्धे झाले आहेत.
अनेक नागरिक जन प्रतिनिधींना भेट घेतली.
एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी शासन घेत आहे.
पुढील 3,4 दिवसात सगळ्या पंचनामे येतील.
सोमवारी मी सभागृहात याबाबत निवेदन करणार.
नांदेडमधील शेतकरी गोगलगाय रोगाने त्रस्त झाले आहेत.
पंचनामे करताना शेतकऱ्यांना मदत होईल. असा प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहे.
केंद्र सरकारच्या काही जाचक अटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करू.
कृषी विद्यापीठ, प्रयोग शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी अडचणीवर उपाय शोधू.
केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून शेतकऱ्यांना मदत करता येईल.
शेतकऱ्यावर राजकारण न करता मदत देऊ.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ग्रामपंचायत मध्ये वाचन केलं जाणार.
नदी-नालेच नाही तर जमीन खरडून गेली असेल पाणी साचाल असेल त्यांना देखील मदत करण्याच्या सूचना..
पंचनामा करताना अधिकाऱ्यांनी फिल्डवर जाऊन मोबाईल मध्ये फोटो काढून तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याचा सत्तार यांच्या सूचना.
अधिकाऱ्यांनी मंदिर मस्जिद च्य भोंग्यातून नागरिकांना सूचना द्याव्या.
मी राज्यपालांना भेटून त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार.
मंत्री, कलेक्टर आणि महसूल अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवसभर त्याच्या जीवन शैलीचा अभ्यास करणार.
प्रशासनाला शेतकऱ्यांची व्यथा समजण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा.
सरकारच्या नियमात बसेल तरच ओला दुष्काळ जाहीर करणार.
कृषी विषयक प्रश्नांवर शरद पवार यांचे मार्गदर्शन घेणार, अब्दुल सत्तार यांची नागपुरात माहिती. पवार साहेबांसोबत राज्यपालांचे सुद्धा मार्गदर्शन घेणार. शेतकऱ्यांचा ज्यात फायदा असेल त्यासाठी शरद पवार आणि राज्यपाल यांना भेटणार
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आम्ही शेतकाऱ्यांसोबत संवाद साधणार.शेतकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय त्यांच्या वेदना समजणार नाहीत.

Aug 19, 2022  |  02:44 PM (IST)
मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प करणारी हंडी उपमुख्यमंत्र्यांनी फोडली
मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प करणारी हंडी उपमुख्यमंत्र्यांनी फोडली
Photo Credit: टाइम्स नाऊ मराठी
मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प करणारी हंडी उपमुख्यमंत्र्यांनी फोडली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि तरुणाईच्या तुफान जल्लोषात वरळीच्या ऐतिहासिक जांबोरी मैदानात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार संपवण्याचा संकल्प करणारी दहिहंडी मुंबई भाजपातर्फे फोडण्यात आली. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवात विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार राजहंस सिंह, उत्तर भारतीय महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे, संजय उपाध्याय आयोजक संतोष पांडे आदी सहभागी झाले होते
Aug 19, 2022  |  01:03 PM (IST)
मुंबई : बोरिवलीत ४ मजली इमारत कोसळली

मुंबई : बोरिवलीत ४ मजली इमारत कोसळली, साईबाबा नगर परिसरात गीतांजली नावाची ४ मजली इमारत कोसळली

Aug 19, 2022  |  12:20 PM (IST)
नाशिक : येवला तालुक्यातील देशमाने गावाजवळ स्कूल बस व छोटा हत्तीचा अपघातात 2 जण जखमी

नाशिक : येवला तालुक्यातील देशमाने गावाजवळ  स्कूल बस व छोटा हत्तीचा अपघातात 2 जण जखमी 

Aug 19, 2022  |  12:19 PM (IST)
कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज नागपूर दौऱ्यावर

कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांच्या दौऱ्यावर

Aug 19, 2022  |  12:19 PM (IST)
डोंबिवलीत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे दोघे गजाआड

डोंबिवलीत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे दोघे गजाआड ;725 ग्राम वजनाची 1 कोटी 60 लाख रुपायांची उलटी जप्त

Aug 19, 2022  |  12:18 PM (IST)
दहीहंडी मध्ये राजकीय बॅनर बाजी

टेंभी नाका इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी मध्ये लावण्यात आलेले बॅनर देखील राजकारणाचा विषय ठरत आहेत, इथे लावण्यात आलेल्या आठ वेगवेगळ्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली विधाने दर्शवली आहेत त्याखाली बाळासाहेब ठाकरे यांची सही देखील बघायला मिळते, इथूनच पाचशे मीटर अंतरावर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार राजन विचारे यांच्या निष्ठेच्या हंडीला या बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या गटाने उत्तर दिले आहे.

Aug 19, 2022  |  12:15 PM (IST)
औरंगाबाद : सिल्लोड शहरासह तालुक्यात भगवान श्रीकृष्ण यांची जयंती ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी

औरंगाबाद : सिल्लोड  शहरासह तालुक्यात भगवान श्रीकृष्ण यांची जयंती ठीक ठिकाणी मोठ्या  उत्साहात साजरी

Aug 19, 2022  |  12:15 PM (IST)
औरंगाबाद : बजाजनगरात भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव हर्ष उल्हासात संपन्न

औरंगाबाद : बजाजनगरात भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव हर्ष उल्हासात संपन्न

Aug 19, 2022  |  11:20 AM (IST)
कल्याण रेल्वे स्टेशनवर बाळ चोरी, पोलिसांनी चोराला काही तासांत पकडले

मूळची बिहारची असलेली संजुदेवी राजवंशी मोजमजुरी करून रात्री विश्रांतीसाठी कल्याण स्टेशन परिसरात येत होती. रात्री संजुदेवी राजवंशी वडापाव घेण्यासाठी जाताना तिच्या अडीच वर्षांच्या बाळाला स्टेशन परिसरात एका आडोश्याला एकटे ठेवून गेली आणि परतली तेव्हा बाळ जागेवर नव्हते. बाळ हरवल्याची तक्रार संजुदेवीने रेल्वे पोलिसांकडे केली. रेल्वे पोलिसांनी लगचे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले आणि बाळ चोराचा चेहरा बघून त्याला उल्हासनगरच्या खेमानी झोपडपट्टीतून त्याला शोधले. बाळ चोरणाऱ्यास अटक करून बाळ संजुदेवीच्या ताब्यात देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अर्चना दुसाने ,पोलिस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या पथकाने तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.

Aug 19, 2022  |  11:03 AM (IST)
गावडेवाडीतील शेतकर्‍यांने झेंडू फुलांवर फिरवला ट्रॅक्टर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडीतील आण्णा हाक्के या शेतकऱ्याने  झेंडू फुलांच्या पिकावरून ट्रॅक्टर फिरवला, बाजारात किरकोळ भाव मिळत आहे आणि शेती करण्याचा खर्चही भरून निघत नाही म्हणून केली ही कृती

Aug 19, 2022  |  11:02 AM (IST)
महाराष्ट्रात ११ हजार ६९० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

महाराष्ट्रात ११ हजार ६९० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण, मागील २४ तासांत ३२० नवे कोरोना रुग्ण आढळले

Aug 19, 2022  |  11:00 AM (IST)
भारतात १ लाख १ हजार ८३० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

भारतात १ लाख १ हजार ८३० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण । भारतात २०९ कोटी २७ लाख ३२ हजार ६०४ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचले

Aug 19, 2022  |  10:59 AM (IST)
जळगाव - शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन च्या आवारात साप

जळगाव - शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन च्या आवारात  साप

Aug 19, 2022  |  10:58 AM (IST)
येवल्यात बालकांनी गाजवली श्रीकृष्ण सजावट स्पर्धा

श्रीकृष्ण जयंतीनिमित्त येवल्यात धडपड मंच तर्फे घेण्यात आलेल्या बाल श्रीकृष्ण सजावट स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने बालकांनी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करून स्पर्धेत सहभाग घेतला. नटखट, खेळकर बासरीवाला, दहीहंडी फोडणारा, माखन चोर अशा विविध प्रकारच्या वेशभूषा बालकांनी परिधान करून जवळपास ६५ बालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला 

Aug 19, 2022  |  10:57 AM (IST)
कळवा कारशेड मधून येणारी एसी लोकल प्रवाशांनी अडवली

कळवा कारशेड मधून येणारी एसी लोकल प्रवाशांनी अडवली, कळवा येथून लोकल हवी एसी ट्रेन नको अशी  मागणी करत प्रवाशांनी अडवली एसी ट्रेन