दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.
दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.
गद्दार हा गद्दारच असतो. मूळ शिवसैनिक इथेच आहे. ज्यांनी गद्दारी केली ते निघून गेले. ज्यांना परत यायचं आहे त्यांनी परत यावं. ज्यांच्यामध्ये राजीनामा देण्याची हिंमत असेल त्यांनी द्यावा आणि पुन्हा निवडून यावं. अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसात पावसाची कोसळधार चालू आहे. यामुळे पावसाचा फटका भाजीपाल्याच्या उत्पादनावर झाला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे वाहतुकीत देखील अडथळा येत आहे. परिणामी बाजारातील माल किरकोळ बाजारात पोहोचताना अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी किरकोळ बाजारात भाज्यांची आवक मंदावलेली पाहायला मिळते. फळभाज्यांचे दर 100 ते 120 रु प्रतिकिलो झाले आहेत तर काकडी आणि गाजराचे दर देखील दुप्पट होऊन 80 रु. किलोच्या घरात गेले आहेत.
दरम्यान, भाज्यांच्या दरवाढीमुळे सामान्य माणसाच्या घरखर्चात तफावत येत आहे. मूलभूत गरज असल्याने सामन्यांना भाजी तर खरेदी करावी लागतच आहे पण त्यांच्या भाजी घेण्याच्या प्रमाणावर आणि खाण्यावर नक्कीच मर्यादा येत आहेत. महागाईत जगायचे कसे आणि खायचे कसे हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
सांगली : ऊस तोडणीसाठी मुकादमाला दिलेले पैसे परत न केल्याने कुरळप पोलिसांत तक्रार देण्यात आली, मात्र वर्ष झाले तरीही पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही त्यामुळे संतप्त तक्रारदाराच्या पत्नीने ठाण्यासमोर परिसरातील महिला समवेत आंदोलन केले. पोलिसांनी मुकादमाला तात्काळ अटक करावी अन्यथा पोलीस ठाण्याच्या आवारातून हलणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान छत्रपती शासन संघटनेच्या दिव्या मगदूम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना ऊस तोडणी वाहतूक करणाऱ्या लोकांना पोलिसांनी तातडीने न्याय द्यावा अशी आक्रमक मागणी करत ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चोर सोडून संन्याशाला शिक्षा देत असल्याबाबत विचारणा केली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेना पक्षात संभ्रमाचे वातावरण पसरलेले आहे. अशातच शिवसेनेकडून घोषणा करण्यात आली की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे त्यांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर करावे. याच आदेशाचे पालन करत बुलढाणा जिल्ह्यातून 500 शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्र पक्षाला पाठविल्याची माहिती शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी व आंबीदुमाला या दोन गावांच्या सीमेवर असलेले कोटमारा हे धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. त्यामुळे आता शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहण्यास मिळते आहे. अकोले तालुक्यातील बदगी बेलापूर येथील धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते सर्व पाणी कोटमारा धरणात आले असुन त्यानंतर कोटमारा धरण तुडुंब भरून वाहू लागण्यास सुरुवात झाली आहे. तर धरण भरल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई : जायचं असेल तर सरळ जा परंतु मातोश्रीवर, उद्धवजी आणि आदित्यजी वर चिखलफेक करू नका - किशोरी पेडणेकर
काल तुम्ही म्हणालात मरेपर्यंत शिवसेनेत राहणार मुलाला कुठं जायचे, ते जाऊदे पण मी शिवसेनेत राहणार, अस नका करू कोणाचं आदर्श घ्यायचा. समस्त शिवसैनिकांना प्रचंड राग आणि द्वेष येत आहे. जायचं असेल तर सरळ जा परंतु मातोश्रीवर, उद्धवजी आणि आदित्यजी वर चिखलफेक करू नका असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रामदार कदम आणि बंडखोरांना आवाहन केले आहे.
जळगाव : भुसावळ तालुक्यातील तापी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. तापी नदीवर असणाऱ्या हतनुर धरणाचे पूर्ण दरवाजे म्हणजेच 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले असून तापी नदी पात्रात २४४४८५ क्यूसेक्सने पाणी प्रवाह सोडण्यात आला आहे. भुसावळ तालुक्यातील हतनुर धरण हे तापी नदी वरती बांधण्यात आले असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सातत्याने सुरू असल्याने हतनुर धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे धरणातून आज सकाळी सात वाजल्यापासून धरणाचे पूर्ण 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहेत. नदीपात्रामध्ये २४४४८५ क्यूसेक्सने पाणी प्रवाह सोडण्यात येत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कोणीही नदी पात्रात उतरू नये किंवा गुरेढोरे नदीपात्रात सोडू नये असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून ते कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले
- बंद खोलीत झालेल्या चर्चेत मी देखील होतो.
- मी तेव्हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो
- ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री…
- हे ठरलं होतं
- जागा वाटपाबाबत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली नव्हती रावसाहेब दानवे यांचा दावा
वर्धा जिल्ह्यात पावसाने चांगलाच कहर केल्याने आठही तालुक्यात जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतपिकांसह घरात पाणी शिरले असून, घरांचीही पडझड झाली आहे. सर्वाधिक फटका हिंगणघाट व देवळी तालुक्याला बसला आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.
बंडखोर शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी ही शिवसेना फोडली. स्वतःची कृती योग्य आहे असे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वर खापर फोडलं आहे. चांगल्या पद्धतीचा कारभार उद्धव ठाकरे यांनी केला होता. खंबीरपणे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. २०१९ चा राग घेऊन भाजपने पोलीस बळाचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करून शिवसेना फोडली.
देशातील कोरोना अपडेट: दुसऱ्या दिवशी कोरोना रूग्णसंख्येत घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 528 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी दिवसभरात 25 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुसद शहरातील पार्वती नगर नांदेड येथील एका फळ व्यापाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मोहम्मद फैसल अब्दुल करीम वय 23 वर्ष रा. नांदेड असे मृत युवकाचे नाव आहे. मृतक हा फळाचा व्यापारी होता तो नांदेड येथून पुसद येथे फळाचा माल देत होता पुसद येथील त्याचे नातेवाईंकडे आला असता फळांचे पैश्याच्या वादातून आरोपींनी त्यांच्या सोबत वाद निर्माण करुन पोटात चाकू भोकसून निर्घृण हत्या केली.
अनुभवी मैराज अहमद खानने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या स्कीट प्रकारात सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला या प्रकारात पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. ४० फैऱ्यांच्या अंतिम फेरीत ४६ वर्षीय उत्तर प्रदेशच्या मैराजने ३७ गुणांसह अग्रस्थान पटकावले.