LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 20 July 2022 Latest Update: ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे संघर्षाचा विजय झाला - देवेंद्र फडणवीस

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 20  July 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 20 July 2022 Latest Update

दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 20, 2022  |  06:56 PM (IST)
SANGLI| लवकरात लवकर ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात - जयंत पाटील
ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होती. छगन भुजबळ यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षणाच्या बाबत लढाई करण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीने नेमलेल्या बांटिया कमिशनचा रिपोर्ट न्यायालयाने मान्य केला. बांटिया कमिशनच्या रिपोर्टच्या आधारावर महाराष्ट्रात ओबीसींच्या आरक्षणासहित निवडणुका घेण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने आता लवकरात लवकर ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात.
Jul 20, 2022  |  06:52 PM (IST)
THANE | मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत, खारेगाव टोलनाका भागात पडलेल्या खड्ड्यांचा जाच बुधवारी देखील सहन करावा लागला.शाळेच्या बसेस, ॲम्बुलन्स, परिवहन सेवांच्या बसेस, रिक्षा, दुचाकी आदी वाहने तासंतास या वाहतूक कोंडीत अडकून पडली होती. बुधवारी पहाटेपासूनच पुन्हा वाहतूक कोंडीचा जात ठाणेकरांना सहन करावा लागला सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि चाकरमान्यांना देखील याचा फटका बसला. वाहतूक कोंडी तीन हात नाक्यापर्यंत तर दुसऱ्या बाजूने घोडबंदरपर्यंत गेली होती या वाहतूक कोंडीचा फटका अंतर्गत रस्त्यांना देखील बसल्याचे दिसून आले. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू झाले आहे. मात्र असे असतानाही बुधवारी देखील वाहतूक कोंडीचा त्रास ठाण्याला बसल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीवर ना सत्ताधारी ना विरोधक कोणीही बोलायला तयार नाहीत. मागील जवळजवळ आठ ते दहा दिवसांपासून वाहतूक कोंडीचा जाच ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक नाहक भरडला जात आहे. रस्ता दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यावधींचा खर्च केला जातोय मात्र तरी देखील रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे अशीच दिसत आहे. बुधवारी सकाळपासून अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसह रुग्णवाहिका, खासगी कंपन्यांच्या बसगाड्या, बेस्ट आणि टीएमटीच्या बसगाड्या, कार आणि दुचाकी या वाहतूक कोंडीमध्ये अडकून होत्या. अवघ्या १० मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना दोन तास लागत होता.

Jul 20, 2022  |  06:50 PM (IST)
THANE | ठाणेकरांना भविष्यात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार नाही याची खात्री आहे  - प्रताप सरनाईक

- ठाणे आणि मिरा्भाईंदरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यानी 900 कोटी रुपये दिलेले आहे
- ओवळा माजिवडासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न आहे
- 200 कोटी ठाणे महापालिका आणि  मीरा-भाईंदर  महापालिकेला वर्ग केला आहे
- हा निधी दिल्या प्रकरणी आणि मतदार संघातील रस्त्यांच्या कामे बाकी आहेत त्या साठी व विकासासाठी मी भेटलो होतो
- काँक्रीट रस्त्यासाठी 500 कोटी निधी देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा आहे 
- ओवळा माजिवडा मतदार संघातील सर्व रस्ते काँक्रीट  करण्यासाठी मी भेट घेतली व त्या प्रमाणे महापालिका आयुक्ताना तसें आदेश देखील मुख्य मंत्र्यांनी दिली आहे
- ठाणे शहराची लोकसंख्या जास्तीत जास्त वाढत चालली आहे. त्या मुळे वाहनांची संख्या वाढत आहे मेट्रोच काम चालू आहे त्या मुळे रस्त्यावर खडे पडले आहेत व त्या मुळे वाहतूक कोंडी होत आहे परंतु मुख्यमंत्री ठाण्याचे असल्याने ठाणेकरांना देखील अपेक्षा आहे. त्यामुळे ठाणेकरांना  भविष्यामध्ये वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार नाही याची खात्री आहे.
- सुप्रीम कोर्टात जी लढाई सुरु होती ती 1ऑगस्ट ला सुनावणी होणार आहे. परंतु उद्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे त्याचा आम्हला विश्वास आहे की तो ही निर्णय आमच्या बाजूने लागेल व त्या नंतर सविस्तर मंत्री मंडळ विस्तार होईल
- परंतु आम्ही सर्व आमदारांनी ठरवलं आहे की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला शिर्षावंद असेल 

Jul 20, 2022  |  06:43 PM (IST)
NAVI MUMBAI | आम्ही धक्के दिले तर गणेश नाईकांना भारी पडेल - विजय चौगुले

- नवी मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदे गटात राजकीय संघर्षाला सुरुवात झाली.
- नगरसेवकांचा भाजप प्रवेशावरून एकनाथ शिंदे गट संतप्त
- आमदार गणेश नाईकांनी  राजकीय अपरिपक्वता दाखवली
- दोन्ही पक्ष एकत्र असताना शिंदे गटाचे नगरसेवक फोडणे अयोग्य आहे .
- माजी विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी नाईकांवर केले गंभीर आरोप
- नाईकांनी वेळ पाहून प्रवेश द्यायला पाहिजे होता
- आम्ही धक्के दिले तर नाईकांना भारी पडणार 

Jul 20, 2022  |  06:40 PM (IST)
नागपूर - आर्थिक विवंचनेतून व्यवसायाची आत्महत्या
नागपूर - आर्थिक विवंचनेतून व्यवसायाची आत्महत्या
Photo Credit: टाइम्स नाऊ मराठी
नागपूर - आर्थिक विवंचनेतून व्यवसायाची आत्महत्या
नागपूर - शहरातील खाप्रीपुनर्वसन येथे एक कार जळाली त्या कारमध्ये रामराव गोपालकृष्ण भट्ट हा व्यक्ती पूर्णपणे जळून त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर त्याची पत्नी संगीता व मुलगा नंदन हे दोघेही भाजून जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विवेकानंद हॉस्पिटल खाप्री येथे उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आणि आमच्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही असे त्यांच्याकडील सुसाईट नोट मध्ये लिहिले आहे.
Jul 20, 2022  |  05:13 PM (IST)
ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

ओबीसी समाजाला न्याय मिळावा, आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ नये अशी राष्ट्रवादीची भूमिका होती
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत 
बांठिया आयोग हा महाविकास आघाडी सरकारने नेमला
निवडणूक आयोगाने ताबडतोब निवडणूक जाहीर करावी

Jul 20, 2022  |  05:12 PM (IST)
ओबीसी समजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही सरकारची भूमिका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

आम्ही पुर्ण कायदेशीर लढा लढत आहोत. आम्ही कायदेशीर पुर्णतः योग्य आहोत - मुख्यमंत्री
न्याय प्रक्रियेवर पुर्ण विश्वास आहे - मुख्यमंत्री
सुप्रीम कोर्टातील सुनावणी दिलासादायक आहे - मुख्यमंत्री 
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल - मुख्यमंत्री 
पूर परिस्थितीचा रोज आढावा घेत आहे - मुख्यमंत्री 
ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे - मुख्यमंत्री

Jul 20, 2022  |  04:03 PM (IST)
ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे संघर्षाचा विजय झाला - देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

मविआ सरकार केंद्राकडे बोट दाखवायचं - देवेंद्र फडणवीस 

१५ महिने मविआ सरकारने टाईमपास केला 

राज्याला डेटा तयार करायचा आहे हे मी वारंवार सांगत होतो 

मविआ सरकारने केंद्र सरकारकडे बोट दाखवलं 

३ मार्च २०२२ ला राज्य सरकारच्या वतीने एक अहवाल सुप्रीम कोर्टात दिला त्या अहवालावर कोर्टाने ताशेरे ओढले होते 

Jul 20, 2022  |  02:50 PM (IST)
बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या - सुप्रीम कोर्ट

बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या. निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करा. ३६७ ठिकाणच्या निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करा. - सुप्रीम कोर्ट

Jul 20, 2022  |  02:34 PM (IST)
आडनावांच्या आधारे तयार केलेल्या अहवालावर याचिकाकर्त्यांनी घेतला आक्षेप

आडनावांच्या आधारे तयार केलेल्या अहवालावर याचिकाकर्त्यांनी घेतला आक्षेप

Jul 20, 2022  |  02:31 PM (IST)
बांठिया आयोगाच्या अहवालात त्रुटी आहेत : याचिकाकर्ते

बांठिया आयोगाच्या अहवालात त्रुटी आहेत : याचिकाकर्ते

Jul 20, 2022  |  02:24 PM (IST)
निवडणूक आयोगाने दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी आवश्यक ती तयारी दोन आठवड्यात पूर्ण होऊ शकेल, बरीचशी तयारी झाली आहे; निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला (सर्वोच्च न्यायालय) दिली माहिती

Jul 20, 2022  |  02:22 PM (IST)
ओबीसी आरक्षण : सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

ओबीसी आरक्षण : सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

Jul 20, 2022  |  12:20 PM (IST)
हरीश साळवे यांची मागणी मान्य, १ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार

आमदारांच्या अपात्रबाबतची पुढील सुनावणी पुढे ढकलली

हरीश साळवे यांची मागणी मान्य, १ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार
२९ जुलैला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

Jul 20, 2022  |  12:15 PM (IST)
गटनेता बदलण्याचा हा पक्षाचा अधिकार - कोर्ट

गटनेता बदलण्याचा हा पक्षाचा अधिकार - कोर्ट
विधीमंडळाचा गटनेता पक्षप्रमुख सांगू शकतात - सिब्बल

Jul 20, 2022  |  12:12 PM (IST)
गटनेत्याला हटवणे हा पक्षांतर्गत मुद्दा - कोर्ट

पक्षाने बोलावलेल्या बैठकीला शिंदे अनुपस्थितीत - सिब्बल

पक्षाची बैठक बोलावण्याचा शिंदे यांना अधिकार नाही - सिब्बल
लोकशाही धोक्यात आली आहे - सिब्बल 

एकनाथ शिंदे पक्षप्रमुखासारखे कसे काय वागू शकतात, सिब्बल यांचा सवाल
गटनेत्याला हटवणे हा पक्षांतर्गत मुद्दा - कोर्ट
 

Jul 20, 2022  |  12:08 PM (IST)
अपात्रतेचा विषय राज्यपालांनी बघू नये - उद्धव ठाकरे यांचे वकील महेश जेठमलानी

अपात्रतेचा विषय राज्यपालांनी बघू नये - उद्धव ठाकरे यांचे वकील महेश जेठमलानी

मी खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय दिलेला नाही - कोर्ट
त्यामुळे वेळ वाचेल - सिंघवी 
महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुनावणी होणे गरजेचे - कोर्ट

Jul 20, 2022  |  11:58 AM (IST)
महाधिवक्ता तुषार मेहता यांच्याकडून युक्तिवाद सुरू

मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरणे सोपवण्यात यावे - कोर्ट

२९ जुलै किंवा १ ऑगस्टला सुनावणी व्हावी अशी मागणी साळवे यांनी केली.

महाधिवक्ता तुषार मेहता यांच्याकडून युक्तिवाद सुरू

पुढच्या मंगळवारी सुनावणी व्हावी, कपिल सिब्बल यांची मागणी

Jul 20, 2022  |  11:55 AM (IST)
अल्पमतात असलेला पक्षनेता गटनेत्याला काढू शकतो का ? कोर्टाचा सवाल

अल्पमतात असलेला पक्षनेता गटनेत्याला काढू शकतो  का ? कोर्ट
सिब्बल यांना ४ ते ५ दिवसांत उत्तर देऊन - साळवे 
 

हरीश साळवे यांच्या मागणीवर कपिल सिब्बल यांचा आक्षेप

काही घटनात्मक मुद्द्यांवर निर्णय आवश्यक - सरन्यायाधीश

Jul 20, 2022  |  11:50 AM (IST)
कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ हवा - साळवे

कागदपत्र सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ द्या, साळवे यांची मागणी

कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ हवा - साळवे

आधी उच्च न्यायालयात का गेला नाहीत? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
अभूतपूर्व स्थिती निर्माण झाल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली - साळवे यांचा युक्तिवाद